केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली
केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली
रागाने चेहरा लाल,आठी शोभते भाळी
किती समजवू,किती सांगू?तुज पटवू कसे?
भार्ये,तुज वाचून ,मम ह्रुदयी दुसरी कोण वसे?
काल भेटली ति मम कार्यालयीन सहकारी होती,
रीत म्हणून थांबलो, बोलायची तसदी घेतली होती
मोजून १० मिनिटे पण तिच्याशी नाही बोललो सखे
तरी तासभर "गुलुगुलू" चालले होते तुज का वाटे असे?
जनरीत म्हणून स्मित हास्य करून तिच्यासंगे बोललो
तरी का म्हणते "दात काढून, लघळ पणे" वागलो?
कार्यालयीन कामात सहकार्य देईन असे मी म्हटले,
तरी "निर्लज्या सारखा पुढे पुढे करतो" तुज असे का वाटले?
ति सुमार रूपाची, साधारण तरुणी असे,
तरी"मेली,चटक चांदणी, नट मोगरी" का तुज भासे?
मी सभ्य, संयमीत,साधारण पुरुष ,हे तुज ज्ञ्यात आहे,
असे "बावळटच" त्यांना आवडतात ,असे का सुनावत आहे?
विधिवत पाणी ग्रहण करून,मी हातात घेतला हात
कशी सोडीन मी, सखे, मधूनच तुझी साथ ?
हे विधात्या, तू हिला,लावण्य, सौंदर्य बहाल केले
पण, रुख्मीणी ऐवजी भामेचे मन का दिले?
अविनाश..
💬 प्रतिसाद
(15)
इ
इडली डोसा
Tue, 11/03/2015 - 03:30
नवीन
हा हा. मस्त.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 11/03/2015 - 03:47
नवीन
=))
शेवटच्या ओळीला फिस्सकन हसु आल.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 03:56
नवीन
+१११
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 11/03/2015 - 03:57
नवीन
आण्भव. आण्भव बोलतोय.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 04:21
नवीन
पांडुब्बा मो ड ऑण
अस झाल तर ते सगळ!
पांडुब्बा मो ड ऑफ
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 11/03/2015 - 04:27
नवीन
तुम्हाला नेहमीच पांडूच्या नावाने मोड का येतात ओ?
- Log in or register to post comments
ब
बिन्नी
Tue, 11/03/2015 - 04:28
नवीन
हिला कविता म्हणा !
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 11/03/2015 - 06:25
नवीन
:)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 11/03/2015 - 06:30
नवीन
प्रतिक्रीया जरी तद्कालीन घटने बद्दल असली तरी अशी प्रतिक्रीया येण्यासाठी इतिहास जास्त जबाबदार असतो.
किंवा दुसर्या शब्दात जिकडे दूर असतो तिकडे आग ही असतेच.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 11/03/2015 - 07:20
नवीन
आज अकुंची कविता चक्क आवडली आहे. कमाल आहे!
दमामि, तुमचा असा अनुभव येऊ द्या. आय एम व्हेरी शुअर यू हॅव अ डॉक्टरेट इन धिस सब्जेक्ट! :=))
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 08:41
नवीन
:):)
एक अनुभव आत्ताच शेअर केलाय.
बघा, आवडतो का.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 11/03/2015 - 07:41
नवीन
मस्तं जमलीय कविता. खूप आवडली, खासकरून शेवटचं कडवं.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/03/2015 - 07:45
नवीन
मस्त जमली आहे.
फ़क्त ज़रा ति, रुख्मीणी सारखे शब्द घात करत आहेत.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Tue, 11/03/2015 - 07:53
नवीन
.
.
.
.
खरी सद्य परिस्थिती आहे,म्हणूनच आमच्यासारखे "सभ्य" अजून सिंगल आहेत
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Tue, 11/03/2015 - 10:27
नवीन
अनुभवाचे बोल.
- Log in or register to post comments