Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

WhatsApp आणि फालतू ढकलसंदेश

ल
लंबूटांग
Tue, 11/03/2015 - 15:52
🗣 88 प्रतिसाद
सध्या WhatsApp मुळे कैक जुन्या मित्र नातेवाईकांशी संपर्कात राहणे अतिशय सोपे झालेले आहे. पण ह्याचबरोबर तेथे प्रचंड ढकलनिरोप येत असतात जे बरेचदा मला अस्वस्थ करतात. बरं ते कोणाकडून येतात तर रूढार्थाने सुशिक्षीत लोकांकडून. जरा सारासार विचार केला तर या संदेशाताला फोलपणा उघड होतो पण जराही सारासार न विचार करता दे दणादण संदेश forward केले जातात. अशाच काही संदेशांचा पर्दाफार्श करण्यासाठी हा धागा. सुरुवात मीच करतो. काही दिवसांपूर्वी मला आलेला हा संदेश.
लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही..... अवश्य वाचाच !!! गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वौच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची. आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. कोणाचं वाक्य आहे, मला आठवत नाही. पण, बहुधा नेपोलियनचं असावं. If you can’t convince, confuse. लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या. मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही. पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं. हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते. यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील. त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल. काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.) ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते. ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले. १-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ(कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले. कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते., सोली सोराबजी २० लक्ष, कपिल सिब्बल २२ लक्ष, महेश जेठमलानी (राम जेठमलानींचे पुत्र) ३२ ते ३४ लक्ष. हे कसायांच्या बाजूने उभे होते. राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता. कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता. दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले, “आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली. गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते. कसायांचे दावे (१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो. (२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय. (३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार? (४) गायींमुळं परकीय चलनही मिळते. (५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.” दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे. आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल. त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात. दीक्षितांनी सर्व आकडेवारी 7न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा रु. ५० मिळतात. म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात.म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा…. एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.” जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले, “ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micronutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले. दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले. गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.” सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते. आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते. एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो. अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते. अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत. अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले. पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते. न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, एक्सलंट. कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो. आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?” भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.
धर्म आणि श्रद्धा बाबतचा मुद्दा बाजूला ठेवू. सर्वात पहिले ही कोर्टकेस खरी होती की नाही. कोणाच्याही नावावर काहीही खपवायचे. पण खरी होती असे मानून चालू.
  • ह्या म्हाताऱ्या गायींना खायला देणे व इतर देखभालीच्या खर्चाचे काय?
  • हाच पैसा तरण्या गायीना पोसण्यासाठी वापरला तर त्याही शेण आणि गोमुत्र पैदा करतीलच की. शेणाबरोबरच बाकीचेही फायदे देत असतील (दूध वगैरे) तर त्यांना पोसणे जास्ती फायद्याचे नाही का?
  • जर एवढा पैसा फक्त शेणखतातून मिळत असेल तर मग शेतकरी इतके गरीब लोक कसे? शेतकरी नुसते शेण विकूनच आरामात बसून खातील की. आत्महत्या कशाला करतील?
  • कोणतीही पेट्रोल वर चालणारी गाडी मिथेन वर चालवणे सहज शक्य नाही. त्यासाठी जे conversion kit लागेल त्याचा खर्च ह्यात धरलेला नाही. तसेच मिथेन refilling stations कुठे आहेत? तेथपर्यंत हा मिथेन gas नेणार कसा. त्याला लागणारे infrastructure उभारण्यासाठीच्या खर्चाचे काय? त्यामुळे देशाची पेट्रोल डिझेल ची गरज संपेल वगैरे हास्यास्पद दावे आहेत.
Disclaimer : मी गोहत्याबंदीचा समर्थक अथवा विरोधक आहे म्हणून वरील उहापोह केला नसून एक फोल Hypothesis चे उदाहरण म्हणून वरील संदेश उद्धृत केला आहे.

प्रतिक्रिया द्या
16972 वाचन

💬 प्रतिसाद (88)
ज
जेपी Tue, 11/03/2015 - 16:11 नवीन
मी असले फालतु whatsapp सारखे प्रकार वापरत नाही. थोडा पयका खर्च करा ..जुन्या मित्रांशी नातेवाईकाशी कनेक्टेड राहा.. लेख फालतु आहे..पण सध्या फुकटच नेट आहे प्रतिसादासाठी वापरुन घेतल.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 11/03/2015 - 16:27 नवीन
झोप येत नसेल तर वॉट्स अ‍ॅपवरील संदेश वाचावेत मग लवकर झोप येते.संदेश कधी माहितीत भर घालणारेही असतात. सण कधी येणार हे कॅलेंडर्पेक्षा वॉट्स-अ‍ॅपवर आधी कळते. सण कुठलाही असो-दोन तीन दिवस आधी चिरफाड चालू होते. उ.दा. दिवाळी. एका ग्रूपमध्ये दिवाळी ह्या शब्दाचा नक्की अर्थ्,पूर्वज ते कशी साजरी करीत,मग दुसर्या ग्रूपमध्ये पाडगावकरांच्या कवितेच्या चार ओळी व आकाशकंदिलाचे काही फोटो,रांगोळीचे महत्व,तिसर्या ग्रूपमध्ये कश्मीर ते कन्याकुमारी,बंगाल ते आसाम...दिपावली साजरा करण्यात दिसणारे साम्य..चौथ्या ग्रूपमध्ये दिवाळीशी संबंधीत एखादे कल्पक कोडे..
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 11/03/2015 - 17:01 नवीन
https://youtu.be/D4QBjXydTkQ काही प्रकल्प आणी प्रयोग या विषयी यात माहिती दिली आहे. कृपया चित्रफीत बघावी.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Tue, 11/03/2015 - 17:15 नवीन
पण बहुधा मी मुद्दा समजावण्यात कमी पडलो असेन. लेख सर्वसाधारण विचार न करता संदेश forward करण्याबद्दल आहे गायींच्या उपयुक्ततेबद्दल नाही. तो संदेश केवळ उदाहरणादाखल दिला आहे. मला गायीच्या उपयुक्ततेबद्दल काहीच शंका नाही. ह्या चित्रफीतीत दुभत्या गायींचे उदाहरण दिलेले आहे. मला त्यांच्या शेणाचे उपयोग वगैरे ही मान्य आहेत. पण त्या संदेशात म्हातारया गायींचे उदाहरण दिले आहे. जी पेट्रोल डीझेल संदर्भातली आकडेवारी दिली आहे ती स्वप्नरंजनासारखी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 11/03/2015 - 18:07 नवीन
लोकं खरंच बरेचदा नुसतं ढकलतात. त्यातल्या बर्याच पोस्ट खर्या नसतात सुद्धा. या बद्दल सहमत. आवाज चालू करून पण बघा. त्यात हरियाणामधील एका प्रकल्पाची माहिती दिली आहे ज्यात जवळपास ११०० भाकड गायी (म्हाताऱ्या) पाळल्या आहेत आणी त्यापासून जे शेण व गोमुत्र मिळतं त्यापासून विविध गोष्टी तयार करून विकतात. वर्षाची उलाढाल ३.५ कोटी आहे म्हणतात. मिथेन पण तयार करण्याचा एक प्लांट टाकलाय आणि त्यापासून स्वयापाकासाठी वगैरे वापर करता येतो. GAIL च्या माजी CEO चे पण मत त्यात दिलेले आहे. वरील पोस्ट मध्ये कदाचित अतिशयोक्ती असेलही पण म्हणून पूर्णतः बाद ठरवता येईल असं वाटत नाही. मिथेन वापरायचा झाला तर त्यासाठी conversion kit, refilling stations पण लागतीलच. पण तो खर्च व पेट्रोल आणी त्यासाठी जाणाऱ्या विदेशी मुद्रा याची तुलना व्ह्यायला पाहिजे. पेट्रोल ला पर्याय म्हणून असं इंधन, कि जे गाडीत अजिबात बदल न करता वापरता येईल, मिळणं अवघड आहे. निदान आत्ताच्या टेक्नोलॉजी प्रमाणे तरी. इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय आहे. अवांतर: तुम्हाला आणी इतर बर्याच लोकांना माहिती असेल… टेस्ला कंपनीच्या एका मस्त गाडीची माहिती - http://www.teslamotors.com/models Some features All electric, All wheel drive, autopilot, recharge in 20 mins, travels approx 250 miles (400 kms) in one charge, 0-60 in 2.8 secs, Top Speed 155 mph, luggage space in front and back जाहिरात करण्याचा उद्देश नाही. परंतु मला आवडली आणी एक futuristic technology असलेली गाडी म्हणून केवळ माहितीसाठी देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/03/2015 - 17:14 नवीन
राजिव दीक्षित ह्या प्रकरणाचा पोल खोल केलेली एक मोठ्ठी पोस्ट फेसबुका वर कुठेतरी वाचली होती..सापडली की लिंकवतो
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/03/2015 - 18:07 नवीन
माऊसचा स्क्रोल मोडला.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 11/03/2015 - 18:12 नवीन
=)) =)) =))=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/04/2015 - 03:40 नवीन
दुत्त दुत्त =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नन्दादीप Wed, 11/04/2015 - 06:16 नवीन
परा परत आले.... बरा वाटला......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सोत्रि Wed, 11/04/2015 - 23:53 नवीन
'जुनं तेच सोनं' हा खाक्या सोडा. (तुम्हाला ते जमेलसं वाटत नाही पण प्रयत्न करा). जुने मोडके माउस वापरलेत की स्क्रोल पण मोडणारच ना! - (न मोडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रिम झिम गुरुवार, 11/05/2015 - 06:08 नवीन
तरी बरं, मिपावर उजव्या बाजुस स्क्रोल दिलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/05/2015 - 10:36 नवीन
तरी बरं, मिपावर उजव्या बाजुस स्क्रोल दिलाय...
उजव्या हातानी आम्ही फक्त संध्या करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/05/2015 - 10:48 नवीन
अलीकडे ती चोवीस नावेही बदललीत असे ऐकून होतो. खरेखोटे ते आचमन करणारेच जाणोत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/05/2015 - 15:35 नवीन
अलीकडे ती चोवीस नावेही बदललीत असे ऐकून होतो. खरेखोटे ते आचमन करणारेच जाणोत. =))
नावे? अहो आचमन ३० ६० ९० असे करतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/05/2015 - 15:38 नवीन
तेच हो ते. म्हणजे बियर साठाय नमः व्हिस्की तिसाय नमः वगैरे वगैरे. ज्याचे जसे पुण्य त्याप्रमाणे साठ-तिसाचे नव्वद-खंबा आणि बियर - व्हिस्की पासून स्कॉच- व्होडका वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/05/2015 - 15:42 नवीन
बियर साठाय नमः
=)) =)) बॅट्या तू पित नाय तेच बरे आहे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/05/2015 - 15:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/05/2015 - 15:48 नवीन
खी खी खी =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मालोजीराव Fri, 11/06/2015 - 06:08 नवीन
ब्याट्या अबे टॉवर आणि पिचर मध्ये बियर मोजतात हल्ली, ६० ml तर मुत्राबरोबरच बाहेर पडते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Fri, 11/06/2015 - 06:46 नवीन
क्रेट र्हैला कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ब
बॅटमॅन Fri, 11/06/2015 - 07:42 नवीन
खी खी खी. बाकी टॉवर आणि पिचरमध्ये किती एमेल मावते म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ट
टवाळ कार्टा Fri, 11/06/2015 - 07:56 नवीन
ते लिटरमध्ये अस्तात रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Fri, 11/06/2015 - 13:31 नवीन
बॅटमॅन यांचा निरागसपणा पाहून मन भरुन आलं आणि एक लार्ज व एक मीडियम jigger भर पाणी अश्रूंच्या रूपानं वाहून गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/05/2015 - 10:36 नवीन
'जुनं तेच सोनं' हा खाक्या सोडा. (तुम्हाला ते जमेलसं वाटत नाही पण प्रयत्न करा). जुने मोडके माउस वापरलेत की स्क्रोल पण मोडणारच ना!
अणिवाश्यांनी ह्यात पडू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ए
एस Tue, 11/03/2015 - 19:03 नवीन
फुगत चाललेले खिसे आणि रिकामी होत चाललेली डोकी अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त माणसांच्या हाती मिळालेले एक कोलित म्हणजे हे 'व्हॉट्सअ‍ॅप'. हे वापरणं कधीच बंद केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 11/03/2015 - 19:16 नवीन
अँड्रॉईड फोन घेतल्यानंतर व्हाट्सअ‍ॅप इन्स्टॉल आणि मोठया हौसेने शाळेतले, कॉलेजातले, कॉलेजातले, मिपावरचे ग्रुप्स जॉईन केले. आणि ही फॉरवर्ड्सची फुकटची डोकेदुखी सुरु झाली. लोक काहीही म्हणजे अक्षरशः काहीही पुढे ढकलत राहतात. उपाय खुपच सोपा होता. एक एक करत सारे ग्रुप्स सोडले. पुन्हा अ‍ॅड करणार्‍यांना तसे न करण्याची तंबी देऊन पुन्हा ग्रुप्स सोडले. वन टू वन कम्युनिकेशनमध्येही फॉरवर्ड्स टाकणारे काही महाभाग निघाले. त्यांना ब्लॉक केले. खुपच सोपं आहे या त्रासापासून वाचणं. व्हाट्सअ‍ॅप ही एक चांगली सुविधा आहे. मात्र ती आपण कशी वापरतो यावर सारं अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/05/2015 - 05:47 नवीन
हा प्रतिसाद मी, 'पहले मै काफी मोटा था. चलने फिरने मे भी तकलीफ होती थी. फिर मुझे मिला मोटापा कम करने का एक बेहतेरीन उपाय...' या चालीवर आणि त्या आवाजात वाचला. लै मज्जा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 11/05/2015 - 06:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/05/2015 - 06:22 नवीन
खि खि खि....त्याच्याब्रोब्र ब्लाँड सगा डोळ्यासमोर आणा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 11/04/2015 - 01:12 नवीन
लग्नात जश्या देण्या घेण्याचा साड्या असतात..ब्लाउज पिसेस असतात.. तसे whatsapp चे msg असतात...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/04/2015 - 01:12 नवीन
उदाहरणार्थ असलेला लेख पूर्ण कशाला?मुद्दा पटवायचा तर काही अतिरेकी ( वैचारिक) लोकांचं हे खेळणं झालंय.जत्रेमध्ये हौसेने घेऊन दिलेली पिपाणी मुलाने आठ दिवस वाजवत रहावे तसं करतात या वाटसपचं. अरे तु वाटसपवर ये आम्ही कित्ती मज्जा करतो या आग्रहास्तव घेतले आणि सर्वात अगोदर "ओटो डाउनलोड फोटो,व्हिडिओ बंद केले.ग्रुपचे मेसेजिस "unfollow"करता येत नाहीत म्हणून ग्रुप सोडले. बरं वाटसपवर कॅालिंग करायला जावं तर बय्राच लोकांच्या फोनसमध्ये होत नाही.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 11/04/2015 - 04:07 नवीन
चोप्य पस्ते केला मी. त्या ग्रुप्सना सोडून दिले आहे मी कधीच. पण हे सध्या जवळच्या नातेवाइकांकडूनच सुरू आहे. बरं बरेचसे संदेश तर इतके भारत स्पेसिफिक असतात की मी मनात आणले तरी इथे बसून काही करू शकत नाही. असो. मुद्दा हा की WhatsApp चा वापर करून मोठ्या प्रमाणात अफवा वगैरे पसरवल्या जाणे किती सहज शक्य आहे आणि लोक विचार न करता बिनधास्त ढकलत असतात. खरं तर लेख लिहिताना वाटले होते की इतर लोक असे काही उघड उघड खोटे असणारे संदेश आले असतील तर ते आणि त्यावर का विश्वास ठेवू नये याची कारणमीमांसा टाकतील पण मी असे स्पष्ट लिहायला पाहिजे होते धाग्यातच. आपण आपली विडंबनेच लिहावीत हे बरे :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जयन्त बा शिम्पि Wed, 11/04/2015 - 03:55 नवीन
मी स्वत: जरी वॉट्स अप वापरीत नसलो तरी, अनेकजण संदेश नुसते वाचतात आणि इतरांना पाठवितात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात फार भर पडत नसते हे जाणवते. वाचलेले संदेश लक्षात ठेवले जात नाहीत, लक्षात ठेवुन इतरांना सांगण्याची कला नाही, संवय नाही. लिहुन ठेवण्याची आवड नाही. मग फक्त क्षणभराच्या करमणुकीसाठीच हा खटाटोप करावयाचा कां , हा मला पडणारा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/04/2015 - 05:12 नवीन
परदेशातील नातेवाइकांशी बोलण्यासाठी वाटसप आणि वाइबर वसूल आहे आणि त्यासाठीच वापरतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/04/2015 - 05:22 नवीन
पूर्वी जालावर येणारे HOAX आता वॉट्स अ‍ॅप वर यायला लागले. सुरुवातीला मी त्याला उत्तरे लिहून त्याचा दुवा देऊन लोकांना सावध करायचा प्रयत्न चालविला होता. पण नंतर त्याचा कंटाळा आला. चांगले सुशिक्षित इंजिनियर सुद्धा अशा गोष्टी शहानिशा न करता पुढे ढकलताना पाहून भ्रमनिरास झाला आणि आता मी केवळ एक करमणुकीचे साधन म्हणून त्याच्या कडे पाहतो. सिनेमात नाही का नागीण येउन साप चावलेल्याचे विष परत शोषून घेते. अमर अकबर अंथोनी सिनेमात तिघा जणांचे रक्त एकत्र करून गुरुत्वाकर्षणाच्या मुलभूत नियमाना अपवाद करून वर चढते आणि आईच्या शरीरात पाठविले जाते. किंवा शोले मध्ये वीज नसलेल्या रामगढ मध्ये प्रचंड मोठी पाण्याची टाकी बांधलेली दिसते जेथून विरु आत्महत्येची धमकी देऊन मौसी कडून होकार मिळवतो. या सर्व गोष्टींचा आपण डोक्याला त्रास करतो का? मग वॉट्स अ‍ॅप तसेच आहे समजा आणि त्याचा आनंद घ्या.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 11/04/2015 - 06:51 नवीन
http://rajeevsane.blogspot.fr/2015/05/blog-post_29.html हा ब्लॉग वाचा आणि राजीव दिक्षितांबद्दल मत बनवा.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 11/04/2015 - 07:23 नवीन
गोहत्याबंदी वगैरे मुद्द्यांमध्ये मला पडायचे नाही.आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लोक काहीही कसे फॉरवर्ड करतात हे दाखवून द्यायला हे एक उदाहरण म्हणून घेतले आहे हे समजले.पण---
ह्या म्हाताऱ्या गायींना खायला देणे व इतर देखभालीच्या खर्चाचे काय? हाच पैसा तरण्या गायीना पोसण्यासाठी वापरला तर त्याही शेण आणि गोमुत्र पैदा करतीलच की. शेणाबरोबरच बाकीचेही फायदे देत असतील (दूध वगैरे) तर त्यांना पोसणे जास्ती फायद्याचे नाही का?
हा मुद्दा काही 'हजम' झाला नाही. गाय म्हातारी म्हणून आणि तिच्यापासून आता काहीही उपयोग नाही मारायची? जीव आहे तो. मग म्हातारा झाला म्हणून कापायचा? कधी कुठचा प्राणी पाळला असाल तर तुम्हाला नक्कीच समजेल की ती मुकी जनावरे किती माया लावतात ते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/04/2015 - 13:12 नवीन
आपल्या प्रतिसादाशी सहमत आहेच पण लंबूकडे भूभू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 11/04/2015 - 13:25 नवीन
लंबूकडे भूभू आहे
लंबूटांगचा हेवा करायला हवा मग. आम्हाला दोघांनाही कुत्र्यांची महाप्रचंड आवड असूनही समाधान मानावे लागते रस्त्यावरच्या कुत्र्यांवरच :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यशोधरा Wed, 11/04/2015 - 15:38 नवीन
Ho, lambucha bhu bhu Khupach cute aahe. Lambu, ek don photo taak ki bhu bhu che.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
रेवती Wed, 11/04/2015 - 15:42 नवीन
भूभू दिसायला मोठा आहे पण या समरमध्ये धमाल मुलाच्या मुलाने व मिपाकरीण अस्मितेच्या मुलाने मिळून त्याला खेळून खेळून दमवला होता. शेवटी तो लंबूजवळ येऊन झोपला तो जायलाच तयार नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 11/04/2015 - 15:47 नवीन
Lab aahe na?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 11/04/2015 - 15:49 नवीन
हो. नुसता मोठा दिसतो पण स्वभावानं फार गरीब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 11/04/2015 - 16:23 नवीन
Labu tashshech asatat. Khup goad asatat. Mala pan havaay Labu.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/05/2015 - 05:48 नवीन
+१०००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ल
लंबूटांग Wed, 11/04/2015 - 14:17 नवीन
पण धंद्याच्या दृष्टीने विचार करता तुमच्याकडे समजा २ पर्याय आहेत. जागा मर्यादित आहे असे गृहित धरले आहे.
  1. म्हाताऱ्या गायीला पोसणे आणि शेण आणि गोमुत्रापासून उत्पन्न मिळवणे
  2. दुभत्या गायीला पोसणे आणि शेण गोमुत्राबरोबरच दूधही मिळवणे
तुम्ही कोणता स्वीकाराल? दुभती गाय ठेवणे अधिक फायद्याचे नाही का? पाळीव प्राणी माया लावतात वगैरे अगदी खरी गोष्ट आहे आणि वर रेवती आज्जीने म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे २ भू भू आहेत त्यामुळे तो मुद्दा १००% मान्य. पण गाय पाळीव प्राणी category मध्ये मोडत नाही तर तिला उपयुक्त पशू म्हणून पाळतात असे मला वाटते. असो बाकी चर्चा खवत करू :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
'
'पिंक' पॅंथर्न Wed, 11/04/2015 - 07:42 नवीन
व्हॉट्अॅप हे अफवा पसरवायचे पण एक अधुनिक साधन आहे... दर १५ दिवस / महिन्यांनी "आमुक एक गेला, आपल्या ग्रूप तर्फे श्रद्धांजली" असा मेसेज ठरलेला असतो. आणि प्रत्यक्षात तीच व्यक्ती " बाबांनो मी अजुन जीवंत आहे" हे सांगण्याचा आटापिटा करत असते. आता पर्यंत या व्हॉट्अॅपने किती जणांना जीवंतपणी श्रद्धांजली वाहिली याचा शोध घेतला तर मोठी यादी तयार होईल ..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Wed, 11/04/2015 - 11:50 नवीन
WhatsAppचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की कुणीही आपल्याला ग्रुप वर ॲड करू शकते . ही गोष्ट सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण घातक आहे . समजा , "क्ष" एक अतिरेकी आहे. त्याच्याकडे तुमचा नंबर आहे , व त्याने तुम्हाला एखाद्या समाजविघातक गोष्टी पसरवत असलेल्या ग्रुपवर तुमच्या नकळत ॲड केलं तर पोलिसांचा ससेमिरा तुमच्या मागेही लागु शकतो . त्यामुळे समजा मला कुणी एखाद्या ग्रुपवर ॲड केलं तर मला पॉपअप यायला हवा कि "xxx want to add you in yyy group! You want to join or not? " (सदरील बाबीसाठी whatsapp ला मेल केला , पण अजूनतरी त्यांचा रिप्लाय आला नाही.)
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 11/04/2015 - 12:44 नवीन
+१०० ... पुण्यातल्या एका मित्राला याचा अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. अशाच एका ग्रुपवर (जिथे दाऊदचे नि ओसामाची स्तुती करणारे मेसेज यायचे) त्याला अ‍ॅड केले गेले. त्याने बाहेर पडूनही परत परत अ‍ॅड केले गेले. मग त्याने whatsapp बंद केलं तर फोन सुरु. पोलिस पण काही मदत करेनात. वैतागून त्याने नंबर बंद केला आणि आता तो कोणाला नंबर द्यायला पण दहादा विचार करतो.. (त्याने रितसर तक्रार करायला हवी होती असं आमचं मत पण स्वतःवर वेळ येते तेव्हा जे लगेच त्रास कमी होण्यास होईल ते केले जाते हे ही तितकंच मान्य आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा