Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भय इथले संपत नाही.....

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Tue, 11/03/2015 - 18:32
कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी- गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते- पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून- काळ्याकपारीमध्ये दडलेले- काहीतरी...... जे आहे फार प्राचीन जे आहेदुष्ट क्रूर अन वखवखलेले ज्याचा आहे स्पर्श दाहक ज्याचा विचारही भिववणारा इथला आसमंत भारलेला इथे कशाचीतरी हुकुमत इथली शांताताही असहय इथले आवाज तसेच भयानक इथल्या सावल्या हलतात इथली झाडे कुजबुजतात इथले खडकही शहारतात सततचे नाट्य इथले थांबत नाही भय.....भय इथले संपत नाही.....

प्रतिक्रिया द्या
2100 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चांदणे संदीप Tue, 11/03/2015 - 19:36 नवीन
चला इथे झोपा...जीभ दाखवा..वेडावून दाखवल्यासारखी नको! सरळ बाहेर काढा. दीर्घ श्वास घ्या! हळूहळू सोडा. डोळे बघू. ट्प..ट्प..ट्प.... इथे दुखतय? इथे... इथे...इथे.. ओक्के! कधीपासून होतय असं?? हे अस वर लिहिल्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरलाच कधी विचारायला मिळालं तर? मज्जा!! असो, कविता छानच! मला स्वत:ला अशा टाईपात कविवर्य मंगेश पाडगावकर यांची, "जुन्या वडाच्या झाडाखाली अर्ध्या सुकल्या डोहाकाठी पायघोळ छायांचा डगला घालून फिरते काळी भिती..." ही कविता खूप आवडते! धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 11/04/2015 - 19:20 नवीन
चांगला प्रयत्न. पण हिचकाॅक सारखी हाॅरर नाही. जी.ए.च्या कथेसारखी भयाण नाही. शेवट अंगावर येईल असेकाही लिहा.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/04/2015 - 21:54 नवीन
च्यायला, भय इथले ची आठवण ख फ वर काढली आणि इकडे येऊन बघतो तर त्याच नावाचं काही.... हे बीभत्स रसाचं उदाहरण काय डॉ. भयंकर झाला, हा झाला आता उद्या नवीन. :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/04/2015 - 21:54 नवीन
च्यायला, भय इथले ची आठवण ख फ वर काढली आणि इकडे येऊन बघतो तर त्याच नावाचं काही.... हे बीभत्स रसाचं उदाहरण काय डॉ. भयंकर झाला, हा झाला आता उद्या नवीन. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा