पाककृती

आवळ्याचे भरीत

Primary tabs

दिवाळी आली की बाजारात आवळे दिसायला लागतात आणि ते दिसले की आम्ही खूष कारण आवळ्याचे भरीत, लोणचे हे आई घरी करायला सुरुवात करायची.

.

फोटो आंतरजालावरुन साभार

आवळ्याचे भरीत म्हणजे तसा थोडा वेगळा पदार्थ पण एकदा चव घेतली की ते कायमचं आवडीचं तोंडीलावणं होत.

साहित्य :
५ आवळे
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा मोहरी
१ चमचा हिंग - फोडणीसाठी
पाव चमचा तळलेल्या मेथीची पुड
साखर चवीनुसार
हींग पाव चमचा
२ चमचे तेल - फोडणीसाठी
मीठ चवीनुसार
२ चमचे दुधाची साय
अर्धा चमचा दही.

कॄती :
प्रथम आवळे उकडून घेणे. फोडी करुन बिया काढणे. (आवळे उकडलेले पाणी टाकुन न देता, ते सरबत अथवा नुसते मीठ घालुन पीउ शकता. हे पाणी अतिशय आरोग्यदायी असते)

नंतर, २ आवळे मिरच्या, अर्धा चमचा मोहरी व मीठ मिक्सर वर बारीक करुन घेणे. तळलेली मेथी मिक्सर वर बारीक करुन घेणे.

वरील सर्व मिश्रण आवळ्याच्या फो़डीला लावुन घेणे. चवी प्रमाणे साखर व मीठ घालुन कालवावे.

दोन चमचे तेल कढई मधे गरम करुन त्यात हींग व मोहरी घालुन खमंग फोडणी करावी. वरील मिश्रणात दही व साय घालुन एकत्र करावे. फोडणी थंड झाल्यावर मिश्रणावर घालणे व एकत्र करणे.

.

(दही, साय व फोडणी घालण्या पुर्वी मिश्रण फ्रिज मधे ठेवुन ऐनवेळी लागेल तेंव्हा मिश्रणात दही, साय व फोडणी घालुन सर्व्ह करु शकता. ८ दिवस सहज रहाते.)

चविष्ट, आरोग्यदायी तसेच पचनास उत्तम असे आवळा भरीत तयार..असं थोडं हटके तोंडीलावणं करुन तर बघा नक्की आवडेल.

प्यारे१

आमच्या नावची पाकृ आली. भरून पावलो.

दिपक.कुवेत

हम्म... पण फोडणीचा तडका अंमळ जास्तच लागलाय का तूला? (ह.घे.)

दिपक.कुवेत

तर आहेच शीवाय हटकेच. ईथे मिळतात आवळे. नक्कि करुन खाईन.

स्वाती १

वा.
आवळ्याचे भरीत ऐकलं नव्हतं. आता करून बघणार.

मोगा

दिवाळीनंतर आवळ्याच्या झाडाखाली आवळी भोजन करतात. त्यात हा एक मेन्यु असतो

रेवती

आवळ्याचे भरीत असते हे वाचून आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कृती आवडली.

जातवेद

कच्च्या पपईचे लोणचे, आवळ्याचे भरीत...नेक्श्ट इज व्हॉट?

अनन्न्या

लोणचं दह्यात कालवतात तसेच वाटतेय. तोंपासु आहे एकदम!

यशोधरा

वेगळंच आहे हे. झणझणीत असेलसे वाटते.

वांग्यांचे असो वा लाल भोपळ्याचे भरीत मला खूप आवडतं.
ही पाकृ वाचून आणखी एका प्रकारच्या भरीताची भर पडेल असे वाटत आहे.

पाकृ आवडली.

मनिमौ

पहिल्यांदा वाचली मी ही पाकृ. मस्त चटकदार लागत असणार आहे.

पैसा

हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. छान होत असणार.

इडली डोसा

आवळ्याचे भरीतपण करतात हे माहित नव्ह्तं. मस्त!

मंजूताई

प्रकार. मी आलं घालून तक्कु करते तो पण खूप छान लागतो.

अस्मी

मस्त पाकृ...नवीनच कळली.
लाल भोपळ्याच्या दह्यातील भरतासारखीच दिसतेय :)