Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवकविता - ट्रॅफिक जॅम

व — वेल्लाभट, गुरुवार, 11/05/2015 - 08:28
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D विडंबन वगैरे समजू नये. मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे. प्लीज रिस्पेक्ट दॅट. इट्स ओरिजिनल. नवकविता - ट्रॅफिक जॅम उशीराच तरीही पुन्हा मी निघतो त्या भयाण प्रवासासाठी जणू फरफटत नेतं मला माझं नशीब नशिबाचं काय म्हणा नशीब त्याचंही असतं जो खच्चकन चाकूचा वार केल्यासारखा जातो... जातो मला कट मारून... आणि त्या मन गोठवणा-या थंडीत रागाचा ज्वालामुखी मला चटके देतो... आतून मी तसाच... तसाच माझ्या लेन मधे हताश... बघत राहतो गाड्या आजूबाजूच्या, पुढच्या गुदमरत, कुढत, कुजत डोळे बधीर करणारे ते असंख्य चमकते एलईडीचे रक्तरंगी तारे बघत आज काय काल काय उद्या काय ट्रॅफिक कधीच संपत नाही फक्त लेन बदलत राहते कधीतरी मीही असतो वाढलेल्या ताटासारखा हिरवा सिग्नल मिळणारा मग हाणतो मी गाडी त्वेशाने करतो डाउनशिफ्ट एखाद्याचा हात पिरगळावा तसं एक्सिलेटर वर पाय देतो सिगरेट विझवल्यागत काही क्षणातच पण कुणीतरी माझाच गळा आवळावा असा ब्रेक लावावा लागतो कारण.. आज काय काल काय उद्या काय ट्रॅफिक कधीच संपत नाही मग पुन्हा मी तसाच... तसाच माझ्या लेन मधे हताश... बघत राहतो गाड्या आजूबाजूच्या, पुढच्या गुदमरत, कुढत, कुजत डोळे बधीर करणारे ते असंख्य चमकते एलईडीचे रक्तरंगी तारे बघत

प्रतिक्रिया द्या
5346 वाचन

💬 प्रतिसाद (10)
द
दमामि गुरुवार, 11/05/2015 - 08:37 नवीन
छान!!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 11/05/2015 - 09:14 नवीन
:) जमलीये.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/05/2015 - 09:20 नवीन
या कवितेला नवकवितेच्या अंधारजगात कृष्णविवराचे स्थान मिळावे ही सदिच्छा (तारांगणात ध्रुवतार्‍याचे स्थान ह्या नवकवितेच्या लेखी क्लिश असलेल्या प्रतिमेचे विद्रोही रूप, या अर्थाने!) ;-)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/05/2015 - 13:12 नवीन
वाह!! कं लिवलाय, पन कं लिवलाय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
श
शिव कन्या गुरुवार, 11/05/2015 - 18:22 नवीन
पिपात मेले .... आठवले. वास्तव!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/05/2015 - 18:24 नवीन
वेल्ला, क्या हुई?
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/06/2015 - 02:35 नवीन
अशा कविता लिहिणा-यांच्या बुटात पाय घालण्याचा एक दुबळा प्रयत्न बाकी काही नाही. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे... 'गडगडाटी पाउस पडला' या उक्तीचे विद्रोही रूपांतर करा. = आकाशाने आपला उर बडवून, वेदनेच्या अश्रूंना वाट करून दिली." शिकतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संदीप डांगे गुरुवार, 11/05/2015 - 18:57 नवीन
ओ अण्णा, णाषिक ला या लवकर राहायला...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/06/2015 - 02:38 नवीन
हाहा. होय थंडी पडूदे जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वेल्लाभट Fri, 11/06/2015 - 02:38 नवीन
ऑल ना थँक्स
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा