समानता
समानता
आम्ही(सह कुटुंब आणि सह परिवार) मागच्या वर्षी आमचे पासपोर्ट काढायला पासपोर्ट सेवा केंद्र मालाडला गेलो होतो. आम्हाला वेळ सकाळी ११ ची दिली होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या फाटकाच्या बाहेर १०.५० ला रांगेत उभे राहिलो.आमच्या मागे रांगेत पासपोर्ट काढायला एक मुसलमान माणूस उभा होता. त्याच्या बरोबर त्याची बुरखाधारी बायको, दोन मुली वय वर्षे पाच आणि साडेतीन आणि एक मुलगा वय वर्षे दोन असे उभे होते. त्या माणसाने एक कॅड्बरी( मिल्क चॉकलेट) आणली आणि त्या मुलाला दिली. त्या दोन्ही मुलीनी थोडा वेळ ते मुल कॅडबरी खात होते तेथे पहिले आणि नंतर पाहणे सोडून दिले. त्या दोन निरागस आणि निष्पाप मुलींकडे पाहून माझ्या पोटात कुठेतरी तुटत होते. एक क्षण आपण दोन कॅडबरी आणून त्या मुलीना द्याव्या असेही वाटले परंतु त्या माणसाचा अहं दुखावला गेला असता म्हणून गप्प बसलो.
जो माणूस पासपोर्ट काढायला उभा होता त्याला दहा रुपयाच्या दोन कॅडबरी दोन मुलीना देण्यासाठी नव्हते हे तर शक्यच नाही. आश्चर्य म्हणजे त्याच्या बायकोनेही एक चकार शब्द काढला नाही. मी माझ्या बायको आणि दोन्ही मुलांना( मुलगा आणि मुलगी) ते दाखवले आणि सांगितले कि केवळ मुलगा म्हणून त्याला कसे वेगळे वागवले जाते ते पहा. असे करणे किती चुकीचे आहे तेही सांगितले. दुर्दैवाने मी तेथे काहीच करू शकत नव्हतो.
तीन दिवसांपूर्वी माझ्याकडे एक उत्तर भारतीय स्त्री तिच्या गरोदरपणाची सोनोग्राफी करायला आली होती. तिच्या बरोबर तिची बहिण, त्या बहिणीची ३-४ वर्षाची गोड मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा सुद्धा आले होते. त्या सर्वाना मी आतल्या खोलीत( जेथे सोनोग्राफी यंत्र आहे) तेथे घेतले. माझ्याकडे आलेल्या सर्व लहान मुलांना मी एक चॉकलेट देतो. ती माझ्या ड्रोवरमध्ये एका बरणीत भरलेली असतात. त्या दोन्ही मुलांना मी एक एक चॉकलेट दिले आणि सोनोग्राफी चालू केली. त्या मुलाने आपले चॉकलेट खाल्ले आणि अजून हवे म्हणून तो रडू लागला. त्यावर त्या रुग्णाच्या बहिणीने(मुलीच्या आईने)त्या मुलीला तिचे चॉकलेट त्या मुलाला द्यायला सांगितले. त्या इतक्या निरागस मुलीने ते त्याला दिले सुद्धा. मला जरा धक्काच बसला. तो "मुलगा" म्हणून लाडावलेलाच वाटत होता. दुसरे चॉकलेट खाल्ल्यावर थोड्या वेळाने त्या मुलाने परत चॉकलेट हवे म्हणून मागणी केली. मी "अजून" चॉकलेट देणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले. त्या मुलाने रडायला सुरुवात केली. मी वैतागून त्याच्या आईला सांगितले कि त्याला बाहेर घेऊन जा. त्याच्या रडण्याने मला डिस्टर्ब होतोय आणि माझी काही चूक झाली तर तुमच्या बहिणीला ते महाग पडेल. त्यावर ती बहिण मुलाला घेऊन बाहेर गेली. मी सोनोग्राफी सुरु केली . मग माझ्या मनात एक विचार आला. मी त्या छोट्याशा मुलीला विचारले, "आपका चॉकलेट तो आपका भाई खा गया ना? आपको चॉकलेट चाहिये?" त्यावर ती घुटमळली. मी तिला एक चॉकलेट काढून दिले. ते ती खिशात टाकणार होती. मी तिला म्हणालो आप अभी ये खा लो. नाही तो आपका भाई फिरसे मांग लेगा. तिला ते पटले आणि तिने ते खाल्ले आणि माझ्याकडे बघून गोड असे स्मित केले. मला पण छान वाटले.
मला राहून राहून एक गोष्ट डाचत राहिली कि इतक्या लहान निष्पाप आणि निरागस मुलींवर त्यांचे आईबाप इतक्या सहजतेने अन्याय का करतात. केवळ त्या मुली आहेत म्हणून? आपल्याला समान हक्क मिळाला पाहिजे हि जाणीव त्या बिचार्या मुलींची कलीकावस्थेतच अशी का खुडून टाकली जाते? लहानपणी असेच वागवले गेले असल्याने त्यांच्या आया सुद्धा कदाचित मुलाला मुलीपेक्षा जास्त झुकते पारडे देत असाव्यात.
कदाचित यामुळेच मुलीसुद्धा मोठ्या झाल्या कि त्यांच्या मनात खोल रुजलेली पुरुष श्रेष्ठत्वाची भावना काढून टाकणे अशक्य होते.
स्त्री पुरुष समानता हि लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवली पाहिजे तरच पुढच्या पिढीत समानते साठी लढ्याची गरज पडणार नाही.
💬 प्रतिसाद
(80)
प
प्यारे१
Fri, 11/06/2015 - 09:33
नवीन
अनेकदा हां संस्कार घरात च बिंबवलेला असतो. बायकांनी साधी मांडी घालून बसायचं नाही, उगाच पाय मुडपुन. ताट म्हणून एखादी झाकणी घ्यायची, शिळं अन्न खायचं वगैरे उद्योग सुरु असतात.
जेवताना मोठं ताट घ्या, व्यवस्थित बसा, शिळयाची सामान वाटणी किंवा त्याला सजवून किंवा अगदी बाहेर टाकून देणं किंवा कुठल्या प्राण्याला खाऊ घालणं. शक्यतो एकत्र च जेवायला बसणं हे प्रकार आमच्या घरी सुरु असतात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 11:38
नवीन
ते मांडीघालून बस्णे सोडले तर बाकीच्या बाबतीत सहमत :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 11/06/2015 - 09:37
नवीन
हे जेवण्याचे झाले.
माझ्या क्लिनिकमधला एक नेहमीचा अनुभव आहे.मुलीच्या दाताच्या ट्रीटमेंटवर लोक खर्च करायला लवकर तयार होत नाहीत.उपटून टाका.असा मलाच सल्ला देतात.हेच लोक मुलाचा दात दुखत असेल तर मात्र वाचवा मॅडम.कितीपण खर्च येऊ दे! त्या घोड्या झालेल्या मुलाला घेऊन आईबाप दोघे काय येतात.त्याला इंजेक्शन देताना डोळे झाकून घेतात.त्याचा हात पकडून बसतील.मुलींना असे प्रेमाने ट्रीटमेंटला आणताना हा अनुभव क्वचितच दिसतो. त्यातही लग्नाची मुलगी असेल तर गोळ्या द्या.तिचा नवरा घेईल बघून असाही अॅटिट्युड अनुभवला आहे.लग्न होऊन पोरगी गेली आणि तिचे बरेच डेंटल प्राॅब्लेम निघाले तर सासरचे लोक माहेरी जाऊन करुन ये म्हणतात.या चक्रात वर्ष वर्ष गोळ्या खाऊन दुखणं सहन करणाऱ्या मुली नित्य पाहण्यात येतात :(कदाचित् अामचा निमशहरी भाग म्हणून हे चित्र जास्त दिसत असावे.
म्हातारपणी मुलींकडून सर्व सेवा करुन घेऊन मुलगा आहे म्हणून मुलग्याच्या नावाने सर्व करून जाणारे एक नातेवाईक पण आहेत.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/06/2015 - 09:41
नवीन
सत्तर वर्षापूर्वी माझ्या आईच्या घरात समानता होती. त्याचा आज अभिमानच वाटतो. घरची गरिबी होती. वर्षभराचं सामान एकदम घेतलं की स्वस्त पडत असे. तांदूळ, गहू वगैरे निवडायला आजोबा आजी आई आणि तिचे तिनही भाऊ असे सगळेच बसत. रोजच्या भाजी निवडण्यातही सर्वांचा नंबर असे. मुलगा मुलगी असा भेद झालाच नाही. आजोबा स्वतः पातेल्यात बघून जेवणारे होते. तेच वळण पुढे राहिले.
आमच्या घरातही, समारंभ असला की पुरूष बसतात आधी पण बायकांना उरले नाही असे होत नाही, आणि आम्ही भाऊ आमचे काका असे सगळेच वाढायला उभे राहातो. हात धुवून पानसुपारी करत लवंडायचे हा शिरस्ताच नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 11/06/2015 - 09:59
नवीन
चांगलं लिहिलंत! स्वतःपासून सुरुवात करावी हे उत्तम. त्या त्या घरातला मुलगा/मुलगी पुढच्या आयुष्यात अजून एक घर सुधारतील. माझ्या नातेवाईकांतच पाहिलेले दोन प्रसंग डोक्यात घट्ट रुतून बसलेले आहेत. आठवलं तरी संताप होतो. यातली सर्व पात्रे उच्च विद्या विभूषित आहेत.
एका ठिकाणी घरातला १३/१४ वर्षाचा एकुलता एक मुलगा आधी पोळ्या मागून घेत होता आणि मग त्या नको म्हणून उशिरा त्याच्या बाजूला जेवायला बसलेल्या आईच्या पानात अक्षरशः कुत्र्या-मांजराला घातल्यासारख्या फेकत होता. मी न राहवून त्याच्यावर ओरडले, तर त्याची आई आजी उलट "कचर्यात टाकत नाही ना" म्हणून त्याची कौतुकं करत होत्या. त्याच्या आईला असे सगळे नको असलेले खाऊन आता वजन आणि बीपीचा भयानक प्रॉब्लेम झाला आहे. ही आई नोकरी करणारी. ती नवरा आणि मुलगा दोघांच्या नंतर घरात शिरली तर बापलेक दमून खुर्चीत तंगड्या वर करून बसलेले असतात. मग फ्रीजमधले पाणी आईने त्यांच्यानंतर येऊन ग्लासात ओतून त्यांच्या हातात द्यायचे. वर ते दमून येतात म्हणून नखरे. अग, तू नाही का दमून आलीस??
दुसर्या एका ठिकाणी आम्ही ७/८ जण एका मुलीकडे जेवायला गेलो होतो. तिने दीड वर्षाच्या मुलाला सांभाळून स्वयंपाक तयार ठेवला होता. म्हटले लहान मुले आधी जेवू देत मग आपण जेवू. तर आमच्याकडे तशी पद्धत नाही म्हणे. आणि आम्हाला सगळ्याना जेवायला बसवून ती रडणार्या मुलाला सांभाळत एकटी वाढत राहिली. तिचा नवरा पण आरामात गप्पा हाणत जेवत राहिला. मला तर तिथून पळून जावेसे वाटत होते. बरं हे वाढणं साधं नव्हे. गॅसवर उसळ आणि आमटी गरम करत ठेवलेली सतत. आणि ती तशीच वाफा येणारी वाढायची म्हणे. आमच्याकडे अशी पद्धत आहे याचं कौतुक वरून. या प्रसंगानंतर पुन्हा कधी तिच्याकडे जेवायला गेले नाही.
आमच्याकडे लै भारी प्रकार आहे. मी कुठे बाहेरगावी गेले आणि मुले घरात दोघेच असतील तर मुलगा मुलीपेक्षा लहान असूनही रोटी मेकरवर रोट्या करून आम्लेट वगैरे करून स्वतःचे पोट भरतो आणि बहिणीला पण जेवू घालतो. =))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/06/2015 - 10:11
नवीन
मुलीला मराठी शाळेत घालणे व मुलाला कॉन्व्हेंटात, हा प्रकार माझ्या पहाण्यात आहे.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 11/06/2015 - 11:15
नवीन
खरंय. हे मी पण माझ्या एका मैत्रिणी च्या सासरी बघितलंय. या मैत्रिणीचा नवरा आणि दीर कुठल्यातरी प्रतिष्ठित शाळेत आणि नणंद साध्याशा शाळेत. ते पैसे वाचून मोठा दहेज देणार आहेत म्हणे मुलीच्या लग्नात.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 11/06/2015 - 11:18
नवीन
सॉरी दहेज देणार आहेतच्या ऐवजी दिला असे वाचावे.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 11/06/2015 - 10:19
नवीन
आमच्या घरी छोटासा कार्यक्रम असेल तर सगळे एकत्रच बसतात . माफक आग्रह चालतो, पण उगा तडस लागेपर्यंत नसतो आग्रह . वर ताटात अन्न टाकून देण्याचे अनुभव वाचले त्यावरून माझ्या पहिल्या संघाच्या शिबीरातला अनुभव आठवला...मी असेल पाचवी किंवा सहावीत, पहिलेच जेवण आणि वाढप्याने चुकून २ चपात्या जास्त वाढल्या . आता त्या जाणारच नव्हत्या . सगळ्यांची जेवणे झाली . मी ताटात तसंच अन्न ठेवून उठू लागलो तर हातात दंड घेतलेला स्वयंसेवक उठूच देईना ! अगदी रडकुंडीला आलो . तरी ताट साफ केल्याशिवाय उठू देत नव्हते . माझ्यापेक्षा थोडा मोठा असलेला एक "अनुभवी" मित्र आला भाजी तांब्यात टाकली पोळ्या कनातीखालुन बाहेर आणि नेलं ताट धुण्यासाठी ! तेव्हापासून सवय पडली पंगतीत थोडं कमीच अन्न ताटात घ्यायचं . रच्याकने संघाचे प्रचारक लोक कधीच ताटात भाताचा एक शित सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 11/06/2015 - 10:29
नवीन
राजाभाऊ खाडिलकर म्हणून संघाचे विभाग प्रचारक आमच्याकडे जेवायला आले होते. त्यांनी जेवल्यानंतर ताट असं काही स्वच्छ केलं होतं की जणू जेवायला ताट वाढलंय.
आमटीची वाटी स्वच्छ केली त्यात प्यायचं पाणी घालून ती पयाले. (असं साधारणत: कुणी करत नाही म्हणून लक्षात राहिलंय)
बा द वे फोकस जेवण वाया घालवू नये वर आला आहे समानतेकडून.
-फोकस्ड होण्याच्या प्रयत्नात
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 11/06/2015 - 17:19
नवीन
राजाभाऊ नाही. शरदभाऊ खाडिलकर.
प्लीज अपडेट.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Fri, 11/06/2015 - 10:28
नवीन
याच विषयावर 'पण लक्षात कोण घेतो' कादंबरी लिहीली गेली आहे. वाचाच वाचा. ऑल टाईम फेवरेट!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 11/06/2015 - 10:35
नवीन
माझ्या दोन्ही मुलांना सर्व चारी ठाव स्वयंपाक उत्तम करता येतो, परंतु हल्लीच्या अनेक शिक्षित लग्न झालेल्या मुलींना मात्र येत नाही, परिणामी नवरे स्वयंपाक करतात किंवा पिझे मागवून लठ्ठ होत अपचनादि रोगांना बळी पडत असतात, असेही बरेच बघायला मिळते. स्वतः स्वयंपाक करून 'प्रेमाने खाऊ घालणे' हे अलिकडे फार मोठ्या शहरातून फार कमी बघायला मिळते.
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
Fri, 11/06/2015 - 11:14
नवीन
१००% सत्य. स्वतः कमावुन होम डीलीवरी मागवणे हेच सुरु आहे. त्यात अजुन एक फॅड म्हणजे फक्त होम डीलीवरी देणार्या हॉटेल्सचा उदय. मस्त चमचमीत जाहीरात छापायची, वितरीत करायची. मागवा घरपोच बिर्याणी, चिकन वगैरे वगैरे पाहीजे तेवडे. हॉटेल नाही, जागा भाड्याने घ्यायची कटकट नाही राहत्या जागेत स्वयंपाक करुन ऑर्डरी पुर्ण करायच्या.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 11/06/2015 - 11:22
नवीन
मुद्दा अगदी बरोबर आहे. पण धाग्याचा हा विषय नाही.
नाही म्हणाजे आता चर्चा "आजकालच्या बायका स्वयंपाकच करत नाहीत" ह्या विषयाकडे वळेल म्हणुन म्हणलं.
बाकी मिपा आपलंच आहे!
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Fri, 11/06/2015 - 11:54
नवीन
माझ्या निरिक्षणानुसार सुशिक्षित व आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गात आजही जोडप्याला एक मूल असते - मुलगा असो वा मुलगी. फार तर दोन. मात्र आर्थिक दृष्ट्या खालच्या वर्गात पैसा, जागा, वेळ या सर्वाची कमतरता असतानाही अनेकदा मुलगा होइपर्यंत मुलीना जन्म दिले जातात. नवरा बायको तीन चार मुली आणि कुलदिपक अशी अनेक कुटुंबे आजही दिसतात. या कुलदिपकाला कुठली जहागीर राखण्यासाठी जन्म देतात ते त्याचे आईबापच जाणे
मुलगा - मुलगी असा फरक मात्र अगदी सुशिक्षित व सुस्थितील कुटुंबातही केला जातो. मुलीला वैद्यकिय शिक्षण घ्यायची हौस व बुद्धी असतानाही जर देणगी प्रवेशाची वेळ आली तर तो घेतला जात नाही, मुलाला मात्र घेतला जातो. कदाचित मुलगी उद्या लग्न होउन जाईल, एव्हढा पैसा तिच्यावर कशाला खर्च करायचा असा विचार केला जात असावा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 11/07/2015 - 06:01
नवीन
सहमत
आमच्या एका नातेवाईकांच्या कडेच असे दिसले. मुलगा आणि मुलीत एक वर्षाचेच अंतर आहे. पण मुलाला आय बी स्कूल मध्ये आणि मुलीला सी बी एस इ मध्ये. मुलाला तुला करियर करायचे आहे म्हणून आठवी पासून घोड्यावर बसवलेलेआणि मुलीला मात्र तुला काय आराम करायचा आहे. हे इतके कि तो मुलगा सुद्धा आपल्या बहिणीला नववीत म्हणाला तुला काय सासरी जाऊन ऐश करायची आहे. मला मात्र करियर केल्याशिवाय गत्यंतर नाही. मुलाला यासाठी दरवर्षी ३५ लाख भरून अमेरिकेत इंजिनियरिंगला पाठवले आहे. आणि मुलगी पुण्यात सप (का गरवारे) मध्ये कला शाखेत आहे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 11/07/2015 - 11:14
नवीन
मागे मी एकदा शैक्षणिक कर्जाची चवकशी करण्यासाठी बँकेत गेलेलो असता त्या खात्याचा प्रमुख म्हणाला की हे कर्ज जरी विद्यार्थांनी शिक्षण संपल्यावर सुमारे सात वर्षात फेडायचे असले, तरी आम्ही ते तुम्हीच फेडायचे आहे असे गृहित धरून चालतो, आणि त्याप्रमाणे तुमची मिळकत, मालमत्ता वगैरेंचे पुरावे मागत असतो. कारण विशेषतः मुलींचे बाबतीत असे घडते, की शिक्षण संपल्यावर त्यांचे लग्न झाले तर वीस-चाळीस लाखांचे कर्ज डोक्यावर असलेली मुलगी सासरच्यांना नको असते, आणि तिने नोकरी करून हे कर्ज फेडावे हेही मान्य नसते. उत्तर भारतात मुळात मुलीचे लग्न हा अतिशय खर्चिक प्रकार असतो, त्यातून हे कर्ज फेडणे बर्याच पालकांच्या आवाक्याबाहेरचे असते.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 11/06/2015 - 12:03
नवीन
हे सर्व अनुभव वाचून वाईट वाटले!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 11/06/2015 - 12:23
नवीन
जेपी कहां है...कहां है जेपी?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 11/06/2015 - 12:31
नवीन
डॉक्टरसाहेब,
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद!
हे असमानता प्रकरण जळीस्थळी काष्ठीपाषाणी आढळत असतं. जरा वेळाने माझे पण अनुभव नोंदवतो.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 11/06/2015 - 17:46
नवीन
स्वतःच्या अपत्यांमध्ये मुलग्यांना मुलींपेक्षा झुकते माप देण्याची उदाहरणे लक्षणीय प्रमाणात दिसतात.
परंतु समानतेने वागवण्याची उदाहरणेही अगदीच क्षुल्लक म्हणता येणार नाही.
याबाबतीत सुधारणेचा वेग मात्र नक्कीच पुरेसा नाही.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 11/06/2015 - 20:50
नवीन
एक निरीक्षण असे आहे की सुनेवर वचक ठेवण्याच्या नादात सासू स्वतःच असल्या मूर्ख रूढींना आंजारत गोंजारत बसते.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 11/06/2015 - 21:35
नवीन
हो हो, बर्याचदा बायकाच याला खत पाणी घालतात. आपल्या घरातला कर्ता पुरुष जितका असा तथाकथित निकषांवर यशस्वी असेल तितकं त्यांना "सेफ" वाटत असेल. पण हे पुन्हा मागे जातं, लहानपणी नकळत पणे वर डॉक च्या किश्यांमध्ये आहे तसं सतत जर बिंबवलं की तुला संरक्षण हवंय आणि कर्तृत्ववान भाऊ , पिता मग नवरा , मग मुलगा ही तुझ्या प्रतिष्ठेची नीव आहे तर हेच होणार.
शिवाय यात अजुन एक गोष्ट आहे, बरेच पुरुष सोयिस्कर रित्या अशा रितीभाती मानायला लागतात मग. कारण काम करावं लागत नाही. सन्माननीय अपवाद आहेत जे म्हणतात की मी माझ्या हाताने करतो, आणि हे प्रमाण वाढतं आहे पण अजुन ही पुरेसं नाहीये.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/06/2015 - 22:29
नवीन
सहमत आहे. बायकांनीच रडारड थांबवून आपल्याला हवं ते करून घ्यायला हवं. जे जमणार नाही तिथे स्पष्ट्पणे नाही म्हणायला शिकावं. जे आगावूपणा करतील त्यांना फाट्यावरच मारावं! उग्गीच घरोघरी टीव्हीवरच्या शिरियला हव्यात कश्याल!
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/06/2015 - 22:27
नवीन
काय अचरटपणा आहे! हे करवतं तरी कसं ते एक त्यांनाच ठाऊक? कडीशनिंग म्हणे! अरे (निदान) आपल्याच बाळांच्या बाबतीत कसलं आलय कंडिशनिंग? ठोकून काढायला पाहिजे एकेकाला. सगळ्यांकडेच भरपूर उदाहरणे असतील सांगायला आणि हे नुसतं भारतातच आहे असं नाही.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Sat, 11/07/2015 - 06:57
नवीन
आमच्या घरात मुलगा मुलगी भेदभाव कधीच केला गेला नाही .
आम्ही सगळे कायम एकत्रच जेवायला बसतो ,घरी काही कार्यक्रम असतो तेव्हाही जेवायला सगळे एकत्रच बसतो
मी लहान असताना आई ,बाबा दोघ सकाळी नऊ वाजता सगळा स्वयंपाक करून बाहेर पडायचे
आई नाश्ता बनवेपर्यंत बाबा कपडे वाळत घालायचे , बाबा कणीक मळून , कुकर लावायचे ,भाज्या चिरून ठेवायचे
आमचे आजोबा (आईचे वडील )सुद्धा घरात सगळी काम करायचे
आणि दुसरे आजोबा सुद्धा घरी धान्य निवडणे ,झाडून घेणे अशी काम करायचे
तिसरीत असल्यापासून रोजचा चहा माझा भाऊ करतो , दुध आणून तापवायचं आणि विरजण लावून ताक करण्याच काम त्याच्याकडे आहे
सातवीत असल्यापासून तो पोहे,शिरा बनवतो
दर शनिवारी रात्री मुगाची खिचडी बनवतो जेवणासाठी
मी लहानपणापासून घरातल्या पुरुषांना घरात काम करताना पाहिलंय
आणि आमच्याकडे यात कुणालाही काही विशेष वाटत नाही
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 11/07/2015 - 11:25
नवीन
आमच्या जवळ रहाणार्या एका हरियाणवी कुटुंबातील मुलगी चांगली शिकली, आणि ७०-८० हजार महिन्याची नोकरी करू लागली. लग्नानंतर सासरी नोकर वगैरे असूनही सासू - सासर्यांना वाटायचे की सुनेने सकाळचा चहा स्वतः करावा आणि एकत्र बसून सर्वांनी चहा घेऊन मग नोकरीवर जावे. यावरून त्या मुलीची आई मोबाईलवरून मुलीला सारखी निर्देश द्यायची की तू त्यांचे ऐकू नकोस, तू नोकरी करून कमावतेस, मग तू का चहा बनवतेस... वगैरे. शेवटी तिने मुलीला ( तिच्या पगारासाठी ?) कायमचे माहेरी बोलावून घेतले.
- Log in or register to post comments
ब
बिहाग
Sat, 11/07/2015 - 17:07
नवीन
हे पूर्वी म्हणजे ३० वर्षापूर्वी वगरे बघीतलेल आहे. पण २०१५ मध्ये सुध आहे होते?
माझे अनुभव ( मी बहुदा मंगळावर राहतो)
प्रसंग १ ( २००२ सुमाराचा)
मित्राचे लग्न (दाखवून ) ठरले होते.दोघेही घराबाहे पण भारतात एका शहरात नोकरी करत होते.
मित्र :( होणार्या बायकोला ) पुढे जेवणाचे काय करायचे?
तिचे उत्तर ( प्रश्न )
तू सध्या कुठल्या मेस मध्ये जातोस?
मित्र :-- अबक मेस मध्ये.
वाहिनी :- फारच चांगले. उद्यापासून मी पण तिकडेच.
प्रसंग 2 ( २०१५)
बहिण भावाला घेऊन तिच्या घरी येते. ( भाऊ तिचा गावात काही कामासाठी आलेला आहे)
बहिणीचा नवरा रविवारी आरामात टीवी बघत बसला आहे.
बहिण तिचा नवर्याला , :- अरे तू सगळ्यांसाठी चहा करतोस का?
तिचा नवरा :- ( Sherlock Pause करून) करतो की. खरच उठतो आणि चहा करतो.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Sat, 11/07/2015 - 21:35
नवीन
पहिला प्रसंग बहुधा पुणे नामक शहरातील असावा ! असा अंदाज व्यक्त करतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2