बिहारच्या निकालाचा अर्थ.
आताच बिहार निवडणूकीचे निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. दिल्लीप्रमाणे बिहार्मध्ये देखील भाजपाचे पानिपत होणार आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. या निकालाचे अर्थ आणि त्याचे भारतीय राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम यांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
मला दिसणारा या निकालाचा अर्थ -
भाजपासाठी -
१. अजूनही भारतात जातीय समीकरणांच्या पलिकडे जाऊन विजय मिळवणे कोणालाही शक्य नाही.
२. भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर अजूनही भाजपा जिंकू शकत नाही. भाजपाला जनाधार अजून वाढवण्याची गरज आहे.
३. मतांच्या टक्कीवारीत भाजपा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बहुरंगी लढत झाली असती तर भाजपाला वाव होता. त्याचबरोबर भाजपाच्या टक्केवारीत घट पण आलेली दिसते. लोक्सभा - २९.क्ष. याचाच अर्थ नवमतदारांनी भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. भाजपाला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
इतरांसाठी -
१. वर लिहिल्याप्रमाणे जरी भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर भाजपा हरू शकतो, ही गोष्ट खरी असली. याचे कारण स्थानिक युत्या हे आहे. भविष्यकाळात भाजपाला पर्याय म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचे की आपापली ताकद वाढवायची याचा देखील या सार्यांना विचार करावा लागेल.
२. नितीशकुमारांना या सार्याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे वाटते. त्यांनी आपल्या हातांनी राजदला सुकणार्या झाडाला खतपाणी घालून पुनरुज्जीवीत केले आहे. त्यांच्या खेळ्या आत्ता तरी योग्य वाटतायत. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः., अर्थात बहुरंगी लढत झाली असती तर संजदला दुसरे स्थान देखील मिळणे कठीण होते असे दिसतेय.
३. काँग्रेसला या निवडणूकीतून पुनरागमन करायची संधी मिळाली आहे, त्याचा ते कसा उपयोग करून घेतात यावर सारे अवलंबून आहे.
मला दिसणारे परिणाम -
१. या सार्याचा विचार करता उत्तर प्रदेश भाजपासाठी खूपच कठीण जाणार असे वाटते. भाजपा आता अधिक आक्रमक होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती आलेली आहे.
२. वैयक्तिक मोदींच्या करिश्म्यापेक्षा देखील रिझल्टला अधिक महत्व आहे ही आता तरी त्यांना कळेल अशी आशा आहे.
३. २०१९ मध्ये भारत पुन्हा त्रिशंकू लोकसभेच्या द्रूष्टीने वाटचाल करत आहे असे वाटते.
४. नितीशकुमारांच्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षेला त्यांच्याच कर्मांनी ब्रेक लागला आहे असे सध्या तरी वाटत आहे. आता परत ते गाडी कशी सोडतात ते पहायचे.
जाणाअरांची मते समजून घेण्यास उत्सुक.
💬 प्रतिसाद
(63)
अ
अर्धवटराव
Sat, 11/14/2015 - 23:50
नवीन
लालु राजकारणात अजीबात अडाणी नाहि. त्यांच्याकडे भरपूर पेशन्स आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचा इंटरेस्ट आपल्या मुलांना सेटल करण्यापुरताच राहाणार आहे. संभाव्य तिसर्या आघाडीतला सर्वात तगडा भिडु म्हणजे लालु असणार आहे. त्यांचा प्रयत्न तोच राहाणार आहे. राज्यात नितीशकुमारांना अस्थीर करणं म्हणजे आपल्या नवसंजीवनी मिळालेल्या राजकारणाला तिलांजली देणं आहे हे लालु उत्तम ओळखतात. त्यामुळे नितीशकुमारांच्या खुर्चीला काहिही धोका नाहि.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 11/15/2015 - 04:58
नवीन
लालू हे अवसरवादी आहेत. मौका मिळताच ते चौका मारणार. जास्त लांब नको उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत ते दिसेलच. लालू आता काँग्रेसच्या जास्त जवळ जातील व् नितिशकुमारानी जोरका झटका सहन करण्याची मानसिकता आत्ताच बनवून ठेवावी
- Log in or register to post comments
न
नितीनचंद्र
Sun, 11/15/2015 - 05:38
नवीन
राजकारणात व्याजासह परत देण्याची परंपरा असते. मग ते राजकीय मित्र असोत की शत्रु. दहा वर्षे बिहारच्या राजकारणातुन निष्कांचीत होण्याची किंमत नितीशकुमारांना कधी तरी मोजावी लागणार.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/15/2015 - 07:14
नवीन
जे काय व्हायचे ते २०१९ च्या लोकसभेनंतर होईल. २०१९ मध्ये त्रिशंकू लोकसभा पुन्हा येणार असे दिसतेय. बिहारची सह्द्याची ५ वर्षे व्यवस्थित जातील. शेवटी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 11/20/2015 - 01:28
नवीन
नितिश कुमारांच्या आणि हे लिहीताना अधिकृत झाले नसले तरी टाईम्समधील बातमीनुसार लालूच्या मुलाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला, एका माळेतले मणी एकत्र येत आहेत. गंमत म्हणजे त्यात शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल पण आहेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 11/20/2015 - 02:17
नवीन
आपल्या गळ्यात हि माळ पडावी म्हणुन धडपडारे जीव प्रथम तिच्यात स्वतःला गोवतात. केजरीसाहेब तर कधिचे गोवले गेले आहेत. आता ते मेरुमणीच्या मध्यवर्ती स्थानाकडे सरकायला बघताहेत एव्हढच :)
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 11/20/2015 - 13:13
नवीन
लैच उशिरा प्रतिक्रिया देतोय, पण ह्या निवडणुकीत बिहारमध्येच ड्युटीवर होतो त्यामुळे जे कळलंय ते बोलतो..
तर माझ्या अकले / माहितीप्रमाणे ह्या निकालाचा अर्थ :
१. जंगी सभा म्हणजे जनतेचा सपोर्ट, असं नसतं.. मोदींच्या सभांना तुफ्फ्फ्फान गर्दी व्हायची. अगदी बॅरीकेड्स तुटेपर्यंत, पण ती गर्दी मतांमध्ये अवतरली नाही.. त्यातच मोदींच्या आक्रमक, नाटकी आणि आक्रस्ताळ्या आविर्भावांसमोर नितीशकुमांराचा संयतपणा जनतेला जास्त भावला निर्णय करतांना..
२. नितीशकुमारांच्या 'अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर' ला, जो की नव्हताच त्याला ओळखण्यात/ जोखण्यात भाजपा पारच गंडली.. 'विकासपुरुष' ही ओळख नितीशकुमारांनी बनवली आहे. बिहारच्या जनतेने विकास होतांना प्रत्यक्ष अनुभवलाय, त्यामुळे मोदींच्या 'विकास' नार्याला जनतेनी भाव दिला नाही. तसेही सत्तेत आल्यापासून भाजपाने त्यांच्याकडून (त्यांनी स्वतःच) उंचावलेल्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत.
३. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठरवणे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा होता जनतेसमोर, आणि त्याच्याच जोरावर 'टॉन्ट' करायची भाजपा इतरांना. इथे बिहारमध्ये कुणीच नव्हता. त्यातच शहा-मोदी जोडगोळीच्या 'सेंट्रलायजिंग अॅटीट्युड' आणि 'पॅरशुट कॅन्डीड्न्सी'मुळे 'बिहारी वि. बाहरी' हा मुद्दा मिळाला महागठबंधनाला..
४. गाय आडवी आली, हो.. हिंदु एकगठ्ठा मतदान करत नाहीत, आणि धर्माच्या नावावर करत नाहीत हे आता भाजपाला शिकायला लागेल. They ensured consolidation of minority votes. हिंदु मतांना तसाही लालू/नितीश हा पर्याय होताच. मुस्लिम मतेपण महागठबंधनलाच गेली. काही काही केंद्रांवर ९०% पेक्षा अधिक मते गेलीत एका उमेदवाराला. (माझ्या अखतारीतल्या मतदारसंघात 'नोटा' पक्डून २१ उमेदवार होते !) आणि हा 'पॅन-बिहार' प्रकार होता असं कळलंय..
५. लालुंनापण ठाऊक आहे, की त्यांना नितीशच्या 'क्लिन अँड एफीशियन्ट' इमेजपायी मतं मिळाली आहेत. त्यांनापण सुधारावचं लागेल.. नाहीतर जी गत लोकसभेच्या निकालाने भुलल्याने शिवसेनेची महाराष्ट्रात झाली, ती व्हायची..
६. ह्या निकालाने अधोरेखित केलंय, कि आतातरी मोदींसमोर जर एक 'क्रेडीबल' चेहरा/ आघाडी उभी झाली तर भाजपा झोपु शकते, कारण एकदा मोदींना मात दिली की झाले..
७. आता भाजपाने विमान जमिनीवर आणून 'रिझल्ट्स' दाखवण्याची गरज आहे. 'ऐतिहासिक' विजयाच्या मदात पाच वर्षं राहून चालणार नाही. किंवा रा.गा. बोलले तसं, गाडी सुरु करायला लागेल नाहीतर जनता ड्रायव्हींग सीटवरुन काढून फेकायला कमी करणार नाही..
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 11/20/2015 - 15:13
नवीन
ऑन फिल्ड प्रतिसाद आवडला. जनतेच्या भावना अगदी योग्य शब्दात मांडल्या आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 11/20/2015 - 18:03
नवीन
चिगो - प्रत्यक्ष अनुभवावर बेतलेली निरिक्षणे पटली.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Fri, 11/20/2015 - 20:38
नवीन
बिहारच्या Demockeracy मध्ये जात आणि धर्म या पलीकडे काहीही नसते हे यादवांनी आणि अल्प संख्याकानी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 11/21/2015 - 02:32
नवीन
पुन्हा एकदा? म्हणजे मागच्या वेळेसही तेच दाखवले होते तर...
- Log in or register to post comments
म
मोगा
Sat, 11/21/2015 - 03:46
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 11/21/2015 - 18:21
नवीन
स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची संख्या सर्वात जास्त असताना आधी ठरल्या प्रमाणे, लालूंनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होऊ दिले. लगेच त्यांनी वसुलीची सुरुवात ही केली आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव ,पहिल्या खेपेस आमदार झाले असले तरी, मंत्री बनले आहेत, दोघात मिळून सहा खाती आहेत,आणि धाकटा उप मुख्यमंत्री होणार आहे. त्यांच्या पैकी एकाला, शब्दोच्चार नीट करता न आल्याने,राज्यपालाना पुन्हा शपथ सांगावी लागली. ही फक्त झलक आहे. पुढे काय होईल याची नांदी आहे.
नितीश कुमार याना मुख मंत्री पदाचा लोभ एवढा आहे कि ते टिकवून ठेवण्यासाठी ते कोणतीही तडजोड करावयास तयार होतील .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2