Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरांनो तुमचे वय काय?

प
परिकथेतील राजकुमार
Sun, 11/08/2015 - 15:18
🗣 94 प्रतिसाद
'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षं निघतो आहे. तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू. धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं. -------------------------- आजच्या मटामध्ये मेघनाताईंचा 'दिवाळी अंकांची ऑनलाईन आतषबाजी' हा लेख आलाय, त्यातील ही मिपा दिवाळी अंकाची दखल. हा पॅरा वाचून काही प्रश्न पडले म्हणून हा लेखन प्रपंच. ढिस्क्लेमर :- १) मेघनातै आणि आमचे काय वैर नाय. (गतसाली त्यांच्याकडून वट्ट रकमेचा लेखनाबद्दलचा चेक आपल्याला मिळालेला आहे.) २) प्रा. डॉ. मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असताना देखील 'तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन' असा उल्लेख केल्याने मला जळजळ झालेली नाहीये. तर आता सुरुवात करतो.
तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू.
ह्या अंकाचे संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने नक्की जमेची बाजू काय घडली हे कुठेही सांगण्यात आलेले नाही.
धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष.
संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने हे असे घडले आहे असे म्हणायचे असावे काय? धीरगंभीर विषय अंकात आले तर त्याला दखलपात्र म्हणता येईल काय? किंवा 'उत्तम' दिवाळी अंकाची व्याख्या नक्की काय असते? ६०+ वर्षाचे संपादक आणि उगाच जागतिक चर्चा, संस्कृतीचा उपापोह इ. विषय अंकात आले की त्याला दर्जा मिळतो? ताईंनी म्हणल्याप्रमाणेच 'उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण' हे पुरेसे नाही काय? 'धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वारा' जिथे वाहतो त्या संस्थळांची गेली काही वर्षे जी अवस्था आहे, ती योग्य संदेश देणारी नाही काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारे अनेक छापील दिवाळी अंक काही कालावधीत 'राम' म्हणायला लागले. अनेक उदाहरणे तर आपण जाणतोच. मुळात ई-दिवाळी अंकांना निकष कशाला हवेत? उत्स्फूर्त लेखन आणि मायमराठीची सेवा ही निकषांमध्ये बसवायचीच कशाला? मनमोकळे लेखन आणि नवलेखकांचा हुरूप हीच खरेतर अशा अंकांची देणगी असते. नावाजलेल्या लेखकांना आणि त्यांच्या 'दवणीय किंवा मला पहा फुले वाहा' प्रकारच्या लेखनाला कंटाळूनच गेली काही वर्षे वाचक सातत्याने नवलेखकांना आवर्जून वाचत आहेत. एखाद्या अंकात असे नावाजलेले लेखक नसतील तर त्याची पात्रता खालावते का? आणि सगळ्यात खटकला तो वाचकांच्या वयाचा उल्लेख. फक्त प्रतिक्रिया देतात तेवढेच त्या अंकाचे वाचक असतात का? किती तरी लोक निव्वळ वाचनमात्र असतात. त्यात सर्व वयोगट आणि प्रोफेशनमधील वाचक असतात. त्यांना फक्त प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गणतीत घ्यायचेच नाही का? मुख्य म्हणजे वाचकांचे वय आणि प्रतिक्रिया ह्यांचा संबंधच काय येतो? आणि वाचकांच्या वयाचा आणि अंकाच्या दर्जाचा संबंध काय? 'चांदोबा' आज सर्व वयोगटातील लोकं वाचतातच ना? का तिथे इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने तुम्ही त्याला 'फक्त बालगोपाळांचे' असे मानणार आहात? तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मिपाकरांनो तुमचे वय काय? लेखात बौद्धिक का शारीरिक ते स्पष्ट केलेले नसल्याने, कृपया दोन्ही वयं सांगा.

प्रतिक्रिया द्या
15052 वाचन

💬 प्रतिसाद (94)
म
मुक्त विहारि Sun, 11/08/2015 - 18:30 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/online-diwali-issue/articleshow/49708391.cms मिपाकरांचे वय कमी आहे, हे वाचून फार आनंद झाला. कारण, कमी वयाचे बालक जास्त आनंदी, समाधानी आणि निर्मळ असते. ह्या बाललीला कुणाला खोडकर वाटणे साहजीकच आहे. (अज्ञानी आणि मिपाकरांच्या सानिध्यात समाधानी) बालक मुवि
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/08/2015 - 18:34 नवीन
हे पन्नाशीच्या,किंवा निदान चाळीशीच्या तरी पलीकडे आहेत हे मी खात्रीलायक सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/08/2015 - 18:40 नवीन
गहनविचारी पंथातले दिसता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/08/2015 - 18:42 नवीन
नै हो... अजून यौवनात मी ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
म
मुक्त विहारि Sun, 11/08/2015 - 18:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पियुशा Sun, 11/08/2015 - 18:53 नवीन
यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
म
मुक्त विहारि Sun, 11/08/2015 - 19:03 नवीन
सगळेच मिपाकर वयाने लहान आहेत, हे एकदा मेघना ताईंनी सांगीतल्या नंतर आणि मटा सारख्या मित्राने, ते छापल्या नंतर, मिपाकर लहान आहेत हे मिपाकरांनी कशाला सांगायला पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
ट
टवाळ कार्टा Mon, 11/09/2015 - 07:32 नवीन
हे तू सांगित्ले नैस तरी सम्जते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
य
याॅर्कर Mon, 11/09/2015 - 09:14 नवीन
याॅर्करदादा --→बस्स कर ना पगली, अब बच्चे को रूलाएगी क्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
व
वगिश Sun, 11/08/2015 - 19:15 नवीन
+२८ वय आहे. आधी खांडेकर मग वपु मग सावंत मग पुल मग कॉमिक्स मग मिपा असा प्रवास केला आहे मी.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/08/2015 - 19:17 नवीन
मागे या विषयावर संबंधितांशी जी चर्चा घडली होती त्याचे स्मरण करून देण्यासाठी खालील वाक्य लिहीत आहे - "स्वतःची रेष मोठी करण्यासाठी दुसर्‍याची रेघ पुसण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही खुजे ठरता." बाकी याविषयी मला काय म्हणावयाचे आहे हे संबंधितांपर्यंत नक्कीच पोहोचले असणार याची खात्री आहे. तेव्हढे सर्वच संबंधित सूज्ञ आहेत. तस्मात्, इत्यलम्.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/08/2015 - 19:40 नवीन
मिपाचा दिवाळी अंक किमान भाडोत्री लेखकांकडून लिहवून घेतला नाही ह्याचे नक्कीच समाधान आहे.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Sun, 11/08/2015 - 19:48 नवीन
20 वर्षे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/08/2015 - 19:51 नवीन
चाळीस कमी ( शंभराला ). चांगला लेखक म्हणजे काय हे ठरले की चांगले लेखन कोणते हे ठरवता येईल. इतिहासकार राजवाडे म्हणतात- वाईत सापडलेल्या सामान्य लोकांच्या जमाखर्च नोंदी अस्सल निघाल्या आणि बखरिवर विश्वास ठेवता येत नाही कारण तो खाल्ल्या मिठाला जागून लिहिलेला खोटा स्तुतिपर इतिहास असतो.बाकी त्या संस्थळांचीच पाने चाळून पाहा काय चाल्लंय ते.बाकी पाडगावकरांनीही लिज्जत पापडाच्या प्रमोशनसाठी पावसाची कविता लिहीली होती हे ते मिश्किल हसत सांगतात.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 11/08/2015 - 19:57 नवीन
मेघना भुस्कुटे यांनी पाहुणे संपादक म्हणुन मिपावर 'व्यायामाचे महत्व' असा काहीसा संपादकीय लेख लिहीला असल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 11/09/2015 - 04:45 नवीन
मिपाला कायम यौवनात ठेवणार्या सदस्यांना सलाम.उगा जडबुध्दीचे म्हातारे चष्मे मिपाला नाहीत ही किती आनंदाची गोष्ट आहे.मिपाच्या वाढत्या आयुष्याप्रमाणे वय कमी होत जातंय! मिपा राॅक्स! ! रच्याकने- मिपावरच्या गोंधळाला मिपाच्या तारूण्यपीटिका म्हणता येईल का!तारुण्यात यायच्याच!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/09/2015 - 04:51 नवीन
वसुबारसेचे महत्व आणि आपली संस्कृती नेमकीआदल्या दिवशी वसुबारस आणि "गाईंना" ओवाळणी झाली. तस आपल्या संस्कृतीत गाय आदी पशुधनाचं महत्व फार आहे. पण कधी कधी गाइअईही भाकड होतात शेतकर्यांना त्या पोसणे अवघड होऊन बसते. त्या मानाने कुत्री-मांजरे बरी असे आमचे हे म्हणतात असे असे माईंचे म्हणणे . कुत्रे किंवा मांजर शक्यतो स्वतः पाळलेले नसावे उगा लळा लागतो. शेजार्याचे असेल तर उत्तम कुत्रे त्याच्या घराबरोबर आपल्याही घराची राखण करते की नाही.आणि मांजर उंदीर खाताना या घरातला-मालकाचा-दुस्र्याचा असा भेदभाव करीत नाही. आमच्या काकूंचा कुत्रा फार धीट आहे. तो बाहेरच्यांनाच काय घरातल्यांनाही चावायला मागे पुढे पहात नाही,त्याचा आवाज ही आम्च्या गल्लीची खासीयत आहे. अवेळीच काय दिवसाही घरचा मालकही ह्याला मोकळा सोडलेला असेल तर जीव मुठीत धरून्च घरात येतो तेथे चोर यायची काय बिशाद !.त्यांची मांजरही फार मजेशीर आहे अगदी नेमाने तीच्या मित्रांबरोबर पार्कींह्ग मध्ये नाहीएतर गच्चीवर दंगा करते तेव्हढाच पोरा टोरांना विरंगुळा.त्यांनी पाळलेल्या पोपटाबद्दल मी काय बोलावे अगदी फर्मास वाणी हो त्याची. आणि मैना,बुलबुल,काका कुवा यांची मिजास तर काही औरच.म्हणून्च काकू मला फार आवडतात. त्यात मैना मला दिसले की लगेच म्हणतेही ये शोभ्णा बैसना !!! मीही त्यांच्याकडे जातेच काकूही मला अगदी आवर्जून खाऊ देतात आणि सांगतात की अशीच आमच्या प्राणी संचयाची तारीफ करीत जा हो, तुला आणखी खाऊ देईन. शोभे ना बसुकुठे
टीप: लेखात वसुबारसेबद्दल माहीती असेलच असे नाही.ह्या लेखात मी काकूंच्या कुठ्ल्याही प्राण्याची तरफ्दारी केलेली नाही. कालच त्याच्याकडे पाव भाजी खाल्ली आणि आज हा लेख निव्वळ योगायोग आहे, संबध जोडू नये.
आता पहिली गोष्टः आमचे वयाबाबत बरीच मतमतांतरे आहेत्,जालावर काही जण काका,काही जण आजोबा,घरचे घोड्या तर शालेय मित्र भुस्नळ्या ,बैला वगैरे संबोधतात यावर आम्ही नक्की काय वयाचे याचा अंदाज येत असेल तर पहा.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Tue, 11/10/2015 - 17:50 नवीन
नेमके आणि विषयाला धरून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/10/2015 - 18:54 नवीन
इक्त मारु नै कुणाला ;) =) सही लैच सही हाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2015 - 05:21 नवीन
जुन्या दिवाळी अंकांच्या लिंका कुठे सापडतील?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 11/09/2015 - 05:33 नवीन
वय हा सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळ्याचा , आणि बर्‍याच वेळा जिव्हारी लागणारा विषय आहे. माझे मिपावय - (अंदाजे) ८ वर्षे खरं खरं वय --( ७५ उणे काही वर्षे )
  • Log in or register to post comments
म
मितान Mon, 11/09/2015 - 06:35 नवीन
म टा सारख्या अर्धमराठी दैनिकातील कुणा अती उत्साही काकूंच्या लेखावर एवढे संशोधनपर गंभीर ललित लेखन होताना पाहून काय म्हणतात ते... हां... ड्वाले पानावले =))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/09/2015 - 08:12 नवीन
काहीही या ताईंचं. म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधी ते कसे असेल त्याचा स्वभाव कसा असेल वगैरे चालू आहे. बाळाचे आइ वडील खूपच तरुण असतील, बाळाचे मित्रही बरेच तरुण असतील. बाळ धीरगंभीर चर्चा करणार नाही फक्त खेळणार... हायला बाळ आमचं, खेळवणार आम्ही, शी शू सगळं करणार आम्ही. यांना काय पडलीय? नका येउ बारशाला..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 11/09/2015 - 08:49 नवीन
तुम्ही कोणत्या लेखाबद्दल हा धागा काढलाय? लेखाचा दुवा मिळेल का? या वर्षीच्या दिवाळी अंकावर लेख होता? कुठे बरं?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 11/09/2015 - 08:53 नवीन
सॉरी दुवा मिल्ळाला. मला तर तो लेख आवडला. प्रतिसाद देणार्यांपैकी किती जणांनी तो लेख वाचला अशी शंका आली. एकुणच जालावरील उपलब्ध अंकांबद्दल माहित नाही अशा वाचकांना त्याबद्दल माहिती करून देण्यासाठी उत्तम धांडोळा आहे. यावर्षीच्या अंकांचे परिक्षण नैये कै ते! उगाच काय हो दिवाळीच्या टेपा उडवायच्या असे धागे काढून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
बॅटमॅन Mon, 11/09/2015 - 09:00 नवीन
प्रतिसाद देणार्यांपैकी किती जणांनी तो लेख वाचला अशी शंका आली.
हा प्रतिसाद म्हणजे हा लेख आणि इथले प्रतिसाद नक्की कशाबद्दल आहेत याची गल्लत झाल्याचे उत्तम उदाहरण आहे. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Mon, 11/09/2015 - 09:20 नवीन
असेल बॉ! चालायचेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गणपा Mon, 11/09/2015 - 09:24 नवीन
आमचे वय..... कुणाला फाट्यावर मारायचे ते बरोब्बर ओळखता येण्या येवढे आहे. ;)
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Mon, 11/09/2015 - 16:53 नवीन
मिपा वय- सहा वर्षे.खरे वय मिपा वाचायला लागल्यापासून कमीच होतंय.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/09/2015 - 17:25 नवीन
कोण हया मेघनाबै? आणि कोणी का असेनात, अंक प्रसिद्ध होण्याआधीच टाकलेल्या पिंका बघून कवतिक करावं तितकं कमीच आहे.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Tue, 11/10/2015 - 05:18 नवीन
काय रे बाबा! धड कौतुकही घेता यैना, हे बघून करमणूक झाली! बाकी 'रुची' विशेषांकावर धडधडीत 'रूची' असं लिहिलंय ते पाहिलं नि तरी लेख लिहिताना कर्सर मागे नेला, की बॉ, आपल्याच मंडळींची चारचौघांत शोभा नको... ते बरीक चुकलंच. बाकी चालू द्या! हॅप्पी दिवाळी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 11/10/2015 - 16:00 नवीन
एक क्षुल्लक चूक असेल झालं. त्याचा एवढा भुस्सा कशापाई पाडताय? कोणतीही कमर्शियल मदत न घेता, वैयक्तिक प्राॅफिट न बघता केवळ मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाचेच कार्य करताहेत ना? मग का उगाच छिद्रान्वेषीपणा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
स
स्रुजा Tue, 11/10/2015 - 16:53 नवीन
रुची आणि रूची वरुन तुम्ही शोभा करणार होतात ? ___/\___ मटा चा उपयोग आज काल या अशा लेखांसाठी होतो म्हणायचा !! बाकी काही नाही तरी अशामुळे मटाची रीडरशीप कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
क
कवितानागेश Tue, 11/10/2015 - 12:42 नवीन
हा वयाचा विदा गोळा करून तुम्ही पुढे त्याचे काय करणार?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/10/2015 - 12:49 नवीन
विकायच्या आहेत असं मी मटात वाचलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Tue, 11/10/2015 - 19:53 नवीन
मग ठिकेय! परा, मी तुझ्या पेक्षा मोठीये रे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 17:02 नवीन
निम्मे मिपाकर आपले खरे वय सांगणार नाहीत ,बाकी समजून घ्या नाहीतर पोगो बघा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/25/2015 - 13:06 नवीन
गेले एनेक वर्हे १६
  • Log in or register to post comments
न
निराकार गाढव Wed, 11/25/2015 - 13:52 नवीन
ते सगळं ठीक आहे. पण या मेघनाचं वय काय आहे म्हणालास, राजकुमारा? Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 11/25/2015 - 15:33 नवीन
ते वयबीय जाऊदे गाढवाच्या...अर्रर्रर्र स्वारी बरंका निराकारजी गाढवजी. तुम्हांला इथे पाहून किती आनंद झाला ते एक तुमचे गुरुवर्यच जाणोत. येऊद्यात अता अजून काही खंग्री गोष्टी. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव
अ
अरिंजय गुरुवार, 11/26/2015 - 07:25 नवीन
मुळातच स्वयंघोषीत स्टँडर्ड वगैरे असणारे 'मटा', 'सत्ता' वगैरे हे फक्त महानगरांमधील तथाकथित उच्च वगैरे वर्गा पुरते मर्यादीत आहेत. ते त्यांच्या विचारसरणी ने चालतात, चालु द्यावे. विझणारे दिवे विझु द्यावे, त्यात उगाच तेल टाकु नये. "मिपा" सर्वसामान्य मराठी माणसाच्या 'खिशात' असणारे मुक्त व्यासपिठ आहे. मराठी भाषेचे, विचारांचे 'स्टॅन्डर्ड' आपण ठरवणार, ते नाही. वयाबद्दल विचाराल तर शारिरीक वयाचे माहीत नाही पण मानसीक वय मात्र विशी - पंचविशीचे आहे. म्हणुनच "मिपा" वर उत्साह ओसंडुन वाहतो. त्याचेच प्रतिबिंब इथल्या लेखांमध्ये, प्रतिक्रियांमध्ये आणि भाषेमध्ये दिसुन येतो. असो. जास्त काथ्याकुट नको. "मिपा" जसा आहे तसा आम्हाला आवडतो व असाच रहावा. चिरतरुण.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/01/2015 - 06:58 नवीन
अट्टाहास खरे रंग बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 12/01/2015 - 07:37 नवीन
हे भारीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनुप ढेरे Tue, 12/01/2015 - 07:41 नवीन
धन्यवाद. छान लेख आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा