वरंधा घाटातले मनुष्यस्पर्श नसलेले बॅक वॉटर
महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस.
मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो. निसर्गाने दिलेल देण त्यांच्या कल्पकतेने सुरेख लेण चढवुन परत जनतेला रोजगाराच्या निर्मीतीसाठी परत आल आहे.
काल मी महाडहुन भोर मार्गाने जेव्हा पुण्याला आलो तेव्हा जाणवले की वरंधा घाटातला किमान २० किलोमीटर लांबीचा रस्ता त्या धरणाच्या बॅक वॉटरची सोबत करतो.
थोडाश्या उन्हात पाणी चमकत होत. पण ना कुठे रिसोर्ट्स ना कुठे बोटींगचे स्पॉट्स. मनात आणल तर इथे हॉउसबोटीवर दोन दिवस रहाता येईल इतकी छान व्यवस्था होण्यासाठी निसर्ग वाट पहातोय.
जरा आजुबाजुचे डोंगर थोडे उघडे - बोडके दिसतात त्यासाठी काही वर्ष द्यावी लागतील. पण हा निसर्ग कुठेही कमी नाही.
ही हाक कुणी पोचवेल का त्या जबाबदार व्यक्तीकडे /संस्थांकडे /सरकार दरबारी ?
या नैसर्गीक साधनसंप्पतीचा वापर ( डोळसपणे ) करायला काय हरकत आहे ?ओके. या नैसर्गीक साधनसंप्पतीचा डोळसपणे वापर झाल्याचे एखादे उदाहरण आहे का?