Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट.????????????

स
सागरकदम
Tue, 11/10/2015 - 16:58
🗣 63 प्रतिसाद
तसा मी मिपा वर नवीन आहे पण दारोज नवीन काहीतरी ऐकतोय मागे कोणी मिपाकरांचे वय काढले ,आत्ता तर अजून एक निदर्शनास आले आहे
मिसळपाव www.misalpav.com खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-story-in-madhurima-about-websites-and-blogs-of-recipes-5161546-NOR.html पण मिपा आधी पासून साहित्याला समर्पित होते कि खाण्यासाठे फक्त ?

प्रतिक्रिया द्या
8200 वाचन

💬 प्रतिसाद (63)
ज
जव्हेरगंज Tue, 11/10/2015 - 17:08 नवीन
मिपा आधी पासून साहित्य/पाकृ/चर्चा/भटकंती/व इतर सर्व विषयांना समर्पित होते :)
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 17:12 नवीन
पण ह्यात फक्त खाद्य संस्कृतीला होते असे लिहिले आहे हि सरळ दिशा भूल आहे
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/10/2015 - 17:13 नवीन
कोण हे धृतराष्ट्राचे अवतार?
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Tue, 11/10/2015 - 17:16 नवीन
अगं दिव्य दृष्टी आहे , दिव्य भारती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप Wed, 11/11/2015 - 07:41 नवीन
बाकी काही म्हणा, मिपावर अधूनमधून जे अवतार प्रकटतात, ते (मर्यादित स्वरूपात) करमणूक करतात. त्यांच्या आवेशापुढे 'हा कोण सांप्रति नवा अवतार' असे म्हणायची पाळी येते. आता बरेचदा हे अवतार, जुन्या नावाचे नवे अवतार असतात, ते वेगळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/10/2015 - 17:16 नवीन
मिपा साहित्य, ललित लेखन, कथा, कविता , खाद्य, वाद, संवाद, माहितीपूर्ण देवान घेवाण यासाठी तर मिपा प्रसिद्ध नाही असं माझं मत आहे. :) अवांतर : दिवसभर ऑनलाइन राहिल्यानंतर मिपावर काही तरी काथ्याकुट टाकावा वाटलं याचं कौतुक वाटलं. येत जा. दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 11/10/2015 - 17:59 नवीन
अशा सर्वांना एक अभिनव विरोध म्हणुन आपण त्यांचे इ-मेल आय डी मिळवुन एकेक १० चांगले लेख निवडुन लिंक पाठवा अभियान सुरु करु म्हणजे ते डाळी गिफ्ट पाठवण्याचा कार्यक्रम सध्या काँग्रेसवाले करतात तस काहीस. म्हणजे त्यांना कळेल और भी है मिपापर बहोत कुछ भास्कर चंदावरकरांना एक मोठी खंत होती मला फक्त घाशीराम कोतवाल चा संगीतकार म्हणुनच ओळखता तशीच काहीशी खंत मिपा फक्त खाना खजाना आहे अस काहींना वाटतं हे वाचुन वाटली
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 18:03 नवीन
त्यांना मोकळ्या दाही दिशा पाठवावे
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 11/10/2015 - 18:17 नवीन
'मोकलाया दाही दिशा' पाठवा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
ट
टवाळ कार्टा Tue, 11/10/2015 - 18:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/10/2015 - 18:19 नवीन
आंतरजालावरचे (आणि इतर कुठलेली) लिखाण हे मुख्यतः लेखकाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असते हे काही जणांना समजत नाही... आणि मग... बडे आंतरजालपे ऐसे छोटे छोटे मानसिकता / अज्ञान प्रकट करनेवाले किस्से होते रहते है । =)) =)) =)) ====== या कारणाने का होईना, पण एखादा नवीन वाचक मिपावर आला तर केवळ पाकृच नाही तर इतर अनेक वैशिष्ठ्ये पाहून मिपाला चिकटून राहील... म्हणजे मिपाचा फायदाच झाला ना ! :) आम्ही पण असेच अपघाताने मिपावर आलो आणि मिपाकर बनून राहीलो :) ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/10/2015 - 18:23 नवीन
मुख्य म्हणजे... विनाकारण स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली किंवा टीका होऊ लागली की समजा की तुम्ही आपले स्थान बळकट केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 20:31 नवीन
माझे पण स्थान बळकट आहे चीव्तीव चे धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
होबासराव Tue, 11/10/2015 - 18:35 नवीन
विनाकारण स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली किंवा टीका होऊ लागली की समजा की तुम्ही आपले स्थान बळकट केले आहे. वाह क्या निरिक्षण है :)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 11/10/2015 - 19:22 नवीन
मिपाची दखल घेत आहेत तर लोक ! तात्यांनी लावलेले रोपटे चांगलेच डेरेदार होत आहे . एक सामान्य मिपाकर म्हणून अभिमान वगैरे वाटतो आहे .;-)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 11/10/2015 - 20:00 नवीन
आलेल्या मूळ लेखाचं शीर्षक हे ' खाद्यसंस्कृती टिकवणारे ब्लाॅग्ज' असं आहे. मिपाचं नावच खाद्यपदार्थाचं आहे. इथे लाॅगिन झालेल्या लोकांची नावंही ' हाॅटेलात आलेली माणसं ' अशी दिसतात. काही आयडी - उदाहरणार्थ आमचे अत्रुप्त गुर्जी, झालंच तर गवि, संजोपराव, प्रास, स्वतः तात्या उर्फ विसोबा खेचर यांनी खाणे आणि खिलवणे यावर अफलातून लेख लिहिले आहेत. असातसाच लेख कुणी पाडला तर त्याला जिलबी असंच नाव आहे इथे. त्यामुळे मिपा हे खाद्यसंस्कृतीला वाहिलेलं आहे हा गैरसमज आहे हाच एक मोठा गैरसमज आहे. हादडणे आणि बदडणे इथे सारख्याच उत्साहानं होतं. पाठीत घातले जाणारे आणि ताटात गरमागरम वाढले जाणारे यांना धपाटे हा एकच शब्द वापरणाऱ्या रसिक महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला जपण्याचं काम करणाऱ्या मिपाचा कोणी खाद्यसंस्कृतीमध्ये उल्लेख न करता फक्त राजकारण, तंत्रजगत, क्रीडा, कला यासाठीच उल्लेख केला तर गैरसमज झालाय असं म्हणता येईल. चला, एवढा प्रतिसाद देऊन भूक लागली. एक प्लेट मिसळ आण रे भाऊ. तर्री मारून. कांदा आणि लिंबूत कंजूषी नको!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/10/2015 - 20:15 नवीन
त्यांची मोठी चूक म्हणजे मिपा हा ब्लॉग नाही. ते स्वायत्त संस्थळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ए
एस Tue, 11/10/2015 - 20:28 नवीन
पण मिपा ही 'सोशल साईट' आहे म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/11/2015 - 02:07 नवीन
ज्या माध्यमांमधून एकमेकांशी देवाणघेवाण करता येते त्या माध्यमांना सामाजिकशास्त्रांचे अभ्यासक 'सोशल मिडीया' असं म्हणतात. संस्थळं/वेबसाईट्स हा माध्यमांचा एक भाग झाला. मिपा हे त्यांपैकी एक. त्यामुळे 'सोशल साईट' हे विशेषण अग्राह्य नव्हे. असो. या प्रतिसादामागचं मुख्य कारण, 'मधुरिमा'च्या मुख्य संपादिकेला ह्या धाग्याचा दुवा पाठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मितान Wed, 11/11/2015 - 05:19 नवीन
प्लीज, हे समाजकार्य जरा लवकर करा ! कसंय ताई, चुका वेळेवर कळालेल्या उत्तम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अजया Wed, 11/11/2015 - 05:25 नवीन
सहमत.चांगल्या कामाला उशीर नको अजिबात. धन्यवाद आगाऊ.( धन्यवादाला आगाऊ म्हंटलं आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/11/2015 - 15:18 नवीन
मितान आणि अजया, तुमचे प्रतिसाद येण्याआधीच तिला इमेल केलं होतं. मिपाकरांच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्याचं उत्तरही तिच्याकडून आलं. --- बोका-ए-आझम यांचा दृष्टिकोन आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 17:34 नवीन
आणि माझा दृष्टी कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2015 - 17:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 18:15 नवीन
चिव तीवचा फोटू नका हो तकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम Fri, 11/13/2015 - 04:23 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 11/11/2015 - 05:51 नवीन
एका घरातल्या गोष्टी तिसर्‍या संबंध नसलेल्या घरातल्या व्यक्तीने चौथ्याचं घरात पोहोचवणे ह्यास मराठी भाषेमधे खालील वाक्प्रचार उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वाक्यात उपयोग करा. १. काड्या सारणे २. लावालाव्या करणे ३. भोचकपणा करणे ४. नाक खुपसणे वाक्प्रचाराचा अर्थ वरच्या प्रतिसादामधे आहेच त्यामुळे त्याला ० मार्क्स असतील. वरच्याच प्रतिसादातल्या वाक्यांमधे वाक्प्रचार वापरल्यास अर्धे मार्क वजा होतील. वाक्यात योग्य उपयोग करणार्‍याला संपुर्ण मार्क्स आणि सडेतोड प्रतिसाद देणार्‍या उत्तरास दुप्पट मार्क्स मिळतील हो....!!! रच्याकने मराठी आंतरजालाने कृपया एकमेकांचा आदर ठेउन उणीदुणी काढु नयेत हि विनंती. चुका दाखवा काही हरकत नाही. पण त्यांच्या कुचेष्टा करणे काही पटलं नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 05:57 नवीन
आपल्या तक्रारी पौड फात्य्वर तक्रार पेटीत टाका फाट्यावर मारण्यात येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2015 - 06:09 नवीन
कित्ती चावायचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 06:26 नवीन
चावत लोकांवर कारवाई व्हायलाच पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम Wed, 11/11/2015 - 05:36 नवीन
पण त्यांनी फक्त शीर्षकातच हा घोळ घातलाय. प्रत्यक्ष लेखात वेबसाईट हाच शब्द आहे. मला तर मिपाचं नाव पहिलं असल्याचा आनंद झाला बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 05:53 नवीन
पण मिपा फक्त खाण्य्साठी आहे असे लिहिले त्याला आक्षेप नाहीये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 11/11/2015 - 08:50 नवीन
मिसळपाव www.misalpav.com खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.
तुम्ही जो दिव्यमराठीवर मिपाचा परिचय वाचलात आणि ज्याचा दुवा दिला आहे, तो हाच आहे, बरोबर? संपूर्ण परिचयात कुठेही मिपा ' फक्त ' खाण्यासाठी असलेली वेबसाईट आहे असं म्हटलेलं नाही. तुम्ही असा निष्कर्ष कशावरून काढलात ते मला समजलं नाही. कदाचित तुम्ही वाचलेली आणि या लिंकमध्ये नसलेली माहिती असेल. तर मग कृपया ती लिंकही द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 08:56 नवीन
१) खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. २) बाकी तुम्ही वाचले तरी ह्यात मिपा चा वापर फक्त खाण्यासाठी होतो असे ळीलेय ३) रुची विशेषांक दिवाळी निमित आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 11/11/2015 - 10:00 नवीन
२) बाकी तुम्ही वाचले तरी ह्यात मिपा चा वापर फक्त खाण्यासाठी होतो असे ळीलेय
तेच तर विचारतोय. कुठे? बाकी रुची विशेषांक हा १५ आॅक्टोबर या जागतिक अन्नदिनानिमित्त होता पण याच्यावरुन मिपा हे ' फक्त ' खाण्यासाठी आहे असा निष्कर्ष काढण्याचं कारण समजलं नाही बुवा. लेखिका खाण्याशी संबंधित ब्लाॅग्ज आणि वेबसाईट्स यांच्यावर लिहित असताना त्यांनी मिपाबद्दल लिहिलं कारण मिपावर खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण किंवा जे काय होतं ते चांगलं आहे असं त्यांना वाटलं. आता हे त्यांचं मत असू शकतं. हा त्यांचा प्रामाणिक समज असू शकतो किंवा गैरसमज पण त्यांनी मिपाचा वापर फक्त खाण्यासाठी होतो असं कुठे म्हटलंय ते मला तरी दिसलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 12:07 नवीन
आधी १ल्य आणि ३ र्या चे उत्तर द्या मग बोलू निवांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 11/11/2015 - 17:07 नवीन
हो आणि नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
म
मांत्रिक गुरुवार, 11/12/2015 - 05:11 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 20:27 नवीन
मागे कोणीतरी सोसिल नेट्वर्किंग पण म्हटले होते
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/11/2015 - 03:07 नवीन
उचकावण्याची नस सापडली आहे "सागरकदम" तुला.
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 05:27 नवीन
मी कोणाला उचाकाऊ व का उचकाउ दादा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 11/11/2015 - 05:21 नवीन
आता बोला.........!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 11/11/2015 - 05:29 नवीन
फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 11/11/2015 - 08:28 नवीन
काय चुकले? एकमेकांचे डोके खायला येतोच की आपण इथे! ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 11/11/2015 - 08:30 नवीन
खार म्हणले तरी चालेल माऊली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश गुरुवार, 11/12/2015 - 19:59 नवीन
खार खाये मिपाके दुश्मन! आपण डोकीच खाऊ काथ्याकूट करकरून.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सागरकदम गुरुवार, 11/12/2015 - 20:48 नवीन
चिव तीव मिपाचा दुश्मन आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/13/2015 - 05:38 नवीन
अभ्यास वाढवं. (तेवढा वेळ मिळाला तर).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Fri, 11/13/2015 - 06:06 नवीन
चोराच्या मनात चांदणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जव्हेरगंज Wed, 11/11/2015 - 09:08 नवीन
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा