Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट.????????????

स
सागरकदम
Tue, 11/10/2015 - 16:58
🗣 63 प्रतिसाद
तसा मी मिपा वर नवीन आहे पण दारोज नवीन काहीतरी ऐकतोय मागे कोणी मिपाकरांचे वय काढले ,आत्ता तर अजून एक निदर्शनास आले आहे
मिसळपाव www.misalpav.com खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-story-in-madhurima-about-websites-and-blogs-of-recipes-5161546-NOR.html पण मिपा आधी पासून साहित्याला समर्पित होते कि खाण्यासाठे फक्त ?

प्रतिक्रिया द्या
8200 वाचन

💬 प्रतिसाद (63)
ज
जव्हेरगंज Wed, 11/11/2015 - 09:11 नवीन
अरेच्च्या ज्या संदर्भाने लिहीले होते तो संदर्भच गेला उडुन .:):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 09:16 नवीन
परत लिहा कि टंकून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/11/2015 - 18:06 नवीन
काही काळापूर्वी मिपा मद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जायची. गेले ते दिवस आणि बुधवारच्या रात्री.....
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 18:17 नवीन
बुधवारच्या रात्री जागी चुकून वेगळाच refernce वाचला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सोत्रि Fri, 11/13/2015 - 05:33 नवीन
गेला तो तात्या आणि गेल्या त्या सिंगलमाल्ट दीक्षा :( Image removed. - (सिंगलमाल्टप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ट
टवाळ कार्टा Fri, 11/13/2015 - 17:13 नवीन
हैला...ओल्या कट्ट्याला म्हैलामंडळ??? सोवळेपणाचे डोहाळे कधीपासून लाग्ले मग????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सागरकदम Fri, 11/13/2015 - 19:07 नवीन
कुठे कुठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पाषाणभेद Fri, 11/13/2015 - 05:02 नवीन
>>> काही काळापूर्वी मिपा मद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जायची. गेले ते दिवस आणि बुधवारच्या रात्री.... खरंय. जुन्या मिपाची आठवण जावून असल्या प्रकारे नविन मिपा उदयाला आले असं म्हणायचं.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 11/13/2015 - 06:03 नवीन
तात्यांच्या काळात दर आठवड्यात एकदा 'या अमुक अमुक बाईबरोबर एंजॉय करूया हा तमुक तमुक पदार्थ' म्हणत एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थाचा आणि सेक्सी बाईचा फोटू असायचा. त्यामुळे कदाचित असा गैरसमज झाला असेल. तरी बरं, त्यावरून काही जास्त टोकाचा गैरसमज झाला नाही ते. ;) कोणीतरी कुठल्यातरी अंकात मिपाविषयी काहीतरी गैरसमज पसरवतो, तर आपण मिपाकरांनी उगाच कशाला अंगाला लावून घ्यायचं? सहा आंधळ्यांना हत्ती वेगवेगळा जाणवतो तसंच समजायचं, आणि हाथी चले अपनी चाल म्हणत चालत राहायचं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/13/2015 - 06:40 नवीन
तात्याच्या काळातल्या काही गोष्टी खर्रच मी मिस करतो. खाणं पिणं, आणि अमुक बै गच्च भरलेली, त्या चड्ड्यातल्या नट्या आणि उगं काही शेरोशायरी, आ़ज हिच्याबरोबर मिटींग आहे अन काय आहे. सालं रंगीला माणुस होता तात्या. :) कधी त्या टॉलीवूडच्या उघडया पाघड्या नट्या, काही साड्यांवरच्या उगं आकार उकार अधोरेखीत करणारी छायाचित्रं....अरारा...गेले ते दिवस. आता तेवढ्याच साठी गुगलला विचारावं लागतं टॉलीवूडमधे नवीन काय आलंय म्हणुन. ;) >>>>आपण मिपाकरांनी उगाच कशाला अंगाला लावून घ्यायचं? सहा आंधळ्यांना हत्ती वेगवेगळा जाणवतो तसंच समजायचं, आणि हाथी चले अपनी चाल म्हणत चालत राहायचं. १०००% सहमत. कोण ती बाई तीला हे मिपाकर फुकट भाव देतात. माझ्या डोक्यात जातात ही प्रकरणं. आता ती बै थेट पुढच्या दिवाळीत दिसेल 'समांतर रेषेवर काढलेली त्रिकोणं'' आणि त्याला चिटकवलेली ''अशी कशी गं तुझी ही अक्षरं'' असं काय जाहिरातीला येईल. अमुक वाचा अन धमुक वाचा, हे लै भारी अन ते लै भारी. अरे ती बै कै बी विकायला घेऊन आली तर ढुंकुन बघायचं नै विषय संपतो. बरं तिच्या टोपलीत काय असतं. कुठली जांभळं, कुठली करवंदं, केळी, बरं ती बाई आणते कुठून ? तर ती माल उचलते मिपावरचाच. फक्त नाव होतं केळी विकणार्‍या बैचं. नै का. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/13/2015 - 06:43 नवीन
चुकीने दोन धाग्यावरचे विषय प्रतिसादात एकत्रीत आले आहेत.... संपादकांना वेळ असेल तर जरा प्रतिसाद जिथल्या तिथे नेऊन टाकतील काय ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सागरकदम Fri, 11/13/2015 - 19:30 नवीन
माझ्याच धाग्यावर का असे होतेय राव ? तरी पण राहू ध्या memoranda
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/14/2015 - 13:23 नवीन
कंटाळा येतो राव परत उत्तर द्य्यायचा ह्या धाग्यावरील हे गाणे पहा आणि ठरवा एकदा काय ते? तरी ही नाही समजले तर एका कट्ट्याला हजेरी लावा आणि सगळ्या शंकाची समूळ शस्त्रक्रिया करून घ्या. खुलासा संपला अमित सांगलीच सागर कदम बनून आलेत तेव्हा निवांत रहा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा