साहित्यः
सुकामेवा = १ कप
सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन)
खजुर = ७-८
तुप = ३ चमचे
वेलची पावडर = १ छोटा चमचा
जायफळ पावडर = १ छोटा चमचा
कृती:
१. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा.

२. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.

३. मिक्सरमधे सुकामेवा बारीक करावा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)

४. पॅनमधे ३ चमचे तुप गरम करुन त्यात वाटलेले अंजीर व खजुर परतुन घ्यावे.

५. सर्व मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतावे. गोळा तयार झाल्यावर त्यात बारीक केलेला सुकामेवा टाकुन एकत्र करुन घ्यावे.
थोडासा सुकामेवा वरुन सजावटीसाठी बाजुला काढुन ठेवावा.

६. एका खोलगट पॅनला तुप लावुन त्यात हा गोळापारुन घ्यावा.
७. वरुन अजुन थोड्या सुक्यामेव्याने सजवुन बर्फी फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावी.

८. ३-४ तासानी पॅन बाहेर काढुन त्याच्या वड्या पाडुन घ्याव्यात.

९. अंजीर बर्फी खायला तयार आहे.


सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुंदर..
सुंदर..
मस्त बर्फी :)
मस्त बर्फी :)
वा! मस्त दिसते आहे बर्फी!
करून पहाणार.
तो पणती ठेवण्याचा स्टँडही अतिशय सुंदर आहे!
पाकृ खासच दिसतेय...
तोंडाला पाणी सुटले.
तोंडाला पाणी सुटले
तोंडाला पाणी सुटले
मिपावर आता मिठाई पार्सल सेवा
मिपावर आता मिठाई पार्सल सेवा सुरु करण्यात यावी ! :)
मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.
अंजीर सोलुन मग पाण्यात भिजवलेले दिसत आहेत... पण नक्की किती वेळ भिजत घालावेत ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam
नाही..जसे होते तसेच डायरेक्ट
नाही..जसे होते तसेच डायरेक्ट गरम पाण्यात भिजवले. ते भिजल्यामुळे पांढरे दिसतायत.
ओह्ह... ओक्के. :)
ओह्ह... ओक्के. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
देखणी, तोंपासू पाककृती मृ.
देखणी, तोंपासू पाककृती मृ.
अंजीर, खजुराचा गोडवा पुरेपुर या पाकृत उतरलाय.
साखर अजिबात न घालता पौष्टिक पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद :)
मी ती फराळाची प्लेट पळवली आहे ;)
कसलं सुंदर!
कसलं सुंदर केलंयस!
वाह!
वाह!
सगळ्यांचे खुप धन्यवाद.
सगळ्यांचे खुप धन्यवाद.
वॉव!
अंजिर बर्फी मस्तच!!! एकदम तोंपासु..
स्वाती
मस्त मस्त मस्त!
मस्त मस्त मस्त!
क्या बात है
बिनसाखरेच्या पण अतिशय आकर्षक दिसणार्या पाककृतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
सादरीकरण एकदम खास आहे.
मस्तं आणि पौष्टिक. अंजीर
मस्तं आणि पौष्टिक. अंजीर बर्फी खूप आवडली.
मी बर्फीची कढईचा बर्फीसकट आणि
मी बर्फीची कढईचा बर्फीसकट आणि हो,त्या ट्रेसकटच पळवली आहे.
मृ,झक्कास ग.
मस्त
मस्त
_/\_
खपल्या गेलो आहे !!!!
अंजीर विशेष आवडत नाहीत, पण
अंजीर विशेष आवडत नाहीत, पण प्रेझेंटेशनसाठी हजेरी लावून गेलो.
फारच देखणी आहे बर्फी !
फारच देखणी आहे बर्फी !
इतके ड्रायफ्रूट्स एकदम हजम होतील असे वाटेना, म्हणून पास !
सगळ्यांना खुप धन्यवाद. :)
सगळ्यांना खुप धन्यवाद. :)