दिवाळीपाडवा, सारसबाग, एक चीनी सकाळ
"दर वर्षी सारसबागेत पाडव्याची सकाळी दीपोत्सव असतो, दुस-या दिवशी पेपरमध्ये छान फोटो पाहून खूप काही मिस केले अशी भावना होते, ते काहीनाही,या वर्षी पहाटे साडेचारला सारसबागे जायचेच,बर का"
बायकोने फर्मान काढले.
गेलो.
अगदी साडेचार जमले नाही. पाच वा.गेलो. काय झाले.
महान दिपोत्सव वगैरे काही नव्हता.थोडाफार सुंदर लावलेल्या भारताच्या नकाशाच्या आकारात पणत्या होत्या.
सुंदर संस्कारभारती रांगोळ्या होत्या पण थोड्याच.
मग काय होते.
उन्माद.
अनियंत्रीत गर्दी.
अनावर उत्सुकता
एका कोप-यात आॅर्केस्ट्रा होता.
यावेळचे आकर्षण म्हणजे चीनी कंदील. रु.100 ला 3.
हि कल्पना एव्हढी हिट झाली की आकाश कंदीलांनी भरून गेले.
कंदीलांचे लक्ष थवे
गगनाला रंग नवे
(नाधो महानोरांची क्षमा मागुन)
हे आधी का झालं नाही?
कारण या आधी तो आंत्रप्रीनर चीनी (अलीबाबा ?) जन्मला नव्हता.
लो काॅस्ट कंदील डिझाईन / जास्त वेळ जळत रहाणारा काकडा इंधन शोधले नव्हते.
ज्याअर्थी 30 रू. ला विकूनही फायदा होतो, त्याअर्थी काॅस्टप्राइस 2 रू. असावी
सुरक्षेचे काय?
पोलीसयंत्रणा बघ्याची भूमिका घेत होती. कारण नो इंस्ट्रक्शन / कायद्याचे अज्ञान / चिरीमिरी (?)असणार.
आगीचा धोका आहेच.
एक कंदील वर जाण्याऐवजी खाली येवू लागला, बहूदा लीक होत असावा,गर्दीतील एका मुलीच्या डोक्यावर पडणार इतक्यात प्रसंगावधान राखून एका उंच मुलाने तो वरच्यावर धरला व मग बाजूला टाकला, इतरांनी चटकन पायाने तो जळता टेंभा विझवला.
सव्वासहा वाजताही नटनेल्या मुली /स्त्रिया, नवीन कपडे धारण केलेले लोकांचा एकचं उद्देश होता,
चलो सारसबाग.
का? तिथे काय आहे?
ही समाजाची एक भावनीक गरज होती, नवीन कपडे धारण केले असतांना कुठेतरी "हॅपनींग" ठिकाणी जाणे, मिरविणे,हि त्या वेळची गरज होती.
अशा वेळी त्या सारसबागेची क्षमता किती, बाहेर पडण्याचे सुरक्षीत मार्ग आहेत का? जर काही अनुचीत प्रकार घडला तर चेंगराचेंगरीतून वाचायचे कसे??
कोण विचार करतो.
सात वाजलेतरी उशीरा उठलेले लेटलतीफ लोंढे सारसबागेच्या दिशेने जातचं होते
💬 प्रतिसाद
(6)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 11/12/2015 - 04:25
नवीन
आमच्या डोंबोलीच्या फडके रोडवर...
"स्वैराचारा तून स्वातंत्र्याकडे", असा विकसित देशांचा प्रवास होत असेलही, पण आपल्या भारतच्या लोकशाहीचा प्रवास मात्र, "स्वातंत्र्याकडून स्वैराचाराकडे", असाच होत असावा.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 11/12/2015 - 06:37
नवीन
दुर्दैवाने सहमत. भारतीय हे व्यक्तिस्वातंत्र्यासाठी जेव्हढा कंठशोष करतात तितकेच ते स्वतःच्या सामाजिक व सामूहिक जबाबदारपणाविषयी बेफिकीर असतात.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 11/12/2015 - 04:27
नवीन
अरेरे !
:(
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 11/12/2015 - 05:03
नवीन
+१
असेच म्हणतो ……. !
गेली काही वर्षे दिवाळी भारताबाहेर होत असल्याने हे पहायला मिळत नसल्याची भावना होती. कॉलेजात असताना बऱ्याच चांगल्या स्वरूपात दीपोत्सव होत असे. संगीताचे कार्यक्रम होत.
मात्र आज पहाटे साडेपाचला सारसबागेत दाखल झालो . वाहतूक आधीच्या चौकामधून वळवत असल्याने दीड किमी दूरवर गाडी लावून पुढे आलो तर प्रचंड अनियंत्रित गर्दी. सुरक्षेचा कसलाही विचार नव्हता. कांही सज्जन किंचाळून तर उरलेले हिरवळीत फटाके वाजवून आत्मिक आनंद घेत होते.
एका कंदीलवाल्याकडून पोलीस अडीचशे रुपयांची दिवाळी भेट स्वीकारताना दिसले !
निराश होऊन चालणार नव्हते. सरळ तिथून परत बाहेर पडून गाडी तळजाई मंदिराकडे वळवली.
तोवर उजाडले होते. तळजाई पठारावर वनविहार आहे. तिथेही चालताना असे कंदील पडलेले दिसले. आज गर्दी कमी असणार हा अंदाज बरोबर ठरला. छानपैकी देवीचे दर्शन झाले . मोरांचा आवाज आला पण दर्शन झाले नाही. पाच कि. मी. चालून घरी आल्यावर फराळावर ताव मारला. एकूण मज्जा आली !! ;)
१.
२.
३.

- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 11/12/2015 - 06:44
नवीन
निवांत वाटले असेल ते फोटोतून दिसतंय.
सर्वच सणावारांचे विद्रुपीकरण करुन भावनांचे पोकळ प्रदर्शन करणे ही इन थिंग आहे सध्या. न बोलणे उत्तम.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
गुरुवार, 11/12/2015 - 06:57
नवीन
धोकादायक कंदिलांची ऑनलाइन आकाशझेप
लोकसत्ता, विवेक सुर्वे, मुंबई | November 11, 2015
कोणतेही र्निबध नसल्याने सुरक्षा अंधारात
शहरातील आग लागण्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल अनेक उपाययोजना तपासून बघत असतानाच दिवाळीत तरुण मंडळी आकाशात प्रकाशझोत सोडणाऱ्या धोकादायक दिव्यांची ऑनलाइन खरेदी करत आहेत. यात या दिव्यांच्या खरेदीवर अनेक संकेतस्थळांवर ३० ते ४० टक्क्यांची सवलती दिली जात असल्याने या दिव्यांच्या खरेदीचा जोर वाढला आहे. मात्र या दिव्यांमुळे शहरात कदाचित एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते, याची या तरुणाईला जाणीव नसल्याचेच चित्र दिसत आहे. यामुळेच हे दिवे आकाशात सोडू नयेत, या अग्निशमन दलाच्या आवाहनाकडेही त्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात मकर संक्रात, नाताळ, नवे वर्ष, वाढदिवस, लग्नांचा वाढदिवस आणि कंपनीचा व्यावसायिक कार्यक्रम आदींचे औचित्य साधून आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे सोडले जात आहेत. त्यामुळे आकाशात प्रदूषण होण्यासह हवाई दलाच्या विमानांना धोका उत्पन्न होण्याकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने तज्ज्ञमंडळी खंत व्यक्त करत आहेत. याशिवाय आकाशात अशा प्रकारचे दिवे सोडण्याची प्रथा ब्राझील आणि पोर्तुगालमधून भारतात आली आहे. तिथे जून महिन्याच्या सुट्टीत मोकळ्या मदानातून हे दिवे आकाशात सोडले जातात. मात्र तेथील शहरांची भौगोलिक रचना आणि मुंबईची रचना यात प्रचंड फरक आहे. आपल्याकडे इमारतींची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे शहराला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लोकांनी लक्षात घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
आठ महिन्यांपूर्वी आकाशात सोडण्यात येणाऱ्या एका दिव्यामुळे मालाडच्या एका इमारतीच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरली होती. सुदैवाने या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्यात लोक राहात नव्हते. मात्र ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाच तासांचा कालावधी लागला होता. त्यामुळे लोकांनी अशा दिव्यांची खरेदीसुद्धा करू नये, असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी केले आहे. याशिवाय यावर बंदी आणण्यासाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईच्या अनेक प्रमुख बाजारात हे दिवे उपलब्ध आहेत. अगदी ३५ रुपयांपासून ते अडीच हजार रुपये किमतीला मिळत आहेत. चिनी बनावटींच्या या दिव्यांचे वजन १०० ग्रॅम ते ४०० ग्रॅमपर्यंत आहे. सप्तरंगात उपलब्ध असलेल्या या दिव्यांत पाच, दहा आणि वीस असा एकत्रित संच मिळत आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कारवाईच्या भीतिपोटी छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक संकेतस्थळांवर ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सवलती दिल्या जात आहेत. याला ग्राहकदेखील उत्तम प्रतिसाद देत असल्याचे दिसते. अग्निशमन दल व मुंबई महापालिका यांच्यामुळे मुंबईतील बाजारात मिळणाऱ्या दिव्यांवर बंदी घालती जाऊ शकते. मात्र कोणत्याही र्निबधांशिवाय सुरू असलेल्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याची जबाबदारी कोण उचलणार, असा सवाल सामाजिक कार्यकत्रे हिरेन जोशी यांनी उपस्थित केला आहे.
काय होऊ शकते?
’ रात्रीच्या वेळी हवाई दलाची विमाने सराव करण्यासाठी आकाशातून काही अंतर खाली येतात. यावेळी प्रखर प्रकाशझोतामुळे त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
’ या दिव्यांचा विद्युत तारेशी संपर्क येऊन नुकसान होऊ शकते.
’ उत्तुंग इमारतीच्या वातानुकूलित यंत्रांशी संपर्क झाल्यास आग लागू शकते.
’ बांधकाम इमारतींवर लाकूड आणि प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. अशा ठिकाणी दुर्घटना होऊ शकते.
’ प्रामुख्याने घुबड आणि वटवाघळांना त्रास होऊ शकतो
- Log in or register to post comments