Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कै च्या कै कविता ...

व — विशाल कुलकर्णी, Fri, 11/13/2015 - 08:14
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता... कधी मुक्यानेच बोलणारी कविता, तर कधी बिअरसवे डोलणारी.. येता जाता माफी मागणारी कविता....! झुरळावर स्वार होवून जोमाने ढेकणावर चढाई करणारी कविता.. आरसे फोडत, वादळात सापडत.. सिगरेटी फुकायला लावणारी कविता...! अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन् गोमुत्राची चव शिकवणारी कविता.. आमच्यासारखे समिक्षक असताना.. सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..! गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! डोळ्यासमोरून अलगद फिरताना.. डोक्यावरून जाणारी कविता.. आमच्या मंद डोक्यात मंदपणे.. कै च्या कै भरवणारी कविता...! (वरील कवितेतील आशय कुणाला समजला आहे का? असल्यास त्याला भर चौकात ढोलताशाच्या गजरात, हार तुरे घालुन सुळावर देण्यात येइल. ) कै च्या कै नवकवि ईरसाल म्हमईकर

प्रतिक्रिया द्या
2943 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ए
एस Fri, 11/13/2015 - 08:18 नवीन
काळजाला खच्याकखच्याक बिळे, आपलं ते, घरे पाडणारी कविता!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/13/2015 - 08:40 नवीन
गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! मला या चार ओळीचा अर्थ लागतो आहे, सायंकाळी रसग्रहण. -दिलीप बिरुटे (गुपचुप चुंबनाचा नाद असलेला)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 11/13/2015 - 09:25 नवीन
मिलते तो फिर एक बार, चर्चा करना वास्ते. ऊनो नाखुशेट होर बाक़ी लोगा भी होयंगे तो होरच रौनक होती ना बाबा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ए
एक एकटा एकटाच Fri, 11/13/2015 - 08:42 नवीन
सही आहे विशाल दा
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/13/2015 - 08:57 नवीन
समजायचं सोडूनच दे. ही कविता लिहिल्याबद्दल तुझा लकडीपुलावर सत्कार करायला पाहिजे! =)) ही कविता प्रसवायच्या आधी काही "खास" मिपाकरांच्या "भय"कथा किंवा "पप्पू वि. फेकू" सामना वाचला होतास काय? असं काहीतरी वाचलं तर मला अगदी अस्संच होतं.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 11/13/2015 - 09:22 नवीन
मिपावरचे काही वर्षांपूर्वीचे 'काही ख़ास लेख' वाचनात आले , मायबोलीवरील काही महान कविता वाचनात आल्या. मग छ्या, आपल्याला कधी जमणार असं लिहायला असं वैफल्य आलं आणि त्यातून हे जन्मलं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/13/2015 - 09:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा