Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जराशी.............

ए — एक एकटा एकटाच, Sun, 11/15/2015 - 11:31
तुझ्याच स्वप्नांत जागतो हा चंद्र आरास ह़ी चांदण्यांची मग सजते नभाशी हि रात्र अलगद मोहरुन येते जेव्हा तुझी चाहुल लागते जराशी...............| मदहोशल्या रात्री झुरते रातराणी नशा तव गंधाची तिला वाटे हविहविशी नाजुकशी अलवार मदमस्त हवा जेव्हा उठवित शहारे दरवळते जराशी............| फुलले रोमांच सर्वांगावरी या चुकतात ठोके या श्वासांच्या लयीशी रंगेल मिठीतल्या तुझ्या आवेगाला जेव्हा आठवून मनी मी लाजते जराशी..............| तु आलास दारी की हे तुझे प्रतिबिंब खेळे लपंडाव मन तुझ्या सावलीशी मिटल्या डोळ्यांतही तुझाच भास आहे जेव्हा कधी पापणी लवते जराशी...............| कधीतरी उत्तररात्री पाऊस पडुनी गेला छेडी मन वैरी, का? वाटे तुला मी नकोशी एकदातरी येऊन पुस तव अधरांनी जेव्हा सर नयनांतुन बरसे जराशी...............| तुझ्याच सयेत झुरतो हा चंद्र आरास ही चांदण्यांची आता विरते मनाशी हि रात्र अलगद मालवून जाते बाळगुन तुझी अवहेलना उरात जराशी...............|

प्रतिक्रिया द्या
2504 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/15/2015 - 12:38 नवीन
क्या ब्बात ! अवांतर : माफ़ कर मित्रा, पण लांबली बरीच.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 11/15/2015 - 12:55 नवीन
आवेग भावनांचा, कसा हा थोपवावा.... घ्या चालवून तुम्ही जरी लांबली जराशी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/15/2015 - 14:44 नवीन
मस्त प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/15/2015 - 14:43 नवीन
हो झालीय खरी बहुतेक एका ओळीत दोनच शब्द लिहिल्यामुळे लांबी जास्त वाटतेय. तरी पुढल्या वेळेस नक्की तुझ्या सुचनेचा विचार करीन :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
श
शब्दानुज Sun, 11/15/2015 - 12:51 नवीन
लांबली तर लांबली. आमच येड आमच्याशी बोलत नाही अस म्हणावं का डायरेक्ट? असो. प्रेयसीच्या या संवादात पुल्लिंगी चंद्र कसा आला? ( 'तो' चंद्र ना? ) बाकी आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/15/2015 - 14:51 नवीन
नायिकेच्या भावनेशी "चंद्र" रूपक म्हणुन वापरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
प
पैसा Sun, 11/15/2015 - 13:03 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sun, 11/15/2015 - 13:46 नवीन
वा वा वा. एक एकटे भौ मस्तच ना.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/15/2015 - 14:52 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
आ
आरोह Sun, 11/15/2015 - 15:56 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 11/16/2015 - 20:56 नवीन
छानय!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 11/17/2015 - 07:55 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/17/2015 - 12:22 नवीन
छान... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 11/20/2015 - 13:22 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sat, 11/21/2015 - 16:44 नवीन
खुप छान ...
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 17:16 नवीन
झकास! रोमॅण्टीक! सुप्पर!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा