घर शिफ्टिंग प्रक्रिया मदत धागा
घर शिफ्टिंग हा मोठा प्रोजेक्ट पुढील महिन्यात अंगावर पडलेला आहे. यापूर्वी कधी घर शिफ्ट केलेले नसल्याने अमळ टेंसन आलेले अाहे . कुठून सुरुवात करायची हे कळत नाहीये, सुरवातीला वाटलेलं तसं बोलवा ट्रक भरा सामान, आणि करा शिफ्ट इतके सोपे प्रकरण वाटत नाहीये. अत्ताचे घरच अलिबाबाची गुहा झालेली अाहे.इतके सामान माळ्यावर आहे.
सबब घर शिफ्टींग विषयीच्या टिप्स, डुझ अँड डोंट्स , आणि मिपाकरांचे शिफ्टिंग चे अनुभव यासाठी हा छोटेखानी धागा.
💬 प्रतिसाद
(68)
ब
बॅटमॅन
Tue, 11/17/2015 - 07:58
नवीन
हे माथाडीवाले पुण्यात सगळीकडेच माजलेले आहेत की काही ठिकाणीच आहेत?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 11/17/2015 - 08:28
नवीन
पुण्यात सगळीकडे आहेत का माहीत नाही पण ब-याच ठिकाणी यांनी उच्छाद मांडलाय हे खरे. मुव्हर्स पॅकर्सवाले सुद्धा आधीच बुकींग करताना फोनवर सांगतात की ते माथाडींचे तुमचे तुम्ही बघून घ्या.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 11/17/2015 - 09:50
नवीन
हम्म....
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 11/17/2015 - 08:10
नवीन
काही नाही हो.. नक्की कसं ते कळत नाही पण सगळं सामान आपोआप नव्या घरात जातंच आणि कसं तरी महिन्याभरात का होईना पण जागेवर लागतंच..
उत्सहात प्रतिसाद द्यायला आले होते पण मान्यवरांनी पार लग्ग्ना पर्यंतची काळजी वाहिलेली असल्याने मी पामर काय सांगणार.
शुभेच्छा!!
आणि हो.. रेवाक्का रॉक्स!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 11/17/2015 - 08:47
नवीन
"नक्की कसं ते कळत नाही पण, सगळं सामान आपोआप नव्या घरात जातंच आणि कसं तरी महिन्याभरात का होईना पण जागेवर लागतंच.."
ह्याला सहमती.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Tue, 11/17/2015 - 09:23
नवीन
नविन घरासाठि खुप खुप शुभेच्छा!.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 11/17/2015 - 13:35
नवीन
+++१११ आमच्याही शुभेच्छा!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पां(णविण घरात)डुब्बा! 
- Log in or register to post comments
अ
अमृत
Tue, 11/17/2015 - 10:05
नवीन
एकंदरीत मान्यवरांनी जवळपास सगळच कव्हर केलय तरी काही सूचना
१. फ्रिज पॅक करण्यापूर्वी त्याचा ट्रे काढून पाणी फेकून कोरडा पूसून घ्यावा.
२. वस्तु पॅक करताना डब्ब्य्यांवर क्रमांक टाकून एका कागदावर त्या डब्यात काय आहे हे नोंदवून ठेवावे.
३. कुंड्या असतील तर विशेष काळजी घ्यावी
४. पॅमु वाले जुन्या झाडण्या, माठ वगैरे फेकून द्यायचा सल्ला देतात, पण मी तो मानला न्हवता.
५. कुठल्या मजल्यावर सामान शिफ्ट कारायचय व लिफ्ट वापरता येइल की नाही हे आधीच स्पष्ट सांगावे नंतर खूप वाद होतात
६. बोलणी करताना कोटेशन मधे वस्तु पॅक करणे, लोडींग, अनलोडींङ, नविन घरात वस्तु चढवणे, उन्पॅकिंग उदा फॅन, बेड ईत्यादी याची तर्तूद तसेच सगळे सामान मानासारखे हवे तिथे लाऊन दिल्यावरच पूर्ण हिषीब केला जाईल हे सांगून ठेवणे. नंतर मनस्ताप वाचतो.
७. फ्रिजमधील शेल्फ जर सुटे असतील तर ते टेप लावून चिपकवून ठेवणे जेणेकरून ते फुटणार नाही.
८. सर्वात रिस्की काम लोणच्यांच्या बरण्या पॅक करणे असते चुकून जरी फुटली तरी सगळा सत्यानाश इतर सामानाचासुध्हा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/17/2015 - 10:09
नवीन
स्पा - मला स्वस्तिक नावाच्या पुण्यातल्या पॅ आणि मुव्हर्स चा अतिशय चांगला अनुभव २ वेळेस आला आहे.
हा फोन नंबर - ९८२२० ७४०५१
तळटीप - माझा ह्यात काहीही वैयक्तीक फायदा नाही.
- Log in or register to post comments
स
सुखी जीव
Tue, 11/17/2015 - 10:47
नवीन
पॅ आणि मुव्हर्स चा कामाचा वेग प्रचंड असतो . pack करताना पण आणि सामान नवीन जागी ठेवताना पण.
धडा धडा बॉकस आणून टाकायला सुरवात करतात आणि एकाच ठिकाणी रचतात सगळ सामान. त्यामुळे मोठ्या अक्षरात स्वयपाक घर, बाथरूम असे स्पष्ट लिहावे . दारात उभे राहून लगेच जो तो डाग त्या त्या ठिकाणीच ठेवायला सांगावा नाहीतर घरातल्या घरात हलवायला सुद्धा खूप कष्ट पडतात
- Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक
Tue, 11/17/2015 - 11:57
नवीन
बर मग श्रमपरिहाराचे जेवण कधी ठेऊ ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 11/17/2015 - 12:28
नवीन
पुण्याला २२ ता.ला ओरीगामी कट्टा आहे, त्या दिवशी ठेवलात तरी चालेल...
नाहीतर,
डिसेंबर १ रे ४ ह्या दरम्यान, (तारीख आणि इतर आनुषंगिक बाबी, अद्याप तरी नक्की नाही.) मुंबईला एक कट्टा आहे, तेंव्हा दिलेत तरी चालेल...
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/17/2015 - 12:41
नवीन
यह कब हुव्या? कट्टा असताना कट्टप्पांचा धागा नाही? कय्सा अनर्थ हयये, कय्सा अनाचार हयये!!
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/17/2015 - 12:42
नवीन
स्पा साहेब -
तुम्ही घराचे शिफ्टींग आधीच करुन मग मिपाकरां ची परीक्षा घेण्यासाठी तर हा धागा टाकला नाही हे आधी नक्की सांगा. :-)
प्रज्ञा ताईंनी सकाळपासुन मिपाकरांना कामाला लावले होते.
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 11/17/2015 - 12:47
नवीन
हे हे, नाही ओ प्रसाद साहेब.पुढील महिन्यात सुरु होइल. आदि ने सांगितल्याप्रमाणे सर्वात अाधी अता चांगला भंगारवाला शोधणे आहे
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/17/2015 - 12:49
नवीन
स्पा शिफ्ट झाला पण असं एका मिपाकराकडून कळलं होतं खरं!!
- Log in or register to post comments
श
शि बि आय
Tue, 11/17/2015 - 13:18
नवीन
पॅकर्स-मूव्हर्सचा अनुभव फार चांगला नसल्यामुळे समान आपलेआपण हलवणे खूप सोपे आणि बरे!! कंबरेचा काटा थोडा ढिला होईल कदाचित पण हा टास्क स्वतः करणे खूप फायद्याचे ठरेल. त्यानिमित्ताने थोडी अंगमेहनत देखील होते.
आपल्याकडे समान किती आहे ह्याची पूर्ण कल्पना येईल. त्यातले किती वापरता येण्याजोगे आहे ह्याची आपोआप मोजदाद होईल म्हणजे नको असलेल्या वस्तू परस्पर भंगारवाल्याकडे जातील.
सामानाची बांधाबांध सुरु झाल्यावर जवळच्या भंगारवाल्याला रोज एक चक्कर टाकण्यास सांगावे ते घेऊन जाण्याचा आपला वेळ आणि श्रम वाचतात.
किमती आणि नाजूक समान नंतर शिफ्ट करावे आधी मोठे आणि अति उपयोगी समान हलवावे. ते नव्या घरात लागल्यावरच नाजूक समान घरी आणावे.
शिफ्ट करायची वेळ येईपर्यंत जुने पण चांगले खोके, धान्यांची पोती, मोठाल्या ब्यागा, दाभाण, माफिया ( प्लास्टिकचा मोठा दोरा), मार्कर असे समान जमवून ठेवा.
दणकट वस्तू ( भांडी, छोटे डबे, जास्तीचे अंथरूण, पांघरूण) पोत्यात भरायला हरकत नाही. मात्र पोत भरले कि त्याचे तोंड शिवून त्यावर नंबर टाकून त्यातले जिन्नस दर्शनी भागात लिहून ठेवायचे. बाकी नाजूक सामानासाठी खोके आहेतच. सगळ्या डागांची यादी करावी. आणि त्याची १ कॉपी मुद्दाम शिफ्टिंग करणाऱ्या मुलांना द्यावी .
शिफ्टिंगच्या वेळी जुन्या घरात दोन माणसे, टेम्पो जवळ एक माणूस , नवीन घरी एक माणूस, तसे समान खाली उतरवताना किंवा वर चढवताना त्यांच्या बरोबर एक माणूस ह्याप्रमाणे राहावे.
बाकी जेथे समान ठेवायचे आहे तिथे घरातल्या लोकांपैकी कोणाला तरी थांबायचे आणि यादी नुसार समान आले कि नाही ते बघण्यास सांगावे. ह्यासाठी सिनियर सिटीझन सुद्धा चालतील. पण माणूस खमका हवा.
घर शिफ्टिंग आधी सगळ्यांनी नवीन घरी जाऊन घर कसे लावायचे ह्याचा विचार करावा. सोफा, टेबल, कपाट, अशा मोठ्या गोष्टीची मापं ( उंची X रुंदी X लांबी X खोली) जवळ ठेवावीत जेणेकरून आपण निवडलेली जागेत ती गोष्ट बसतेय का ह्याचा अंदाज येईल. घर लहान असल्यास तर हा टास्क जरूर करावा. ( मला ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला नंतर तर मी घरभर टेप घेऊनच फिरू लागले आणि जवळ जवळ सगळ्या गोष्टींची माप लिहून घेतली त्यामुळे त्याचा फायदा आता होईल )
जर घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्यालाही नवीन जागेत घेऊन जावे तिथे त्याला आवडीचा खाऊ द्यावा तसेच काही वेळ तिथे त्याला खेळवावे म्हणजे त्यालाही त्या जागेशी जुळवून घेणे कठीण जाणार नाही.
नवीन घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधीच करून ठेवा. जमल्यास तयार सरबत वैगरे आणि सुका खाऊ जवळ ठेवा.
बाकी सगळ्यांनी खूप उपयुक्त सल्ले आणि माहिती दिलेलीच आहे.
३ कामसू गडी (बायका पुरुष कोणीही) कामाला लागले की २ दिवसात घर पोत्यात आणि खोक्यात मावत. मात्र घर लावताना घरच्या बाईचा जास्त वेळ जातो. खूपसे पेशन्स ठेवावे लागतात.
येत्या महिनाखेरला मीसुद्धा दुसरया घरी शिफ्ट होणार आहे. त्यामुळे माझ्या मनातील शिफ्टिंगसाठी केलेली छोटी मोठी तयारी शेयर केली.
रच्याक नवीन घराच्या शुभेच्छा !! नवीन घर लागेपर्यंत देव तुम्हास उदंड पेशन्स देओ…
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 11/18/2015 - 05:41
नवीन
लिहिण्यात फार वेळ जाईल. फोन करते.
अन्नपदार्थ शक्य तितके संपवायाच्या मागे लागा इतकेच सांगते . आणि फ्रीझ रिकामा ठेवायचा.
मू पॅ वाल्यांशी घासाघीस करता येते ही टीप लक्षात ठेव. १४ हजारावरून ४ हजारावर उतरवता येते! :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2