संस्कृती
१.
पुलाच्या पलीकडे
एक जमात राहते
रानटी आहे असे
ऐकून आहे फ़क्त
मी कधी पूल ओलांडला नाही
पुलाच्या अलीकडे
माझी जमात राहते
सुसंस्कृत म्हणवते
पूल न ओलांडणे
हीच आमची संस्कृती आहे
२.
पुलापलीकडे राहते
एक विचित्र जमात
दुर्बीण लावून बघतात
असे डोकावून पाहणे म्हणजे
शुद्ध असंस्कृतपणा!
पुलाअलीकडे आम्ही राहतो
आमच्या घरांना नसतात
भिंती,खिडक्या आणि दारं.
पारदर्शक व्यवहार असणे
हीच आमची संस्कृती
३.
एका पावसाळ्यात
नदीला पूर आला
पूल वाहून गेला
गावे बुडाली.
अलीकडचे-पलीकडचे
दोघेही झाले आता
असंस्कृत!
💬 प्रतिसाद
(17)
ए
एस
Wed, 11/18/2015 - 12:55
नवीन
इतकी छान कविता आणि एकही प्रतिसाद नाही अजून!
कविता आवडली. माणसांमध्ये गट किंवा समूह बनवण्याची सहजप्रवृत्ती आढळून येते. तशीच ती इतर प्राण्यांमध्येही आढळते. सर्वच प्राणिमात्रांमध्ये समूहाबाहेरच्यांना सहजासहजी न स्वीकारण्याची प्रवृत्तीही दिसते. पण मानवातल्या समूहबाजीला आणखी एक पदर आहे तो म्हणजे इतर समूहांना कुठल्या न कुठल्या आधारावर आपल्यापेक्षा कमी लेखणे. ही समूहव्यवस्थेची उतरंड जगातल्या बर्याच संघर्षांच्या मुळाशी आहे.
ह्या कवितेचे मोठेपण ह्याच उतरंडीच्या निरर्थकतेवर सहजपणे भाष्य करण्यात दिसून येते. त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडली. पुलेशु.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 11/18/2015 - 12:56
नवीन
मस्त कवीता..
पूल माणसांना जोडतोही आणि मोडतोही !!!!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 11/18/2015 - 12:58
नवीन
अगदी करेक्ट आणि पर्फेक्ट,
आवडली..
- Log in or register to post comments
न
निवांत पोपट
Wed, 11/18/2015 - 14:15
नवीन
स्वामीजी, कविता भारीय....
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 11/18/2015 - 14:25
नवीन
स्वाम्या, खूप छान लिहितो आहेस हल्ली! किसीकी नजर ना लगे!
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 11/18/2015 - 14:29
नवीन
नज़र बस दिल्ली(वालों/वाली) की लग सकती है!
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Wed, 11/18/2015 - 15:57
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 11/19/2015 - 13:10
नवीन
अर्थ पूर्ण रे संकू!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 11/19/2015 - 13:43
नवीन
Mast re swamya
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 11/19/2015 - 14:00
नवीन
अप्रतिम कविता
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Fri, 11/20/2015 - 08:19
नवीन
मस्त कविता
आणि
"एस" ह्यांचा प्रतिसाद आवडला
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 11/20/2015 - 08:50
नवीन
अर्थपूर्ण कविता.
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 11/20/2015 - 09:02
नवीन
सुरेख कविता आणि एस यांचा प्रतिसादही.
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 11/22/2015 - 03:36
नवीन
वा! कविता आणि प्रतिसाद दोन्ही छान!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sun, 11/22/2015 - 05:44
नवीन
स्वाम्या साला लिहितो भारी.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 11/22/2015 - 05:49
नवीन
स्वामिज्जि की महान रचनाऐं
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Sun, 11/22/2015 - 05:55
नवीन
सोप्या शब्दात तुम्हाला जे कवितेत दाखवायचे आहे ते अचूक दाखविले आहे . विचार करायला भाग पाडनारी कविता
- Log in or register to post comments