Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दौलतजादा

ज — जव्हेरगंज, Wed, 11/18/2015 - 16:56
सरपटत येणाऱ्या हुंदक्यांचे नाक चोंदुन पायबंध घालताना फोडणीच्या भातावर लिंबु पिळुन खाताना तुळशीपत्राचे वृंदावन लाथेने उडवताना डबल बॅरल काढुन रानडुक्कर टिपताना मरतुकड्या बामणाला दगड फेकुन घालताना विसरु नकोस हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन रुळलेली वाट वाकडी करताना °°°°°°°°°°° थरारनाट्याचा दुसरा अंक लिहीला जातो निसरड्या बाहुपाशात श्वास गुदमरुन जातो समुद्राची भिती काळजात घुसत जाते बेफिकीर वटवाघुळ केविलवाणे तडफडतं जेव्हा कुठुणशी एक कुणकुण कानावर येते आणि आता ही तलवार सरकन मागे फिरवताना विसरु नकोस हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन रुळलेली वाट वाकडी करताना

प्रतिक्रिया द्या
1702 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चांदणे संदीप गुरुवार, 11/19/2015 - 06:49 नवीन
दौलतजादा = ? जायजाद(तेच ते - जायदाद/मालमत्ता/संपत्ती/इस्टेट/Property ) वगैरे का? नसाव बहुतेक! कोणीतरी हिरो आहे हा...अंधाराचा सुपरहिरो किंवा निंजा किंवा सामुराई किंवा मार्सिनरी?? डोक्याला मुंग्या आल्या राव! लिहिलंय परिणामकारक पण....
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज गुरुवार, 11/19/2015 - 13:00 नवीन
_____/\____
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 11/19/2015 - 13:44 नवीन
धन्यवाद संदिप, बाबाजी! थोडं स्पष्टीकरण देतोच, कविता 'बडे बाप की बिगडी हुई औलाद' ला समोर ठेऊन लिहीलीय. दौलतजादा=संप्पत्ती हे गृहित धरलयं. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा