Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

र
राजेश कुलकर्णी
गुरुवार, 11/19/2015 - 19:29
🗣 108 प्रतिसाद
सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते? स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा . . . दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे. मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग. हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय? दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे. शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे. यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा. आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला. शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.
वर्गीकरण
स्फुट
राजकारण

प्रतिक्रिया द्या
14522 वाचन

💬 प्रतिसाद (108)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/23/2015 - 14:32 नवीन
मुळात तो अधिकारी पाकिस्तानातल्या भारतीय वकिलाती चा अधिकारी होता पण ग़ज़लनवाज त्याला "अपनावाला" समजून तोंड ढीले सोडते झाले अन त्या अधिकाऱ्याने हसून विषय बंद केला,
ही कथा अजिबात पटत नाही आहे रे बापू. एक तर असे शेरे मारण्याआधी तो माणूस समोरच्याला नाव-गाव नाही विचारणार? त्या अधिकार्याची टी.व्ही.वर येऊन सरळ बोलायची हिम्मत आहे? आणी त्या अधिकार्याने उलटे सुनावले असेल तर प्रश्नच मिटला. आमचे अधिकारी 'मी साळसूद' हे दाखवायच्या प्रयत्नात असतात असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/23/2015 - 14:42 नवीन
कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा.
योग्य बोललास रे राजेश.नातवंडांना शारदाश्रम्,बालमोहन ऐवजी बॉम्बे स्कॉटिशमध्ये घातल्याची बातमी वाचल्यावर शिवसेनेला मत देणे कायमचे बंद केले होते.असो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/24/2015 - 07:16 नवीन
लेखात मांडलेल्या बहुतांश मुद्यांशी सहमत आहे. शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंच्या हयातीत त्यांच्याच सांगण्यावरून मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी झाली. तेंव्हा 'शिवसेना ही समाजसेवी संघटना आहे' असे जाहिर करण्यात आले होते. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' अशी घोषणा प्रबोधनकारांनी केली होती. तसेच, मराठी माणसाची व्याख्या 'जी व्यक्ती २० किंवा त्याहून अधिक वर्षे महाराष्ट्रात आहे ती मराठी' अशी केली होती. नोकरीच्या मुद्द्यावर शिवसेनेने जे दाक्षिणात्यांवर विरोधाचे हत्यार उपसले होते ते योग्यच होते. त्या काळात शिवसेनेच्या सहाय्याने निरलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज, गोदरेज, सिएट टायर्स, स्टेट बँक, अमेरिकन एक्स्प्रेस आदी आस्थापनांमध्ये मराठी माणसांची भरती सुरु झाली. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये ८० टक्के मराठी उमेदवारांना नोकरीचा अधिकार मिळाला. ह्या सर्व विधायक कार्यामागे शिवसेनाच होती. आणि त्यामुळे तत्कालीन बेकार मराठी तरूण शिवसेनेकडे आकृष्ट झाला. फुटपाथ वरती शिवसेना पुरस्कृत वडापावच्या गाड्या मराठी पोरांनी लावायला सुरुवात केली आणि कांही अंशी उद्योजकता मराठी माणसात रुजायला सुरुवात झाली. मराठी माणसाला हक्कांची जाणीव शिवसेनेने करून दिली. ह्या सर्वाचे योग्य ते श्रेय शिवसेनेला दिलेच पाहिजे. इथपर्यंत शिवसेना चांगली होती. लोकमानसात, खास करून मराठी मनांत, शिवसेनेला मानाचे स्थान होते. पुढे महाराष्ट्राच्या शासकिय कर्मचार्‍याच्या संपात शिवसेना तोंडघशी पडली. 'संप अयोग्य आहे मागे घ्या. तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत' असे संपकार्‍यांना बाळासाहेबांनी सुनविले होते आणि सरकारने संपकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून शासकिय कर्मचार्‍यांच्या मनांत शिवसेने बाबत दुरावा निर्माण केला आणि शिवसेनेचा एक मोठा मतदार गट तोडला. शिवसेनेच्या कुठल्याही दंगलीत समाजकंटकांनी दंगलीचा फायदा घेऊन (आणि शिवसैनिकांनी समाजकंटकांच्या नांवाचा फायदा घेऊन) दुकाने लुटली. वैयक्तिक हेवेदावे साधून घेतले, तोडफोड केली आणि शिवसेना बदनाम होत गेली. ह्याला वेळीच आवर घालण्याऐवजी बाळासाहेबांनी हिच पक्षाची ताकद बनविली आणि शिवसेनेला गुंडसेना हे नामाभिमान प्राप्त झाले. सभ्य आणि सारासार विचार करू शकणारा मध्यमवर्ग शिवसेनेपासून दूर जाऊ लागला. पुढे खंडणी शिकवण सुरु झाली. आणि त्यालाच महत्व प्राप्त होऊन शिवसेनेचे समाजकारण मागे पडत गेलं. 'शिवसेना कधीच राजकारणात पडणार नाही' ही प्रबोधनकारांची घोषणा केंव्हाच मागे पडून शिवसेना राजकारणात गळ्यापर्यंत बुडाली होती. मुसलमानांना, परप्रांतियांना विरोध करणार्‍या शिवसेनेत मुसलमानांचा आणि पारप्रांतियांचा प्रवेश झाला होता. पाणी बरेच गढूळले होते. पुढे प्रदेशस्तरावरून देशस्तरावर शिवसेना नेण्याच्या उद्देशाने भारतिय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात मराठी उद्योजकांच्या संधी डावलून उत्तरभारतिय उद्योजकांनी लहान मोठी सरकारी कामे मिळविण्यास सुरुवात केली. भारतिय जनता पक्षाशी केलेल्या राजकिय हातमिळवणीमुळे शिवसेनेला उत्तरभारतियांना विरोध करता येईना आणि शिवसेना 'मराठी माणसाची' उरली नाही. पण तो पर्यंत बरीच ताकद गोळा केली असल्यामुळे आता मराठी माणसाची गरजही उरली नव्हती. मग सुरू झाले राजकिय स्वार्थी डावपेच आणि अर्थकारण. शिवसेनाही एक स्वार्थी राजकिय पक्ष म्हणूनच उरला. मराठी माणसांची सहानुभूती गमावून बसला. शिवसेनेची सुरुवातीची आदर्श प्रतिमा १०-१५ वर्षांपेक्षा जास्त टिकली नाही. पण स्वार्थाने बरबटलेली बाजू जास्त प्रभावीपणे पुढे आली. बाळासाहेबांना मान होता तो त्यांच्या धाडसी वक्तव्यामुळे. तथाकथित 'ठाकरी शैली' समाजाच्या एका वर्गाने उचलून धरली, उदो उदो केला पण भडकाऊ भाषणाने निवडणूका जिंकता आल्या नाहीत. शेवटच्या निवडणूकीतही शिवसेनेला जनतेने नाकारले तेंव्हा आपले काय चुकले आहे ह्यावर विचार न करता 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' असे उद्वेगजनक उद्गार शिवसेनाप्रमुखांनी काढले. (नंतर सारवासारव केली). कुणाही राजकिय पुढार्‍यांचे स्मारक-पुतळे उभारू नयेत ह्या वैयक्तिक मताचा मी आहे. त्यातून दादर मधील एव्हढी मोठी जागा स्मारकाच्या नांवाखाली शिवसेनेच्या घशात ढकलणे मान्य होत नाही. उद्या बारामतीत पवार साह्बांचे मोठ्ठे स्मारक होईल, दादरमध्ये उद्धवजींचेही होईल आणि राज ठाकरेंचेही होईल. आमचा ह्या सर्वाला कितीही विरोध असला तरी आम्हाला विचारतो कोण? तेंव्हा जे चालले आहे ते पाहात राहणे एव्हढेच हातात आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/24/2015 - 07:41 नवीन
काय जबरी विश्लेषण आहे काका __/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
महासंग्राम Tue, 11/24/2015 - 11:52 नवीन
हुश्श्श……. झाला एकदाचा १०० नंबरी धागा… पदार्पणातच शतक मारल्याबद्दल अभिनंदन ना बाप्पू !!!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 11/24/2015 - 12:06 नवीन
शंभर झाल्याबद्दल या धाग्याला स्मारक* म्हणुन घोषीत करावे. आखिलमिपाहेवनवाशीआयडीफॅनक्लब.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 11/24/2015 - 12:12 नवीन
जेपी खरंच हेवनवाशी जाहला का हो हा आयडी ????? हेवनवाशी= छिद्रान्वेशी कसला टायमिंग आहे ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
संदीप डांगे Tue, 11/24/2015 - 12:25 नवीन
फुल्ल ट्यांक मारुन अनुमोदन... धागावाचनमात्र करावा. परत नेहमीचीच दळणे दळायला येण्याआधी कारण गिरणीमालक पदच्युत झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा