कॅनडातील (कनाडा) वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संधी
माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.
मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत. खरेतर सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, FC/F/FA, झालंच तर MBA असे किती पर्याय आहेत. शिवाय भारतातही रामा नारायण(दिल्ली), झेविअर(कोलकाता), लोयोला(चेन्नई), नरसी मूनजी (मुंबई) आणि बंगलोरच्या ख्रिस्त कॉलेजसारखे नामांकित कॉलेजेस आहेत. पण आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो.
आता कॅनडात आपल्या 12+3 वर कॉमर्सचे कुठले ऑप्शन उपलब्ध आहेत. टोरोंटो (Toronto), अल्बर्टा (Alberta), डी मोंटरेल (de Montréal), ब्रिटीश कोलंबिया (British Columbia), मॅकगिल (McGill), लवाल (Laval), कॅलगरी (Calgary), वेस्टर्न ओंटारिओ (Western Ontario) आणि ओटावा (Ottawa) या काही चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत, हे वाचून-ऐकून माहिती आहे. कृपया आता कुठल्या शिक्षणाच्या संधी कॅनडात मिळू शकतील, पात्रता, खर्च, इतर काही टेस्टस याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. काही स्कॉलरशिप मिळू शकतील का? SPP अर्थात स्टुडेंट पार्टीसीपेशन प्रोग्राम काय आहे?
आयसीआयसीआय बँकेच्या कॅनडा शाखेची विद्यार्थ्यांना काही मदत होते का?
कॅनडात सुमारे 70% भारतीय जेथे राहतात त्या Toronto, Vancouver मध्ये Surrey किंवा Abbotsford आणि नजीकच्या उपनगरात काय संधी आहेत? Calgary, Edmonton आणि Montreal हेही भारतीय लोक असलेले ठिकाण आहे. तिथे काय संधी आहेत? या भागात अर्न एंड लर्न सोपे होवू शकेल काय?
कॅनडाइतके चांगले, दर्जेदार व तुलनेने स्वस्त शिक्षण अन्य कुठल्या सुरक्षित युरोपीय, अमेरिकी प्रांतात मिळू शकते का?
कॅनडातील वाणिज्य शिक्षण आणि भारतीय शिक्षण यामुळे मिळणाऱ्या जागतिक संधीत काय फरक पडू शकतो?
केवळ UK व्हिसा मिळवून त्या आधारे लवकर US व्हिसा मिळवायचा ही तर मायग्रेशनवाल्यांची आयडिया युवापिढीला गारुड घालत नसेल ना? कारण माझी एक बहिण अशीच UK तून US ला गेलीय. पण ती सॉफ्टवेअरमध्ये आहे.
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार?
कृपया मार्गदर्शन करावे.
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार?जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा.बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात.संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या.आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो.तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;) ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.