Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गॅलरी .....

श — शिव कन्या, Sat, 11/21/2015 - 18:37
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

प्रतिक्रिया द्या
4758 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ए
एस Sat, 11/21/2015 - 19:25 नवीन
छान आहे कविता. आवडली. शेवट परत सुरुवातीकडे घेऊन जातो.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 11/24/2015 - 13:05 नवीन
वा फारच छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रातराणी Sat, 11/21/2015 - 20:26 नवीन
सुरेख! :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 01:43 नवीन
खूपच आवडली
  • Log in or register to post comments
प
पिचकू Sun, 11/22/2015 - 01:50 नवीन
काय आवडली? कविता /गॅलरी?"तुझ्या शब्दांचे अत्तर म्हणजे काय? "नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही!"-ते बरं केलं.तेरावा मजला असेल तर?
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 02:16 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 11/22/2015 - 02:18 नवीन
अफाट!
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Sun, 11/22/2015 - 03:22 नवीन
मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला!
हे विषेश आवडले.
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 11/22/2015 - 03:23 नवीन
वा!!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/22/2015 - 17:59 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/30/2015 - 09:11 नवीन
हि कविता देखिल आवडली
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 11/30/2015 - 09:31 नवीन
सुन्दर!
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Mon, 11/30/2015 - 09:42 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 11/30/2015 - 09:43 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा