Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...

व — विशाल कुलकर्णी, Sun, 11/22/2015 - 18:18
जिलब्या इथे कुणाला का आवडू नये? वादात या कुणीही सहसा पडू नये लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला... हातात आज धोंडा या सापडू नये... गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू आधीच सांगतो मी, कोणी नडू नये राजाच मी मनाचा, हासू नका कुणी खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये.., तूही जरा चरावे, मीही चरेन ना, बेकार भांडणांनी दोघे सडू नये नाहीस तू तरीही आहे निवांत मी, माझ्याविना तुझेही काही अडू नये, वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...  नव-हझलकार इरसाल म्हमईकर

प्रतिक्रिया द्या
13605 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ज
जॅक द रिपर Sun, 11/22/2015 - 18:19 नवीन
विशाल :)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 18:21 नवीन
हायला विश्ल्याअण्णा, तू पण विडंबने करणार? मग आमच्या राकुंनी जायचे कुठ्ठे? अस्सं नै करायचं!!!बरं का!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/22/2015 - 18:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Sun, 11/22/2015 - 18:23 नवीन
काही असो पण हा गाणारा प्रचंड प्रसिद्ध झाला आहे आणि त्याचा इथे येऊन लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचा उद्देश सफल झाला आहे असे म्हणेन. बाकी काव्य अगदि प्रसंगोचित आहे? :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 18:28 नवीन
वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ... _/\_
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 11/22/2015 - 18:34 नवीन
च्यामारी सेल्फ नमस्कार?? आरशात बघून का? गाईन मीच गाणी आणि करीन मीच नमस्कार झालेय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 03:17 नवीन
अभ्याभौ, अरे तो नमस्कार समस्त मिपाकरांना आहे आणि कोट केलेले वाक्य ही समस्त मिपाकरांना हात जोडून केलेली विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 18:40 नवीन
आर्र तिच्या, स्वतःच्या काव्याला दंडवत? असे का हो? बाकी कविता एकदम 'हाण्ण' झाली आहे. """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक http://phuphata.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
अ
अजया Sun, 11/22/2015 - 18:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/22/2015 - 18:52 नवीन
यार हमारी बात सुनो ऐसा एक इन्सान चुनो जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो ...
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 11/23/2015 - 03:23 नवीन
ये थोडा जीझस चा पहला पत्त्थर वो मारेगा... चा फेरफार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 11/23/2015 - 05:00 नवीन
'Let Him Who Is Without Sin Cast the First Stone' राजेश खन्नाच्यचित्रपताटातले एक गाणे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 03:41 नवीन
मी तरी काय वेगळे म्हणतोय गजोधरजी..? नाहीस तू तरीही आहे निवांत मी, माझ्याविना तुझेही काही अडू नये, वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ए
एस Mon, 11/23/2015 - 05:28 नवीन
पाप जरुर होते हैं पर पापी नहीं है! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/23/2015 - 03:25 नवीन
राजाच मी मनाचा, हासू नका कुणी खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..
अगदी अगदी... पण त्या आत्मांध मतिमंदाला हे कळेल काय?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 11/23/2015 - 03:37 नवीन
:D
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/23/2015 - 03:42 नवीन
तिच्या मारी......
खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..,
साठी एक मस्तानी (पेय) लागू आपलेकडून..
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/23/2015 - 06:15 नवीन
अग्गागागागा लेका विकु काय बे हे ! :D :D
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 11/23/2015 - 06:21 नवीन
हायला ब्येश्ट, तुमची प्रेर्ना घेउन कैतरी लिहावस वाटतय ;)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 06:30 नवीन
नेकी और ..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
म
मृत्युन्जय Mon, 11/23/2015 - 06:31 नवीन
श्री विशाल कुलकर्णी यांचा विजय असो. :)
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 11/23/2015 - 09:19 नवीन
खल्लास!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 16:01 नवीन
कसचं कसचं ... ;)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 11/23/2015 - 19:07 नवीन
हा भास झाला की मग सगळ्यांना निराकार गाढवजी आठवले?;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा