Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाषांची गंमत

श
शान्तिप्रिय
Tue, 11/24/2015 - 13:19
🗣 29 प्रतिसाद
नमस्कार. मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजून घ्यावे. १. मराठीत आपण दात घासतो व धुतोही. पण म्हणताना फक्त दात घासतो. भांडी सुद्धा. २. पेपर तपासणे हा शब्द मनोरंजक आहे. गुन्ह्याचा सुद्धा तपास करतात. ३. कन्नड आणि हिंदीत 'शिकणे' म्हणजे फक्त वाचणे (हिंदी - पढना, कन्नड - होद) ४. बंगाली भाषेत चहा खातात. ५. तर्कारी हा शब्द हिंदी आणि कन्नड मधे भाजीसाठी वापरतात. ६. बातम्या देताना इंग्रजीमधे बातम्या वाचतो असे सांगतात, मराठीमधे देत आहे असे सांगतात, आणि हिंदीमधे ऐका अशी विनंती करतात. ७. कन्नडमधे शेवटचा आकार लुप्त असतो. उदा - अनुपमा हे अनुपम असे लिहितात. भाषेविषयी अशा मनोरंजक गोष्टी तुमच्या कडे असतील तर जरुर या धाग्यावर लिहा.
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
6186 वाचन

💬 प्रतिसाद (29)
'
'पिंक' पॅंथर्न Tue, 11/24/2015 - 13:28 नवीन
ते भाषांच ठिक आहे ... पण लेखनाचं पार वाट्टोळं केलं राव तुम्ही !!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 11/24/2015 - 13:29 नवीन
ते भाषांच ठिक आहे
भाषा नाही हो, भाशा म्हणायचे...
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Tue, 11/24/2015 - 13:31 नवीन
प्रथमच लिहितोय. माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 11/24/2015 - 13:35 नवीन
तुम्ही नावाप्रमाणे शांतीप्रिय असावेत. माफी वगैरे मानण्याची इथली प्रथा नाही, आणि त्याची गरज पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
'
'पिंक' पॅंथर्न Tue, 11/24/2015 - 13:36 नवीन
मी लहानपणी "भाषा" हा शब्द "भाषा" असाच शिकलोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 11/24/2015 - 13:37 नवीन
अहो पण लेखक भाशे बद्दल बोलतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
'
'पिंक' पॅंथर्न Tue, 11/24/2015 - 13:39 नवीन
तो "भाषा" चा प्रतिसाद तुम्हाला द्यायचा होता चुकुन "शांतीप्रिय" ना गेला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सागरकदम Tue, 11/24/2015 - 13:45 नवीन
कोणाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
च
चित्रगुप्त Tue, 11/24/2015 - 13:30 नवीन
लेखाचा विषय चांगला आहे आणि वाचकांनी प्रतिसाद दिल्यास खूप विस्तार होऊ शकतो . परंतु मुळात धागाकर्त्याने शुद्धलेखनाकडे नीट लक्ष देऊन, प्रकाशित करण्यापूर्वी लेखन अचूक होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे .
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Tue, 11/24/2015 - 13:37 नवीन
कामवालीला कळायला नको हे. नाहीतर दोन कामांचे पैसे मागेल. :-)
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 11/24/2015 - 15:09 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
द
दमामि Wed, 11/25/2015 - 03:30 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
श
शान्तिप्रिय Tue, 11/24/2015 - 13:54 नवीन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार मिसळ्पाव सारख्या प्रसिध्ध सन्केत्स्थळावर पहिला लेख लिहिण्यास उतावीळ होतो. ब्याकस्पेसने घात केला. हळू हळू शुद्द्धलेखन सुधारेल. :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 11/25/2015 - 07:29 नवीन
क्रोम वापरत असाल तर मोझिला फायरफॉक्स वापरा, सोपा पडेल (?) सोपा जाईल , सोपा होइल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
श
शान्तिप्रिय Tue, 11/24/2015 - 14:09 नवीन
गुजराथीत वाहन हाकतात. इयत्तेला धोरण असा शब्द आहे. मराठीत तूर्त हा शब्द आपण तात्पुरता या अर्थाने वापरतो. कन्नड मध्ये तूर्तू म्हणजे आपत्कालीन.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 11/24/2015 - 14:10 नवीन
घासलेली व विसळलेली भांडी पुसून ठेवण्याचेही तिसरे काम आहे. लादी-पोता मधेही केर काढणे व फरशी पुसणे ही दोन कामे आहेत. कपडे धुण्यांत कपडे धुणे व वाळत घालणे ही स्वतंत्र कामे आहेत. ज्या दिवशी भारतात कामवाला/कामवाली मिळणार नाहीत किंवा परवडणार नाहीत त्याच दिवशी अच्छे दिन आले, असं म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 11/24/2015 - 14:16 नवीन
त्याच दिवशी अच्छे दिन आले, असं म्हणता येईल.
तेव्ह्ढंच नाही, तर त्या कामवाल्यांन्ना स्वतःसाठी भांडी आणि कपडे धुवणयन्त्रे विकत घेणे आणि वापरणे परवडेल तेव्हा खरं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ज
जयन्त बा शिम्पि Wed, 11/25/2015 - 01:35 नवीन
हॉटेलात वेटर अन्नपदार्थ ' वाढतात ' आणि जंगलात झाडे ' वाढतात ' मी ' पुण्यात ' रहातो आणि लोकांनी ' पाप आणि पुण्यात ' फरक केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/25/2015 - 04:17 नवीन
मागील २-३ आठवड्यातील मिपा रतीब लेख वाचा.. उलगडा होईल. "काही लेख वाचाल तर वाचाल" आणि काही लेख न वाचाल तर नक्की वाचाल... अता कसे वाचायचे ते तुम्ही ठरवा.. वाचलेला मिपाकर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/25/2015 - 05:59 नवीन
पण मिपाकरांना सगळ्यात जास्ती कशाची धास्ती असेल तर, "मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजुन घ्यावे." ह्या ओळीची.
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 11/25/2015 - 06:28 नवीन
_/\_ शंभर टक्के सहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जातवेद Wed, 11/25/2015 - 07:10 नवीन
आपले वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान चांगले असावे. अजून सविस्ताराने लिहावे. पुलेशु (पुढील लेखनास शुभेच्छा). शक्यतो काही दिवसांचा गॅप घेऊन टाकणे नाहितर अतिपरिचयातवज्ञा होईल.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 11/25/2015 - 08:20 नवीन
युनि०च्या पहिल्या दिवशी सगळ्या सहाध्यायांच्या आपसांत ओळखी व्हाव्यात म्हणून एक डिनर आयोजित केलं होतं. माझ्या शेजारी एक चिनी होता. इंग्लिशची बोंब - एक इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी वापरून अडखळत अडखळत बोलत असे. एकमेकांच्या फ्यामिलीची वगैरे चौकशी करून झाली. मला एक मुलगा आहे हे समजल्यावर त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला, "how many more are you allowed to produce??" मला काय उत्तर द्यावं समजेना!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 11/25/2015 - 08:37 नवीन
अगागागागा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 11/25/2015 - 09:17 नवीन
मग तुम्ही काय उत्तर दिलं? (मला उगाचच वऱ्हाड निघालंय…मधलं "…अवर वावर प्रोडूस्ड" आठवलं)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 11/25/2015 - 11:48 नवीन
आता "प्रोड्यूस" म्हणून एकदम वैयक्तिक पातळीवर गेल्यावर काय उत्तर देणार? =)) ते कँटोनिझचं थेट भाषांतर होतं! पण काही दिवसांनी "हाऊ मेनी आर यू अलाऊड..."चा उलगडा झाला. चीनमध्ये एकापेक्षा जास्त मुलं होऊन द्यायची असतील तर बर्‍याच सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सूड Wed, 11/25/2015 - 11:15 नवीन
वाईट्ट!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गवि Wed, 11/25/2015 - 12:46 नवीन
प्रत्येक भाषेला स्वत:च्या इडियॉसिंक्रसीज असतात हे तर आहेच, आणि एकच शब्दप्रयोग दोन भाषांत खूपच वेगवेगळ्या छटांनी होताना दिसतो. लाचार/ लाचारी याचा हिंदीत उपयोग मजबूर, डिपेन्डन्समुळे हात बांधले गेलेला असाच आहे पण मराठीत तो फारच केविलवाणेपणा, मिंधेपणा आणि प्रसंगी फेकलेला तुकडा खाऊन लोचटासारखा लांगूलचालन करणारा इतक्या रेंजमधे वापरला जातो. हिंदीत तितक्या मानहानीकारक अर्थाने तो नसावा. लेखाचा विषय रोचक.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 11/25/2015 - 19:30 नवीन
मी आधी मराठीतला "हैराण" आणि हिंदीतला "हैरान" यात गडबड करायचे. एकदा एका मैत्रिणीला कुठला तरी त्रासदायक अनुभव सांगताना "मै हैरान हो गई" म्हटल्यावर ती माझ्याकडे गोंधळून पाहायला लागली, मग लक्ष्यात आले की मी बहुतेक "परेशान" म्हणायला हवं होतं. तसंच मराठीत "लाज" हा शब्द थोडा गोंधळात टाकणारा आहे. इंग्रजीमधल्या shame/ embarrassment सारखा नुसताच शब्द वाचून नक्की अर्थ कळत नाही. (बाकी भाषांमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा