Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय करता येईल ?

अ
अत्रन्गि पाउस
गुरुवार, 11/26/2015 - 04:56
🗣 29 प्रतिसाद
गेली २० वर्षे पूर्णवेळ गृहिणी तथापि अलीकडे दिवसेंदिवस कमी होणाऱ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि वाढणारा रिकामा वेळ हि पार्श्वभूमी BSC -physics with distinction हि शैक्षणिक अर्हता लग्न पूर्व ५-६ वर्षे अकौंटस department नोकरीचा अनुभव चाळीशीची सुरुवात सध्या सकाळी १०:०० ते १८:०० - संपूर्ण रिकामा वेळ शिकवण्या करण्यात रस नाही पैसा मिळवणे हे प्राधान्य नसले तरी सशुल्क वेळेचा सदुपयोग आणि बिझी राहणे हि गरज

काय करता येईल ???

वर्गीकरण
मदत

प्रतिक्रिया द्या
6480 वाचन

💬 प्रतिसाद (29)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/26/2015 - 05:03 नवीन
तुमच्या माहितीत तुम्ही या ताईंना काय करायचं नाहीये ते सांगितलंय. पण त्यांना स्वतःला काय करायची इच्छा आहे ते सांगितलंत तर काही सुचवता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 11/26/2015 - 05:08 नवीन
सोप्या शब्दात त्यांना एखादी जमेलशी नोकरी करायची आहे ...काय जमू शकेल हे पर्याय समोर आल्यावर निश्चित करता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे गुरुवार, 11/26/2015 - 05:10 नवीन
हे पहा श्री जुबेर बिजापुरे यांचा http://www.misalpav.com/node/33837शेअर ट्रेडिंग कोर्स या धाग्यावरील प्रतिसाद. (फुकटचे श्रेय ढापणे पटत नाही) मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल. http://marketaanimi.com/
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 11/26/2015 - 05:43 नवीन
डॉक्टर साहेब आपला पर्याय ताबडतोब ध्यानात घेतलेला आहे ... तथापि अजूनही काही पर्यायांच्या प्रतीक्षेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/26/2015 - 05:51 नवीन
"सर्व जणच जर शेयर ट्रेडींग सारखी अनुत्पादक कामे करायला लागली तर कंपन्यांच्या शेयर्स चे भाव कसे वाढणार?" असा शेरा एका मोठ्या गुंतवणुक दारानी काही वर्षापूर्वी टीव्हीवर मारल्याचे आठवते. त्याचा संदर्भ हा होता की लोक ऑफिस मधे काम करायच्या ऐवजी मार्केट मधेच मग्न असतात. ( २००७-०८ च्या वेळी ) त्या गॄहीणीने शेयर बाजारात पैसा जरूर गुंतवावा, पण तो आधी स्वता मिळवावा. घरी राहुन करण्यासारखे सर्वात उत्तम काम म्हणजे शिकवण्या / क्लास घेणे. पण तेच त्यांना करायचे नाही मग काय करणार? त्यांचे वय बघता त्यांना कोणी ऑर्गनाईझ्ड सेक्टर मधे नोकरी देइल असे वाटत नाही. म्हणजे त्यांना जवळपासच्या छोट्या धंद्यात नोकरी मिळवायला लागेल. उदा - गॅस एजंसी, लायब्ररी, डॉक्टर / हॉस्पिटल रीसेप्शन, अकाऊंट्स वगैरे. अश्या ठीकाणी १० - ६ करीन वगैरे चालणार नाही आणि फार पगार पण मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अभ्या.. गुरुवार, 11/26/2015 - 07:31 नवीन
उदा - गॅस एजंसी, लायब्ररी, डॉक्टर / हॉस्पिटल रीसेप्शन, अकाऊंट्स वगैरे. अश्या ठीकाणी १० - ६ करीन वगैरे चालणार नाही आणि फार पगार पण मिळणार नाही.
हा मार्ग चांगलाय प्रसादभौंचा. अशा ठिकाणी कामाचे दडपण जास्त नसते. जराश्या घरगुती वातावरणात काम करता येते. बर्‍याच लहान कंपन्या किंवा ऑफिसेस ना पूर्ण वेळ अकाऊंटंट ठेवणे परवडत नाही. अशा जॉबमध्ये वेळेची लवचिकता पण मिळवता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/26/2015 - 05:38 नवीन
पैसा मिळवणे हे प्राधान्य नसले तरी सशुल्क वेळेचा सदुपयोग आणि बिझी राहणे हि गरज
उगा कोणाचे पोट मारू नका म्हणावं मग. एखाद्या सामाजीक संस्थेचे काम केलेत तरी उत्तम. किंवा सरळ आजूबाजूच्या वस्तीतल्या निरक्षरांना साक्षरतेचे धडे द्या. ते ही नको असेल तर मग त्यांना मिपावरती बोलवा. इथे बरेच रिकामटेकडे बयका-पुरुष आहेत. वेळ मजेत जाईल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 11/26/2015 - 05:49 नवीन
कृपया डीटेल्स द्याल का ?
सामाजीक संस्थेचे काम केलेत तरी उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/26/2015 - 06:17 नवीन
शहर / परिसर सांगा. पुण्यात असतील तर शहरात कुठेही जाऊन काम करायची तयारी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 11/26/2015 - 07:26 नवीन
मुंबई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पियुशा गुरुवार, 11/26/2015 - 06:25 नवीन
उगा कोणाचे पोट मारू नका म्हणावं मग. तिव्र असहमत , असे खुपसे लोक आहेत जे फुकटचा पगार घेतात काम त्या मानाने १० टक्के पण करत नाहीत असेही लोक्स पाहीलेत जे रिटायर्ड होन्ञाच्या मार्गावर आहेत हापिसात येवुन कसातरी ९ ते ५ वेळ धकुन न्यायची, अन्गावर आलेले काम ज्युनिअर्सना सोपवुन स्वतः झोपा काढायच्या , चुका झाल्या तर जबाबदारी अन्गवार घ्यायची नाही. चान्गल झाल की स्वताची xxxxx करुन घ्यायची , तरी पण अजुन त्याना जॉब सोडावसा वाट्त नाही कारण फू़कटात पैसा मिळतोय , ते का नाही घेत व्ही.आर.एस ? का नाही देत फ्रेशर्सना सन्धी ? प्रामाणि़क काम करन्यार्यापेक्षा उलट नाकर्त्यान्चीच भर जास्त आहे. एक तर आमच्याच dept. ला आहे जेवण झाल की डुलक्या घेत राहतात , एकदा दोन्दा गमतीत सान्गुन झालय सर घ्या व्हि आर एस ? एखादा फ्रेशर येइल त्याला सन्धी द्या, नुसत हसुन टाळूण देतात पण ( फु़कटच्या)पगारावर पाणी कोण सोडेल ना ? सरकारी बाबुन्चे तर विचारयलाच नको , त्यामुळे वरच्या ताइना प्रामाणि़कपणे काम करायची इच्छा असेल तर त्यानी जरुर करावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्रुजा गुरुवार, 11/26/2015 - 18:35 नवीन
सहमत. त्यांनी नोकरी नाही करायची ठरवली तर याचा काय भरवसा आहे की त्यांच्या जागी ती एखाद्या गरजुलाच मिळेल? त्यांना काम करायचंय त्यांनी करावं, गरजु जर होतकरु असतील तर त्यांना जॉब मिळेल च, त्यासाठी या ताईंनी परस्पर त्याग करायची गरज नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/26/2015 - 06:27 नवीन
उगा कोणाचे पोट मारू नका म्हणावं मग
पूर्ण असहमत. तुम्ही काम करा, पैसे मिळवा. ते खर्च करा, गुंतवा. आपोआप दुसर्‍या लोकांसाठी कामधंदा तयार कराल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 11/26/2015 - 07:53 नवीन
गा कोणाचे पोट मारू नका म्हणावं मग.
-१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
पिलीयन रायडर गुरुवार, 11/26/2015 - 09:15 नवीन
१. हाताला चव असेल तर चटण्या किंवा तत्सम पदार्थांचा बिझिनेस करता येईल. २. अभ्यासिका, दवाखाने , लायब्ररी - इथेही काम करता येईल पण ते १०-६ असेल असे वाटत नाही. ३. एखादी कला येत असेल, जसे की शिवणकाम, भरतकाम इ. तर आजकाल साड्यांच्या पर्सेस / पिलो कव्हर सेट इ करुन देण्याचा व्यवसाय अनेक जणी करतात. ते करता येईल. ४. पाळणाघरांमध्ये मावशांसोबतच टिचर्स / कोऑर्डिनेटर्स लागतात. ते ही करता येईल. स्वतःचे पाळणाघरच काढता येईल (पण ते हेक्टिक असु शकते) ५. तसाही पैसा प्राधान्य नाही तर सामाजिक संस्थांचे काम करता येईल जसे की गुरुकुल, चिंचवड येथे भटके पारधी समाजाची मुले रहातात. त्यांना चांगल्या शिक्षकांची गरज असते. असे एखादे केंद्र ठाण्यात असेल तर तिथेही काम करता येईल.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/26/2015 - 09:25 नवीन
सेल अॉन स्नॅपडील.. सॉरी.. अमेझॉन,फ्लिपकार्ट इ. ..हँडिक्राफ्ट, कपडे, चाईल्डकेयर सप्लाईज, चॉकलेट्स, सीजनल फळं- उदा-आंबे(?!कदाचित काही संस्थळांवर परवानगी नसेल), लाडू, चटण्या , पेंटिंग्ज, बॅग्ज इ.इ.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/26/2015 - 09:42 नवीन
१० ते ६ संपूर्ण मोकळा वेळ.....वॉव! स्वयंपाकघरात प्रयोग करावेत. टिव्हि पाहावा. (डिस्कव्हरी, डिस्कव्हरी ID, नॅशनल जॉग्राफी किंवा तत्सम), पुस्तके वाचावित, नविन छंद जोपासावा जसे, संस्कृत शिकणे, फोटोग्राफी, पेंटींग. किंवा संस्कार वर्ग घ्यावेत (शिकवण्या नाहीत), मुलांमधून सुजाण नागरीक घडवावेत, मुलांना सामाजिक जबाबदार्‍या शिकवाव्यात, संभाषण कला, शुद्ध शब्दोच्चार आवड आणि ज्ञान असेल तर मूलभूत अभिनय कला शिकवावी. आवड असेल तर प्राणी पाळणं हे सुद्धा वेळ घालविण्याचं, तणाव कमी करण्याचं साधन आहे. (कुत्रा बेस्ट).......... उरलेल्या वेळेत (उरलाच तर) मस्त ताणून द्यावी.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 11/26/2015 - 10:07 नवीन
पेठकर सायेबांशी पूर्णपणे सहमत. माझा एक मित्र जुन्या गाण्यांचा दर्दी जाणकार आहे. आता निवृत्ती नंतर तो त्या गाण्यांवर विविध कार्यक्रम सादर करतो. असे काहीतरी करता येईल. जास्त पैसा आला की जास्ती सुख, समाधान येतेच असे नाही . 'मोकळा वेळ' ही खरी कमाई. त्याचा सदुपयोग करावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 11/26/2015 - 10:42 नवीन
हे फार आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ज
जव्हेरगंज Fri, 11/27/2015 - 15:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
संदीप डांगे गुरुवार, 11/26/2015 - 09:45 नवीन
लोकेशन काय आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/26/2015 - 11:02 नवीन
हे ""BSC -physics with distinction हि शैक्षणिक अर्हता"" वाचल्यावर उत्तर सरळ आहे एखाद्या जवळच्या क्लासमध्ये मॅथ्स,सायन्स शिकवा.हेच कोणीही सांगेल. घरी शिकवण्या नका घेऊ. घराचं घरपण जातं आणि कधीकधी सोसायटीवाले तक्रार करतात. पण एक वर्ष क्लास ठीक आहे.मर्यादित जबाबदारी मर्यादित पेमेंट . व्यवसाय म्हणून टुअरिझम /बुकिंग चाचपणी करा.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 11/26/2015 - 14:13 नवीन
M.S.C. करता येईल असे वाटते .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/27/2015 - 16:09 नवीन
+१ हेच म्हणतो ! थेरॉटिकल फिजिक्स खुपच इन्टरेस्टींग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/26/2015 - 14:42 नवीन
उदा. पर्ल पेट्,टपर वेअर लहान बाळांचे कपडे विकणे ..फार चांगली मागणी आहे. काही महिन्यात दुकानसुद्धा काढता येईल. वारली पिशव्या व असेच ज्युट वगैरेच्या पिशव्या विकणे. घरगुती पदार्थ करुन विकणे पौरोहित्य करण्याची आवड असेल तर ज्ञानप्रबोधिनिला कार्यकर्ते हवे असतात. पण पहीले शिकायला लागेल. आजकाल मुलुंड ठाण्यात पण त्यांचे लोक येतात असे ऐकले. अजुन सुचले तर सांगेन
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 11/26/2015 - 19:46 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
P
palambar Fri, 11/27/2015 - 15:16 नवीन
वा चांगले सल्ले दिले आहेत. शेअर मार्केट चांगले आहे पण नीट कळ्ले पाहिजे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 11/27/2015 - 16:21 नवीन
थोडेफार तांत्रिक ज्ञान असेल किंवा शिकायची तयारी असेल तर खालील वेबसाईट उपयोगी आहे https://www.freelancer.com/job/ आपल्या स्कील सेट प्रमाणे, आपल्याला पाहिजे तसे प्रोजेक्ट्स घेत येतात. अगदी document writing, enter data in excel spreadsheet पासून ते software quality assurance, programming पर्यंत प्रोजेक्ट असतात. तासाप्रमाणे किंवा पूर्ण प्रोजेक्ट बेसिस वर पैसे मिळू शकतात. मुख्य म्हणजे घरी बसून तुमच्या सवडीनुसार तुम्ही काम करू शकता.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 11/27/2015 - 17:44 नवीन
या बाबतीत मी थोडा वेगळा दृष्टीकोण मांडू इच्छितो. माझ्या परिचयात अश्या काही स्त्रिया आहेत, ज्या सुरुवातीला गृहिणी होत्या. पैसे कमावण्याची खरोखर गरज नसता त्या काहीतरी व्यवसाय करू लागल्या. जास्त पैसा घरात येऊ लागला, पण त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोणात फरक पडू लागला. वेळेची, नात्यांची आणि प्रत्येक गोष्टीची पैश्यात किंमत करण्याची वृत्ती बळावू लागली, अनावश्यक वस्तूंची खरेदी वाढली, स्वभावातला सहज गोडवा ओसरला आणि एक हिशेबी धूर्तपणा चेहर्‍यावर दिसून येऊ लागला. आपल्यापेक्षा 'खालच्या' दर्जाच्या लोकांशी वागणूक बदलली, आणि ज्यांचेकडून आर्थिक लाभाची आशा वाटत होती, त्यांचेशी लाळघोटेपणाची वागणूक होऊ लागली. भौतिक श्रीमंती वाढली, पण मनुष्य म्हणून अधःपतन झाले. अर्थात असे सर्वांच्या बाबतीत घडते वा घडेल, असे नाही पण शक्यता मात्र असते. वर काहींनी सुचवल्याप्रमाणे निरपेक्ष भावनेने काही कार्य करणे हे जास्त श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा