Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आतातरी............

ए — एक एकटा एकटाच, गुरुवार, 11/26/2015 - 19:03
आयुष्याच्या क्षितीजावर दूर गेलेल्या आठवणीचं आभाळ मनात दाटतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं आठवतयं तुला................ दररोज सांजवेळी खिडकीत उभी राहुन माझी वाट बघायचीच तु, परतण्यास अमळंसा उशीर झाला तरी खोटं खोटं रुसायचीच तु, मात्र आता माझ्यासोबत हे खुळावलेलं घरटंही तुझीच वाट बघतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं माहितीय मला.............. तुझ्या एका आठवणीवर सवडीने मुक्त बरसायचा तो, घेउनी कवेत तुला अंगाअंगावर धुंद निथळायचा तो, आज आता तुझ्यासोबत पुन्हा अगदी तसचं भिजावस वाटतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं................. उमगत नाही........... गेले कित्येक वसंत दारातला गुलमोहर आता ठरवून ही बहरत नाही तुझ्या स्पर्शास पारखा पारिजात प्रितीचा सडा अंगणी शिंपडीत नाही समोरच्या ढोलीतलं राघूच जोडप मात्र आपलं उगीचच हळहळतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं................... समजावतो मी..................... मनास माझ्या आता नाही येणे तुझे उभे आयुष्य सरले जरी, नाही कळणार तुला माझी घुसमट माझा श्वास विरला तरी, निराशेनं उचललेले हरएक पाउल, एका वेड्या आशेवर मागं हटतयं, "आतातरी परत ये खरं सांगतो" तुझ्याशिवाय फार एकट एकट वाटतयं....................

प्रतिक्रिया द्या
2339 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अभ्या.. गुरुवार, 11/26/2015 - 19:15 नवीन
लैच ब्येक्कार लिव्हतुयास मर्दा. च्यायला. असलं आम्हाला कधीच जमणार नाही. . लिहित राहा रे. भारी आहे सगळं.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज गुरुवार, 11/26/2015 - 19:22 नवीन
तेच म्हंतोय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 16:53 नवीन
तुमची "वायला" अजुनही डोक्यात पिंगा घालतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बाबा योगिराज गुरुवार, 11/26/2015 - 19:21 नवीन
लै म्हणजे लगे लैच भेष्ट....
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 11/27/2015 - 11:12 नवीन
केवळ अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/27/2015 - 11:23 नवीन
जमली आहे.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 11/27/2015 - 13:45 नवीन
काय तल्खी आहे!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 16:46 नवीन
तल्खी नविन शब्द सुचवल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
प
पालीचा खंडोबा १ Sat, 11/28/2015 - 07:32 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 11/28/2015 - 08:18 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 11/28/2015 - 08:25 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 11/28/2015 - 10:03 नवीन
उदास .. :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 11/28/2015 - 10:03 नवीन
आर्तता सहीसही उतरलीये अगदी.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 16:45 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/28/2015 - 16:47 नवीन
वाईट आहे!!! या लेखनातील विरहाची भावना!!! खतरा ताकदीनं लिहिलंय!!! आवडलं!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा