Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

च — चांदणे संदीप, Fri, 11/27/2015 - 13:52
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'अकु-मोजी' नामक (कथेची) वाट कशी लावावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाटी प्रतिक्रियेचा मान ठेवून पुढचा भाग लवकर न टाकल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्याच्याही लायकीचा समजला जाणार नाही! ३. स्वत:च्या लेखनाशिवाय दुसर्या कुणाच्या लेखनावर प्रतिसाद न टाकल्यावर आपण हावरे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये. इथे खरडफ़ळा, खरडवही सजावट म्हणून ठेवलेली नाहीये! ५. रिकामे सल्ले देऊ नये, मिसळपावावरची पोरं तुम्हाला टेम्पोत बसवायला फ़ाट्यापर्यंत येतील हे ठाऊक असू द्या. ६. "अय्या किती छान लिहिलेय मी!" असे समजून आपल्या लिखाणावर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करु नये, आमच्याइथे नुसत्या आयडीने समोरच्याला थंडगार करण्याची ख्याती असणारे आयडी आहेत! ७. ही कथा आधी कुठेतरी प्रसिद्ध झाली आहे म्हणून इथेही डकवायचा प्रयत्न करु नये. आमच्या इथे नुकतेच रुची आणि दिवाळी अंक प्रसिद्ध झाली आहेत! ८. नसत्या चुका करू नयेत. चुकीला माफी नाही! ९. "(इथे)लिहिले हेही थोडे नव्हते हो!" म्हणून हिणवू नये. आम्ही मग नेहमी दोन (प्रतिक्रिया) जास्त'च' देतो. १०. आता आपल्या थोड्याचा अनुभव आम्हांस कसा माहित हे विचारू नये. असल्या क्षुल्लक प्रश्नांची उत्तरे आमचा 'आयर्न मॅन' नामक रोबोगडीही हल्ली देत नाही! ११. आपण आठवड्यातून फक्त एकच भाग टाकला तर तर हे समस्त वाचकांवर परोपकार होतील याची आम्हांस जाणीव आहे. आणखी पथ्ये कशाला?

प्रतिक्रिया द्या
8710 वाचन

💬 प्रतिसाद (16)
च
चांदणे संदीप Fri, 11/27/2015 - 13:59 नवीन
ह्या गल्ली चुकलेल्या लेखाला बरोबर जागेत नेऊन ठेवील काय कोण?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 11/27/2015 - 15:44 नवीन
८. नसत्या चुका करू नयेत. चुकीला माफी नाही! ╰_╯
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
व
वडाप Fri, 11/27/2015 - 15:36 नवीन
निऊ की.आपला धंधाच हाइ त्यो.फकस्त गावाभाइर रातच्या टैमामला रिटन भाडं बसतंया.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/27/2015 - 15:47 नवीन
खिक! रोचक! :D
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 11/27/2015 - 15:57 नवीन
मस्त लिवलय!
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 11/27/2015 - 16:08 नवीन
अय्या कित्ती छान लिहिलंय ;)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 11/27/2015 - 16:35 नवीन
विडंबनाला आवश्यक असे "कोडाई कनाल" आणि "गरम पाण्याचे कुंड" हे सिलेक्ट न केल्याने हा फाऊल धरणेत येत आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/28/2015 - 11:36 नवीन
आणि भूछत्र सुध्धा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
रातराणी Sat, 11/28/2015 - 08:22 नवीन
बरं बरं. तुम्ही ओरिजिनल पुणेकर नाही वाटतं. खरा पुणेकर एवढे नियम वाचायचेसुद्धा कष्ट घेणार नाही तुम्ही तर लिहीत बसलात! ;)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 11/28/2015 - 13:07 नवीन
पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sat, 11/28/2015 - 16:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
महासंग्राम Sat, 11/28/2015 - 08:29 नवीन
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 11/28/2015 - 12:30 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 11/28/2015 - 13:07 नवीन
आमच्याइथे नुसत्या आयडीने समोरच्याला थंडगार करण्याची ख्याती असणारे आयडी आहेत!
हॅहॅहॅहॅ !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 11/30/2015 - 07:37 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
प
पीके Mon, 11/30/2015 - 08:38 नवीन
पु. भा. ल. टा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा