Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिकार (गझल)

श — शार्दुल_हातोळकर, Sat, 11/28/2015 - 08:28
ना कुठला पापी होतो ना व्यसनी टुकार होतो नियतीच्या खेळामध्ये मी दुबळी शिकार होतो दुःखात माखला जन्म त्या जखमा पदोपदीच्या अनिवार यातना ज्यांचा मी मुकाच हुंकार होतो सन्मार्ग चाललो तरीही हे दारात उभे दुर्भाग्य नजरेत जणु दैवाच्या मी अगदी भिकार होतो त्या बेफाम सागरामध्ये मी क्षुद्र जणु नावाडी प्रलयास द्यावया झुंज मी कुठे चमत्कार होतो अविरत जरीही लढलो सुखशिल्प नवे कोराया परि स्वर्ग निर्मिण्या येथे मी खुजा शिल्पकार होतो ही गुढ भासली दुनिया स्वार्थाच्या जंजाळातील पण गुढ उकलण्याजोगा मी कुठे जाणकार होतो हे अंगण फितुर झाले त्या स्वप्नांच्या पर्णकुटीचे अन् इतका असुन द्रोह मी कसा निर्विकार होतो त्या फसव्या ललाटरेषा नि फसवेच पाप-पुण्य नशिबाच्या वाटेवरचा मी भटका चुकार होतो स्वप्नांत अडकला जीव परि राख जाहली त्यांची स्वप्नांस रक्षिण्या तेव्हा मी थिटा प्रतिकार होतो -शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
5586 वाचन

💬 प्रतिसाद (16)
र
रातराणी Sat, 11/28/2015 - 08:32 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 11/28/2015 - 09:27 नवीन
भारतीय तत्त्वज्ञानातील मिथ्यावाद, कर्मयोग तसेच बौद्ध आणि इतर तत्त्वज्ञाने या चिरंतन मानवी दु:खावर फुंकर घालण्याचा अल्पसा आणि अंशतः प्रयत्न करत असतात का असे कधी कधी वाटते, आपली गझल पोचली आणि आवडलीही.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 11/28/2015 - 10:48 नवीन
छानच आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 11/28/2015 - 13:55 नवीन
मी पहिल्यांदाच मिसळपाव वर गझल प्रकाशित केली आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 16:57 नवीन
वाह!!!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/28/2015 - 19:19 नवीन
अ प्र ति म!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 11/29/2015 - 07:42 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 12/01/2015 - 10:48 नवीन
आवडली ..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 12/01/2015 - 12:07 नवीन
कपटाचे टाकत फासे, जेंव्हा नियती अवतरते बदलती सूर शब्दांचे, ध चा मग मकार होतो ग़ज़ल आवडेश ! मस्त आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/01/2015 - 12:10 नवीन
वाचक नाखु
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/01/2015 - 17:22 नवीन
दिल खुश झाला !!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/02/2015 - 03:51 नवीन
वृत्त कुठले आहे बादवे? मात्रावृत्तातली आहे का ?
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/05/2015 - 17:09 नवीन
विशालजी, माफ करा पण मला मराठी व्याकरणाचे फारसे ज्ञान नाही आणि मी व्याकरणाच्या फंदात फारसा पडतही नाही. व्याकरणात अडकुन भाषेचे सौंदर्य आणि भाषेचा आनंद हरवतो असे माझे वैयक्तिक मत आहे. इतर जाणकार मंडळी याबद्दल नक्कीच सांगु शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ज
जव्हेरगंज Sun, 12/06/2015 - 05:37 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मितान Sun, 12/06/2015 - 05:39 नवीन
चांगली कविता :)
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 12/06/2015 - 15:10 नवीन
धन्यवाद मंडळी !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा