Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

म — माहितगार, Sat, 11/28/2015 - 12:54
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहीले आठवणि तुझ्याच त्या त्यांच्या न राहील्या पोकळ आसमंत मागे राहीले, ना सखे ना सोबती जायचे इथे तिथे, कुठे कुठे कोरड्या कल्पना मिथकात मिथक होऊनी फुकाच्या वल्गना व्यर्थवेळ मोक्षाचे भोक मोजतो कुठे ? आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला

प्रतिक्रिया द्या
4297 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ज
जव्हेरगंज Sat, 11/28/2015 - 13:53 नवीन
डायरेक चार कविता! _/\_
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/28/2015 - 13:55 नवीन
क्लासच!
  • Log in or register to post comments
म
मोगा Sat, 11/28/2015 - 15:59 नवीन
मला वाटले नथुरामावर कविता लिहिली की काय !
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 18:22 नवीन
ढिशक्याव..... Bull's eye
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 11/28/2015 - 18:58 नवीन
अर्थासहित व्यवस्थित.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 11/28/2015 - 19:10 नवीन
श्या : काहीही यमके जुळवली आहेत , अज्जिबात अवडली नाहि कविता ! आपण आमच्या बुवांकडुन एकदा यमकनारायण पुजा घालुन घ्या साग्र संगीत ... कृपा आनि शुरु हि जायेगी =))))
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 11/28/2015 - 21:15 नवीन
:-) छाण आहे हो काव्य! आवडेश.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/29/2015 - 04:32 नवीन
मस्तच आहे , आवडली पैजाराबुवा,
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 11/29/2015 - 04:54 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 11/30/2015 - 10:11 नवीन
हा हा हा, एकच नंबर =)) जरा यमकात मार खाल्ली, पण बाकी उत्तम आहे. तदुपरि- वृत्ताधिकारमुक्त चर्चेत या काव्यकूटाचा उल्लेख करण्याबद्दल इथे विनंती करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा