Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धुक्यात हरपले कुंचले

प — पालीचा खंडोबा १, Tue, 12/01/2015 - 11:30
खारीचं शेपूट अलगद फिरावं तसा तो कुंचला फिरवायचा दरीत कोसळल्या संध्येचे रंग चोरून कागदावर उतरवायचा त्यात थोडसं धुकं भरून. मी मात्र अनामिष डोळ्यांनी न्याहाळायचो फिरत्या रंगांचे गूढ अन त्याच्या ,ओठात , बोटात अडकलेला कुंचला. मनाला आर्त साद घालणारी त्याची ती रंगसंगती बेभान करायची डोळ्यातल्या आसवांची कासवे डोळ्यातच मरायची, मात्र एक अनामिक हूरहूर आसमंत भारून टाकायची. विलक्षण सहवासाचा साहसवीर मृगयेवर गारुड घालतो अन नकळत सुटला तीर हृदयाचा वेध घेतो अश्या अवस्थेत सारी रात्र सरायची, कधीतरी पहाटे साचल्या दवांची टपटप डोळ्यांना कुरवाळायची, मूर्तीमंत समाधानात झोपलेला तो अन त्याचे पूर्णत्वास येणारे चित्र जीवघेणी साद घालायचे. ग्रेपवाईनमधल्या तिस-या पेगला तो म्हणाला होता मी सात आकाशापलीकडले चित्र मांडतो, इथे रंगबिरंगी पाखरे बागडतात सुवासात नटली फुले उमलतात मग सा-या विश्वाची बासरी त्याच्या मुखातून वाजायची, डोंगरावरची माती धुके पांघरून निजायची. चित्र पूर्ण झाल्यावर तो लहान मुलाच्या हाती सप्तरंगी फुलपाखरू गवसावं तसा नाचला होता त्या आनंदकारंज्याचा स्पर्श मलाही जाणवला होता, कधीतरी प्राचीन नशेत पांघरून सोडून शरीर कुडकुडत असताना त्याने मारलेली उबदार मिठी ----- तीच भावना सतार व्हायची. ती घातवेळ अजूनही आठवते त्याच्याबरोबर सुर्यास्तापर्यंत चालण्याची, अचानक गलोलीतून सुटलेल्या गोट्यातून रक्तबंबाळ झालेला परवा समोर पडला अन नको त्या वेळी माझ्या डोळ्यात घृणा दाटली सारेच करुण डोळ्यांनी त्याने पाहिले . . दुखाची अगतिकता अन घृणा . . . तेव्हाच त्याने धुक्यात प्रवेश केला. आता तोही आठवत नाही पण तडफडणारा पारवा अजूनही मनात तडफडतो आहे तेव्हा मात्र त्याच्या कारुण्याची अन माझ्या दाटल्या घृणेची सारी समीकरणे कोसळून पडतात... . . . . . तरीही मी त्याच्या शोधात धुक्यात दडल्या वाटा शोधत आहे ....... विजयकुमार......... २६ / १२ / २०१०, मुंबई

प्रतिक्रिया द्या
1724 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अभ्या.. Tue, 12/01/2015 - 12:22 नवीन
दम हाय भाऊ लेखणीत. पात्रे अन परिस्थिती पण परिचयातलीच. लिहित राव्हा.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 12/01/2015 - 13:28 नवीन
:) कुंचला...रंग...चित्र कनेक्टिंग पीपल..! भारीच.....आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/02/2015 - 03:55 नवीन
दम हाय भाऊ लेखणीत.
ह्येच आल्तं मणात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/01/2015 - 12:24 नवीन
जबरदस्त ! प्रचंड ताकत आहे तुमच्या लेखणीत ! कविता आवडली , प्रश्नच नाही !!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 12/01/2015 - 14:34 नवीन
भारी वाटली ही पण!!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 12/01/2015 - 23:30 नवीन
नीटशी कळली नाही खरं सांगायचं तर पण काहीतरी भारी आहे असं वाटलं वाचून. माझी समज कमी पडतीये म्हणा ना. तुमच्या कविता जबरदस्त असतात पण. लिहीत रहा. आवडलीये तुमची शैली.
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 12/02/2015 - 03:39 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/02/2015 - 03:42 नवीन
आता तोही आठवत नाही पण तडफडणारा पारवा अजूनही मनात तडफडतो आहे तेव्हा मात्र त्याच्या कारुण्याची अन माझ्या दाटल्या घृणेची सारी समीकरणे कोसळून पडतात... हे विलक्षण जीवघेणं आहे. ख़ास आहे. आवडलंच
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 12/03/2015 - 14:47 नवीन
आकलनाच्या धुसर रेषांवर रेंगाळणारी कविता. अनेक अर्थ लावता येतात, किवा नुसतेच चित्र रंगवता येते. सुंदर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा