Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रेमाची गोष्ट

व — विश्वव्यापी, Tue, 12/01/2015 - 12:17
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा, झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा. आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला , परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला. प्रेमाचा अंकुर बहरला ,बहरून शुभमंगल झाला , आठवतो मज अजून सारखा , मिलनाचा तो क्षण पहिला . प्रेमाचा हा तरु मोहरला ,आल्या त्याला नव्या पालव्या , आठवतो अजून दिवस तो मजला , दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला . सुखी आपला संसार चांगला , नजर लागली , कसा बिघडला ? गेलीस ग तू सोडूनी अर्धा , सुंदर आपला डाव मांडला . तरीही हा चिमणा एकला , पांखारांसाठी जगाला श्रमाला, उडूनी गेली पांखरे आतां ,चिमणा राहिला ग एकला ! विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा, झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.

प्रतिक्रिया द्या
2014 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पैसा Tue, 12/01/2015 - 14:35 नवीन
जरा वृत्तात बसवून बघा बरं.
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Tue, 12/01/2015 - 15:45 नवीन
प्रयत्न करून पहातो. पण माझे शिक्षण इंग्रजी मध्ये झाले असल्या कारणाने मला थोडे मार्गदर्शन करा. तुम्हाला कविता बरी वाटली हे वाचून आनंद झाला. प्रतिसादा बद्दल आभारी आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 12/02/2015 - 05:51 नवीन
अक्षर गणवृत्तांचा अभ्यास आधी करावा लागेल. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4 त्यानंतर http://www.maayboli.com/node/21889 https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%80 हे काही वाचून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वव्यापी
व
विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 15:09 नवीन
आपल्या टीप बद्दल धन्यवाद . कठीण वाटतंय पण प्रयत्न करणार आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अभ्या.. Tue, 12/01/2015 - 16:46 नवीन
स्टोरी बोल्ड झालीय
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 04:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दमामि Wed, 12/02/2015 - 08:14 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 15:16 नवीन
स्टोरी बोल्ड झालीय
कविता मला नेहमी बोल्ड करायला आवडतात ! काय आहे , वाचायला सोप्या पडतात ना मंग .बोल्ड मंदी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 12/02/2015 - 15:37 नवीन
सारखे सारखे असे केले की क्लीन बोल्ड व्हाल हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वव्यापी
व
विश्वव्यापी गुरुवार, 12/03/2015 - 11:29 नवीन
आता कसले क्लीन बोल्ड होणार आम्ही ! इस वर्षापुवीच झालो की . आता फक्त कॉमेंट्री करतो आम्ही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 11:52 नवीन
वेल प्लेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वव्यापी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा