Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरे या ना रे

ज — जव्हेरगंज, Tue, 12/01/2015 - 17:54
अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ना सांज ना सकाळ, सगळा अंधारच अंधार आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा ना अंधरुन ना रजाई ना उतरण ना चढाई आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे जळतच गेली जळत जळत गेली दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी नाही विझली नाही विझली हवेनेही नाही विझली ही जिंदगी एक फुंकर मारली सगळा धूर ऊडून गेला तो श्वास होता, एक ध्यास होता जो घेऊन गेला, सत्यानाश होता मायेच्या काळजाचा एक नाद होता अरे या ना रे ============================ सौजन्य: https://m.youtube.com/watch?v=tugB6k0KHlE&itct=CBoQpDAYACITCJHt0q6Mu8kCFVa-vgod0NMHnjIHcmVsYXRlZEjNkuuQ_8fIhgU%3D&gl=IN&client=mv-google&hl=en

प्रतिक्रिया द्या
2923 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 18:35 नवीन
आओ ना के जां गई जहां गया सो जाओ आओ ना के थक गई है जिंदगी सो जाओ न शाम न सवेरा अंधेरा ही अंधेरा है रुहों का बसेरा सो जाओ (गाणं पूर्ण पाठ आहे, आत्ता मोबाइलवर आहे म्हणून नाहीतर पूर्ण टाईप केलं असतं, हे आपलं फेव्हरेट आहे बॉस )
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 12/01/2015 - 18:52 नवीन
सिनेमात हे गाणं म्हणजे परमोच्च बिंदू आहे. हे गाणं जेव्हा सुरु झालं तेव्हा डोळे विस्फारुन नुसता बघतच राहिलेलो. अफाट ! चित्रपट ही तुफान होता!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Tue, 12/01/2015 - 19:33 नवीन
गाण्याच्या सुरुवातीला कुदळीचा आवाज आहे - अंगावर काटा येतो ते ऐकतांना बघतांना.. हे गाणं जेवढं संथ तेवढंच याचं रॉक व्हर्जन दंगा, त्यातील गिटार, बीट्स अफलातून !! इरफानच्या एंट्रीला असलेलं दमदार म्युझिक, गुलों मेँ रंग भरे, बिस्मिल, जेहलम.. एकसे एक गाणी.. तब्बू केके शाहिद, त्याच्या वडिलांच कॅरेक्टर, डबल सलमान सगळ्यांचं काम अप्रतिम. चित्रपटाची सिनेमैटोग्राफी सुपर्ब. ते बर्फाळ बैकग्राउंड ज्यामुळे पूर्ण चित्रपटभर एक गूढ उदासी भरून राहते. शेवटची फायटिंग तर बेकार.. सिनेमा संपल्यावर डोकं सुन्न होतं.. पूर्ण बधीर. सिनेमा अफाट अचाट होता, सलाम विशाल भारद्वाज..
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 12/03/2015 - 10:49 नवीन
जळत आहे, जळत आहे दिव्यासारखी ही जिंदगानी नाही विझत, विझत नाही हवेने विझत नाही ही जिंदगानी एका फुंकरीने ते झाले सगळा धूर झाला, उडून गेला तो जो श्वासांचा एक फास होता, निघून गेली जी टोचण होती, उरातली ती वेदना गेली बेचैनी गेली, आजार गेले आता तरी ये, माझ्या प्रिया, झोप ना रे हवा होते हवेत विरले राहिले ते रितेपण एक कधी होते कधी नाही राहिला मालक तो एक जे होते आरंभापासून होते सारे त्याच्या कृपेने होते जगी जे मोठे काम होते कपाळी लिहून ठेवले होते जे होऊन गेले जे घडून गेले निष्कारण इथे राहणे नको आता, चल ना रे थोडा धीर धर, एक थडगं निवड, घरी ये रे अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ** हिंदी/उर्दू चे मराठी रूपांतर करतांना तंतोतंत शब्द मिळणं फार कठिण, अर्थ बरेच बदलतात, उर्दू डिक्शनरी समोर ठेऊन केलं पण अवघड काम आहे हे. __/\__ गुलझार साहेब * धागा हायजॅक केल्याबद्दल क्षमस्व :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 12/03/2015 - 11:31 नवीन
अरे आओ ना.. ची गोष्टच वेगळी!! हैदर मध्ये हे गाणं अप्रतिम वाटतं..! त्यात जे "के" जान गई.. मध्ये जो "के" वापरला आहे तो मराठीत नुसता "की" वापरुन आणता येईल का ते माहित नाही.. अगदी शब्दशः अनुवाद केलाच पाहिजे असं नाहीये ना.. गुलझार साहेबांच्या कवितेला हात लावणं तसंही फार फार अवघड काम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 10:42 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा