स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियान
आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदि यांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियान प्रकल्पासाठी निधी जमा करण्याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने ०.५ % tax १५ नोव्हेंबर पासून लागू केला. हे जमा होणारे उत्पन्न स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याच्या जाहिरातीसाठी खर्च होणार आहेत.
आपल्या संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्व असताना सुद्धा आपल्या देशात त्याच महत्व न पटल्यामुळे कित्येक शहरे बकाल आणि गल्लीच्छ झालेली आहेत. पुणे,मुंबई सारख्या झपाटयाने वाढणाऱ्या शहराच्या आजुबाजुच्या भागातील आणि गावातील परिस्थिती पाहिली तर या अभियानाचे महत्व लक्षात येते. याचा परिणाम दिसायला वेळ लागेल पण खरच खूप चांगली सुरुवात या निम्मिताने झाली आहे.
आपल्या आजूबाजूला भरपूर घांन पडलेली असते, ती घाण करण्याला आपणच जबाबदार असतो परंतु पद्धतशीरप्रमाणे आपण ती जबाबदारी शासन व्यवस्थेवर ढकलून मोकळे होतो. शासन जर काही निर्णय घेत असेल तर प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होण कर्तव्य आहे.
परंतु आपल्या इथ या निर्णयामुळेसुद्धा काही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे कि हे शासन फक्त tax वाढवत आहे कि काय ?
जे लोक मौल मध्ये जाऊन ३००० /- रुपयांचा शर्ट खरेदी करतात, ५०० रुपयांचा पिझ्झा खातात, २०० रुपये चित्रपटाच्या तिकिटावर खर्च करतात असे लोक पण या निर्णयावरून नाराज वाटतात.
१०० रुपयांना ५० पैसे ते पण फक्त सेवा क्षेत्राच्या बाबतीत असताना विरोधी पक्ष याला वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच ठरवतात.
तुम्हाला काय वाटत ?????
💬 प्रतिसाद