Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द

व — विश्वव्यापी, Wed, 12/02/2015 - 14:52
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची ! शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द

प्रतिक्रिया द्या
3592 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/02/2015 - 15:01 नवीन
फारच 'शब्दाळ'झालीय हो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, दादा !
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 15:04 नवीन
शब्दांनी शब्द रेखा शब्दांच्या , शब्दांनीच शब्द उणे शब्दांना शब्दांनीच शब्दांची शब्द भरारी ,शब्दांनीच शब्दांची किंमत शब्दांना
शब्दबंबाळ शब्दबंबाळ शब्दबंबाळ :-)
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 12/02/2015 - 15:56 नवीन
आलो आलो आलो! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वव्यापी
ज
जातवेद गुरुवार, 12/03/2015 - 09:28 नवीन
=) =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
च
चांदणे संदीप Wed, 12/02/2015 - 15:19 नवीन
शब्दांना वाहिलेली की शब्दात वाहून गेलेली कविता? :-/ यावरून एक चारोळी आठवली: येते तिची आठवण केली आठवणींची साठवण साठवूनी आठवण केली तिची पाठवण! (ही माझीच आहे - दहावीनंतर कॉलेजच्या सुरुवातीला केलेली! टीप: यवारून माझ्या तत्कालीन स्थितीविषयी उगीच कसलाही अर्थ लावीत बसू नये!) ;-) Sandy
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Wed, 12/02/2015 - 15:54 नवीन
शब्दांचे महत्व सांगणारी कविता ! तुम्ही शब्दांचे अर्थ घट्ट पकडले तर वाहून जाणार नाही . :-) बाकी प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . लोभ असावा . चूभूद्याघ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
जव्हेरगंज Wed, 12/02/2015 - 16:31 नवीन
शब्दन शब्द वाचला आणि शब्दन शब्द आवडला! आवडलीच!!
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी गुरुवार, 12/03/2015 - 07:39 नवीन
धन्यवाद सरजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जातवेद गुरुवार, 12/03/2015 - 09:29 नवीन
निशब्द करून जाणारी कविता!
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी गुरुवार, 12/03/2015 - 10:57 नवीन
धन्यवाद :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 10:44 नवीन
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची ! शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी गुरुवार, 12/24/2015 - 11:37 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभारी आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/24/2015 - 15:54 नवीन
चांगली आहे नवीन काहीतरी वाचायला मजा आली. लिहित रहा पुढिल लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 12/25/2015 - 05:07 नवीन
चांगली आहे! शब्दांची शाळा!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/25/2015 - 07:43 नवीन
ही कविता वाचायच्या आधीच दुसर्‍या लेखावर प्रतिसाद दिला होता! =))
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Fri, 12/25/2015 - 08:22 नवीन
पैसा जी, होतं अस माझे सुद्धा कधी कधी. :-) Thanks Vishvavyapi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/26/2015 - 14:50 नवीन
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना हे खुप आवडलं. -दिलीप बिरुटे (शब्दांच्या टोप्या विकणारा)
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Sun, 12/27/2015 - 08:15 नवीन
बिरूटे साहेब, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खुप आभारी आहे. आपणांस कविता बरी वाटली हे पाहून आनंद झाला. Thank you विश्वव्यापी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मयुरMK Sat, 12/26/2015 - 15:19 नवीन
जे शब्दात सांगता येत, त्यात सांगण्यासारख काही नसतच ! ह्या ओळी आठवल्या कुठेतरी वाचल्या होत्या मी
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Sun, 12/27/2015 - 08:10 नवीन
काही गोष्टी शब्दांच्या पलिकडे अस्तातही पण त्याही शब्दांनिच व्यक्त कराव्या लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा