Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा

प — पालीचा खंडोबा १, Fri, 12/04/2015 - 06:42
- 1 - आलास समोर | चढले खूळ | नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले | तुटले टाके | उसवले बंध | विलग होवुनी | वस्त्र फडफडले | मनात गाणी | दाटती सूर | रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा | राणीचे उसासे | रखेलीचा टाहो | निपुत्रिक राजा | चढे सरणावरी | बाटला देह | विटाळ घेवुनी | धर्माची स्थापना | कुणी करावी ? विजयकुमार......... ०७ . ०२ . २०१०, मुंबई - २ - भरल्या स्तनात | दुधाच्या गाठी | मृत गर्भाचे | काळे ओठ | भुकेल्या देहात | गर्भाची पेरणी | ठिणग्या उडवती | विझल्या चुली | ओल्या शरीरास | गर्भाची शिक्षा | कुलवंतीनीचा जार | चांडाळ ठरला | सुटता हात | तीन्हीसांजी धूळ | उष्ण शरीरास | संध्या जाळी | हुंगून वासनेस | फुल जळाले | उजवीत माड्या | पुरुष परागंदा | विजयकुमार......... ०७.०२.२०१०, मुंबई -३- डोहाचे फुगवटे | संथ नदीत | अतृप्त आत्मे | पाण्यात तरंगती | प्राशुनी वारुणी | नजरचोरटे भय | पडक्या वाड्यात | भुते चेकाळाती | बाभळीची फुले | झुलती काटे | पाशवी वासना | अंगभर दाटलेली | मायेच्या संगास | गर्भाची आण | उसळले तारुण्य | बाप देशोधडी | लावता कवाड | अंधारव्यापी पणती | फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली | विजयकुमार......... ०७.०२.२०१०, मुंबई -४- खोंडाच्या जत्रेत | एकाकी गाय | फोडती हंबरडे | पान्हा सुटलेले | पेटत्या वणव्यात | भिजते जंगल | मनाविरुध्द घडला | असंगाशी संग | टाळता नजर | उठतो विखार | फिरती रानोमाळ | विषग्रंथीविना सर्प | वाटतात सारे | कैफभिजले काटे | बृहन्नडेच्या पायी | घुंगरू रुतलेले | ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर | फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी | विजयकुमार......... ०७ . ०२ . २०१०, मुंबई -५- केसाळ नागाचा | मणी विझला | सुहासिन सांगते | बिळे लिपा | घोडेस्वार राजा | आडावारती ओलेत्या | पौगंडावस्थेतील पोरांच्या | संभोग कथा | पांघरूणातील उसासे | निजभरली पहाट | ओलेत्या अंगाचा | खडखडतो रहाट | ऋतू पाळून | श्रावण मोहरतो | उध्वस्थ घराचा | कोसळतो मांडव | मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे | मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे | विजयकुमार......... ०७. ०२. २०१०, मुंबई

प्रतिक्रिया द्या
23934 वाचन

💬 प्रतिसाद (92)
अ
अभ्या.. Fri, 12/04/2015 - 06:44 नवीन
हायला. सुरु पण झाला का कोनाडा? न मागता मेंबरशिप पण मिळाली आम्हाला. कचकून निशेध प्रा. डॉ. सरांचा.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 06:48 नवीन
आभ्या काय झाले हे ह्या पामरास कळेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सस्नेह Fri, 12/04/2015 - 07:44 नवीन
कोनाडा नव्हे, तळघर आहे... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दमामि Fri, 12/04/2015 - 08:13 नवीन
"निशेध" होय? म्या काय भलतंच वाचलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 06:56 नवीन
निषेध काय कोनाडा काय तळघर काय ? आकलनाच्या पलीकडले त्या पेक्षा माझ्या कविता परवडल्या
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 12/04/2015 - 07:09 नवीन
कळल्यासारखं वाटतं आहे. आणि आवडलंही आहे. सविस्तर रसग्रहण केलंत तर आभारी असेन.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 07:37 नवीन
ह्यातून काय अभिप्रेत आहे ते कळू दे मग मी सविस्तर विवेचन करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
द
दमामि Fri, 12/04/2015 - 08:24 नवीन
आदूबाळशी सहमत. तुमच्या सर्वच कविता अतिशय प्रतिभाशाली आहेत, त्यातील रुपके अतर्क्य आणि विलक्षण लक्षवेधी आहेत, पण प्रत्येक वेळी आपल्याला संपूर्ण समजले का अशी शंका येते. प्रत्येक वाचकाला वेगळा अर्थ लागू शकतो पण प्रत्यक्ष कवीला काय म्हणायचे आहे याबद्दल उत्सुकता असते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 08:27 नवीन
मित्रानो जे तुम्ह्स उमगले ते सांगा मग मी आहेच ना इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
आ
आदूबाळ Fri, 12/04/2015 - 12:29 नवीन
खवचटपणा करत नव्हतो. गैरसमज नसावा. दमामिप्रमाणेच मलाही वाटतं. आणि हे तुमच्याच बाबतीत असं नाही, पण सगळ्याच कवितांच्या बाबतीत कमीअधिक प्रमाणात वाटतं. ऐसपैस कथा-कादंबरी असली की कसं, लेखकाला त्यातून काय सांगायचं आहे हे समजायला मला वाचक म्हणून अवसर मिळतो. पण कवितेचं तसं नसतं. एक ललित-कृती-योग्य भावना असते, आणि कविता हे त्याचं फक्त पाण्याबाहेर दिसणारं टोक. ती आख्खी भावना बर्‍याचदा हिमखंडासारखी आतच राहते. मला तरी ती पटकन समजतेच असं नाही. स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत बोलायचं तर कवितेच्या बाबतीत टाईप १ एरर आणि टाईप २ एरर दोन्हींची शक्यता आहे. उदा० "चाफा बोलेना"ला गहन अध्यात्मिक अर्थ आहे हे मला नुकतंच समजलं. इतके दिवस मला ते निसर्गगीत वाटत होतं. ;) (हा टाईप २ एरर - failing to assert what is present). याउलट कशावरून तरी डोकं सनकलं म्हणून मी एकाला "गोली मार भेजे में" ही सद्गुरूची आवश्यकता सांगणारी कविता आहे हे अर्थासह पटवून दिलं. (टाईप १ एरर - asserting something that is absent). त्यामुळे जी कविता आवडते पण समजली असं वाटत नाही तिथे मी हे न लाजता विचारतो. परत - गैरसमज करून घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
च
चांदणे संदीप Fri, 12/04/2015 - 13:11 नवीन
म्हणून मी एकाला "गोली मार भेजे में" ही सद्गुरूची आवश्यकता सांगणारी कविता आहे हे अर्थासह पटवून दिलं.
सर, मला पण सांगणार का? आवडेल तुमच्याकडून ऐकायला! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 12/04/2015 - 13:55 नवीन
गोली मार भेजे में... इथे "भेजा" हे अज्ञानाचं, विषयांचं प्रतीक आहे, आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक आहे. .. के भेजा शोर करता है म्हणजे अज्ञानाच्या गलबल्यामुळे परमतत्त्वाचा आवाज मानवाला ऐकू येत नाही. विषयवासनेच्या पुटांमधून झळझळीत असं परमतत्त्व झाकोळलं गेलं आहे. .. भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू... मामा म्हणजे विषयलोलुपतेच्या मागे लागून कल्लू (म्हणजे माणूस) तात्पुरता मरेल, पण... .. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू... मामा त्याला मोक्ष मिळणार नाही. दूसरा (म्हणजे दुसरं शरीर) गतजन्मातली पापं धूत बसेल. चक्र चालू राहील. ---- असं आणखीही होतं. पण मुद्दा असा आहे की "बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 14:31 नवीन
आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक
रोचक ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
विवेक ठाकूर Fri, 12/04/2015 - 15:15 नवीन
"बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात. हे मात्र नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चांदणे संदीप Fri, 12/04/2015 - 15:28 नवीन
____/\____ घ्या सर!
असं आणखीही होतं. पण मुद्दा असा आहे की "बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात.
याच्याशी नम्रपणे सहमत! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अद्द्या Fri, 12/04/2015 - 15:36 नवीन
मुद्दा असा आहे की "बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:14 नवीन
हाण्ण तेजायला. एरर १-२ तर एकच नंबर._/\_ -( व्हाईट नॉईज़ ) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एस Fri, 12/04/2015 - 13:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 14:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 07:15 नवीन
खंडूराया , चिडू नगस..चांगलि लिवलसा कविता.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/04/2015 - 07:47 नवीन
कविता आवडल्या!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 07:54 नवीन
कविता छानच आहे.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 08:34 नवीन
सध्या भाषेत संभोग म्हणजे संपूर्ण समाधान परंतु हे समाधान नेहमीच सम्पूर्ण असेल असे नाही. इथे संभोग ह्या शब्दाचा अर्थ व्यक्क्तीश: घेवू नये. हे जगण्यातले अपुरेपण आहे. उदाहरणार्थ लावता कवाड | अंधारव्यापी पणती | फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली | मन मारले तरी धग रहातेच. असह्य कोंडमारा करा. शेवटी पराजय निश्चित ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर | फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी | मिळाले गमावले सारे व्यर्थ. कुठे तरी विण उसावतेच. सारे असह्य मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे | मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे | स्त्रीत्व पुरुषत्व एका नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही दुखे समान कोणी करुनेस प्राप्त होतो तर कोणी विटम्बनेस
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 12/04/2015 - 08:44 नवीन
संभोग याचा अर्थ समभोग असाही असावा का? आनंद, दु:ख, वेदना ,तृप्ती दोघांनी अनुभवायचे. आणि जेव्हा हा दुसऱ्याचा विचार केला जातो तेव्हाच तो पूर्ण होतो, अपुरेपणा किंवा पराजयाची भावना डोकावत नाही. एक विचार!
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 08:51 नवीन
तुम्ही तुम्हास पाहिजे तसा अर्थ काढू शकता परंतु काही लोकांनी मला विवेचनास भाग पडले तेव्हा त्यातील मतितार्थ उलगडला. जे कवी ला अभिप्रेत आहे ते इथे अभिप्रेतीत झाले आहे
  • Log in or register to post comments
P
pacificready Fri, 12/04/2015 - 08:57 नवीन
अभि अभि प्रेतीत हुआ है लगता है! मायमराठीत असा शब्द आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
य
यशोधरा Fri, 12/04/2015 - 09:04 नवीन
सुरेख आहेत कविता. शब्द फार सणसणीत वापरता आणि अचूक.
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 12/04/2015 - 09:07 नवीन
Khoopach bhaavnatmak ANik vichaaratmak kaavya.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 12/04/2015 - 09:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 09:42 नवीन
+१०००००,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
च
चांदणे संदीप Fri, 12/04/2015 - 10:33 नवीन
सगळ्यांनाच उभ केलं की राव तुम्ही!! \o/ \o/ \o/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ख
खटपट्या Fri, 12/04/2015 - 09:40 नवीन
खूप छान आहेत कविता...
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 10:39 नवीन
हा हा हा हा हा हा ::::: हे मात्र नवीन आहे माझ्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Fri, 12/04/2015 - 11:23 नवीन
ग्रेसच्या शैलीची नक्कल करण्याच्या नादात संपूर्ण फसलेलं काव्य. वाट्टेल ते शब्द वाट्टेल तसे वापरलेत, कशाचा कश्याला मेळ नाही. संभोग म्हणजे संपूर्ण समाधान परंतु हे समाधान नेहमीच सम्पूर्ण असेल असे नाही म्हणजे नक्की काय? संभोगाचा (शब्दार्थ) तुम्हाला माहिती आहे काय? सम + भोग, म्हणजे स्त्री आणि पुरुष ज्यात समान सुख भोगतात अशी क्रिया. इथे संभोग ह्या शब्दाचा अर्थ व्यक्क्तीश: घेवू नये. हे जगण्यातले अपुरेपण आहे म्हणजे संभोगात समाधान नाही म्हणून जगण्यात येणारे अपुरेपण किंवा काय? ते एक असो, उधृत केलेल्या एकाही कडव्यातून कुठलीही एकसंध अभिव्यक्ती दिसत नाही : मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे | मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे | स्त्रीत्व पुरुषत्व एका नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही दुखे समान कोणी करुनेस प्राप्त होतो तर कोणी विटम्बनेस बाळंतीणीची वस्त्रे मागणे म्हणजे काय? का उगीच ग्रेसची स्टाईल मारण्याचा प्रयत्न ? आणि यात कुठे विटंबना आहे? आणि कसल्या मोहात पुरुषाचं कारूण्य अडकलंय ? आणि त्याचा संभोगाशी किंवा जीवनातल्या अपूर्णतेशी (थोडक्यात काव्यविषयाशी) काय संबंध ? त्यात पुन्हा कवितेचं शीर्षक "पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा" असं दिलंय. तो तर अजून मोठा ज्योक. कवीला पंचशीलबद्दल (महावीर जैनाची जीवनविषयक सूत्र) काही घंटा माहिती दिसत नाही. केवळ कवितेची पाच कडवी आहेत आणि संभोगाचा शीलाशी संबंध असल्यानं तो शब्द निवडला आहे.
  • Log in or register to post comments
स
सायकलस्वार Fri, 12/04/2015 - 18:43 नवीन
विवेकजय ठाकूरसागरांशी थोडासा सहमत आहे. (नाही म्हणजे मुद्दाम कोणाची नक्कल वगैरे केलीय असं वाटत नाही) पण चमकदार प्रतिमांची माळ एकापुढे एक रचून खरंच कविता बनते का? (हा प्रश्न आहे, जजमेंट नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मितान Fri, 12/04/2015 - 11:54 नवीन
या कविता घुंगुरनादासारख्या वाटल्या. आवाज येतो, गोड वाटतो पण अर्थ कळत नाही. वर ठाकुर म्हणताहेत तसंच काहीसं..
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 15:35 नवीन
ज्यांना रुपके/अर्थ समजली आहेत ते जरा उलगडून/रसग्रहण करुन दाखवतील का ? कवि महोदयांनी हिंटा दिल्या आहेत पण मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास क्रमांक १-३ समजून घेणे मला खूपच अवघड जाते आहे. क्रमांक ४ , ५ त्यातल्या त्यात बरे पण तेही समजून घेण्यास अजून साहाय्य लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 12/04/2015 - 15:40 नवीन
काय राव. तुम्ही तर रुपके समजण्यात एकदम माहीर. तुम्हीच असे विच्चारावे म्हणजे आम्हाला बाराखडी सुरु करावी लागेल पुन्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विवेक ठाकूर Fri, 12/04/2015 - 16:14 नवीन
त्यानं फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून फक्त एकापुढे एक जोडले आहेत. सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टीच नसतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरते. अर्थात इतक्या लोकांनी भयंकर टाळ्या पिटल्यावर कवितेचा फोलपणा दाखवणं साहसाचं होतं पण ग्रेसची कविता सखोल अभ्यासली असल्यानं ते सोपं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अजया Fri, 12/04/2015 - 18:09 नवीन
Déjà vu !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
आ
आदूबाळ Fri, 12/04/2015 - 18:11 नवीन
+१ अगदी मुद्दा मांडायच्या स्टाईलसकट सरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/04/2015 - 18:20 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ए
एस Sat, 12/05/2015 - 09:30 नवीन
निगा रखो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नाव आडनाव Sat, 12/05/2015 - 09:59 नवीन
ग्रेसचा एव्हढा अभ्यास असणारे एक आयडी होते मिसळपाव वर. आता येत नाहीत का ते ? :) त्यांचं नाव काय बरं ..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
न
नाखु Mon, 12/07/2015 - 12:15 नवीन
एक नाटक होतं "तुझे आहे तुजपाशी" बघा विवेकाने दिसतील इथेच कुठे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 16:52 नवीन
जर का मि इथे कोनाला नको असिन तर मि लिहिने बन्द करतो कारण इथे सहित्य काव्य सोदुन इतर चर्चा होत असतिल तर त्या होवु दे निरोप द्या
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 16:54 नवीन
हवे असल्यास लिखान रद्द करतो पण विटंब ना थाम्बवा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/04/2015 - 17:20 नवीन
मिपाकर अशीच गम्मत जम्मत करत मिपा इंजॉय करतात. नाराज होऊ नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 17:46 नवीन
नकोच जर प्रतिभे चा असा अप मा न होणा र असेल तर मि इथुन जातो. कलावे लोभ असावा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 18:01 नवीन
'कले करता कला' हि एक स्विकार्य भूमिका असू शकते, ज्यात तुमची कला इतरेजनांना कशी वाटली याच्याशी 'कले करता कला' भूमिका बाळगणार्‍यांना सोयरसुतक असण्याचे काही कारण नाही. तुम्ही स्पष्टीकरणे दिलीच पाहीजेत इतरांना तुमची कला समजलीच पाहिजे असे काही नाही. बा.सी. मर्ढेकर त्यांच्या कवितांची भूमिका उअलगडून दाखवण्याचे टाळत तसेच कवि ग्रेस यांचेही होते म्हणतात. जसे एक कलाकार म्हणून तुमच्या कवितेतून एखाद्या गोष्टीवर भाष्य ते कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला कलाकार म्हणुन आहे तसेच भाष्य ते कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य तुमच्या वाचकांना, चाहत्यांना आणि रसिकांनाही असते. माझ्या अलिकडील एका लेखातील एक संदर्भ वाचकांना लक्षात आला नाही त्यांनी टिका केली, त्यांना लक्षात आले नाही आणि मला सांगता आले नाही किंवा मी सांगीतले नाही हि संवाद पूर्ण होण्यातली दरी असते, काही वेळा सांधली जाते काही वेळा पूअ बांधले जातात काही वेळा तशीच राहते. कलाकार जसा संवेदनशीत असतो तसा एखाद्या व्यंगचित्रकारा प्रमाणे आजूबाजूला तटस्थपणेही पाहत असतो आपण सर्वच जण आपापल्यावर होणार्‍या टीकेकडेही तटस्थपणे पाहण्यास शिकु तेवढेच आपले कलामुल्य वृद्धींगतच होते असे वाटते, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा