Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आत्मनिवेदन

प — पालीचा खंडोबा १, Fri, 12/04/2015 - 11:31
संमोहित मनाच्या दुख-या गाभा-याला स्पर्श करून सांगतो हे आत्मनिवेदन सत्य आहे ! पहाटे उमलुन पहिल्या प्रकाश किरणात कोमेजणा-या बकुळफुलांच्या संचिताच्या शापासारखं हे जगणं अन् क्लेश नवसाचं रूपं देवीच्या उंबरठ्यावर ठोकावं असं पूर्व परंपरेने चालत आलेलं ! संध्याकाळी मी जेव्हा डोळ्यावाटे रक्त वाहतो तेव्हा तुझे परसदार लालभडक होते, पसरलेले लाल अन् येणारे कृष्णमय ह्याच्या संगमाने जे काही क्षिताजावर उमटते त्याला शब्द नसतात त्याच अवस्थेत मी असतो ह्यासाठी पाहिजेतर मी माझ्या पहिल्या कवितेच्या गर्भपाताची शपथ घेतो ! शेवरीच्या कापसात विधवेची रात्र गुंडाळून विरह आग आग होऊन रात्र जाळतो मग झोप परागंदा होते अन् मी नागव्याने पिंपळपाराकडे वळतो पूर्वजन्मीच्या पापापासून मुक्त होण्यासाठी अनंत प्रदक्षिणेच्या शोधात ! विजयकुमार....................... 23 / 02 / 2009

प्रतिक्रिया द्या
1199 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
निनाव Fri, 12/04/2015 - 12:00 नवीन
वाह. सुन्दर . शब्द वेचक.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 17:39 नवीन
हि को णा लाच आवडलि नहि का कवि ता
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/08/2015 - 17:46 नवीन
किमान मला तरी आवडली नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
द
दमामि Wed, 12/09/2015 - 04:01 नवीन
या कवितेवर विडंबन पाडले होते, पण त्यात ज्या आयडी चे नाव अपरिहार्य होते, त्यांनी ते reject केले.:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा