Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संपूर्ण अमेरिकी सैन्यदल स्त्रियांना खुले

च
चलत मुसाफिर
Fri, 12/04/2015 - 12:33
🗣 22 प्रतिसाद
अमेरिकी सरकारने घोषणा केली आहे की पुढच्या वर्षापासून सैन्यदलाचे सर्व विभाग व पदे ही स्त्रियांसाठी खुली केली जातील. यावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महिलांना सैनिक म्हणून भरती होण्यास प्रोत्साहन द्यावे का, याबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत. भारतीय सैन्यात महिलांना काही मोजक्या विभागांत, तेही केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जाते. सेना वैद्यकीय सेवा, सेना परिचारिका सेवा आणि न्याय विभाग वगळता अन्य विभागात त्यांना लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंतच बढती देण्यात येते आणि त्यानंतर निवृत्तीवेतनाशिवाय सेवामुक्त केले जाते. (हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे). वायुदलात महिलांना लढाऊ विमाने उडवण्याची परवानगी नाही. फक्त हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमाने उडवता येतात. (नोंद: पाकिस्तान हवाईदलात महिला लढाऊ विमाने उडवतात, पण भारतीय हवाईदलात नाही). नौदलातील महिला अधिकारी युद्धनौकांवर नियुक्त केल्या जाऊ शकत नाहीत. भारताने याबाबतीत काय विचार करावा?
वर्गीकरण
स्त्रीपुरुषसमानता
सेना
समाज

प्रतिक्रिया द्या
5012 वाचन

💬 प्रतिसाद (22)
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:36 नवीन
खरे तर या बाबतीत भारत जगातल्या सर्व देशात अग्रगण्य असावयास हवा होता.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 12/04/2015 - 13:27 नवीन
आपण कोणत्या कारणांसाठी या बाबतीत आघाडी घ्यायला हवी होती? कारणं स्पष्ट झाली तर विषयविस्तार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/05/2015 - 14:49 नवीन
देवी दुर्गा ते झाशी रणांगण भारतीय स्त्रीयांना अगदीच नवे आहे असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
श
शिव कन्या Sat, 12/05/2015 - 16:32 नवीन
नवे नाहीच! पण परंपराही राखली गेली नाही. म्हणजे धोरण म्हणून आजपर्यंत समानतेने ही परंपरा राखण्यात काय अडचणी होत्या का? धागाकर्त्याने उल्लेखिलेल्या संधीची असमानता आणि मोबदल्याची ऐशीतैशी, वाचून धक्का बसलाच ! तसेच, आज अशा घोषणा अमेरिके सारख्या देशाने, एकदम करण्याचे प्रयोजनही कळत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विकास Sun, 12/06/2015 - 02:28 नवीन
आज अशा घोषणा अमेरिके सारख्या देशाने, एकदम करण्याचे प्रयोजनही कळत नाही! हा विषय गेले काही वर्षे सरकार आणि माध्यमांकरवी जनतेत चर्चीला जात होता. त्यावर निर्णय घेणे आणि तो जाहीर करणे राहीले होते इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
च
चलत मुसाफिर Sun, 12/06/2015 - 06:05 नवीन
आजपर्यंत काय झाले, यापेक्षा भारताचे यापुढील धोरण काय असावे या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. सैन्य सोडाच, पण भारतात पोलीसभरतीही लिंगनिरपेक्ष अथवा लिंगसमान होत नाही. पोलीसदलात स्त्री शिपायांचे प्रमाण नगण्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/04/2015 - 12:53 नवीन
भारताने कॉम्बैट ड्यूटी वर स्त्री अधिकारी नेमणे एयरफोर्स मधे बहुतेक सुरु केले आहे असे वाचल्याचे स्मरते लिंक सापडल्यास देतो
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:06 नवीन
करा की, सगळेच विभाग खुले करा. तोटा होईल असे वाटत नाही सध्या तरी.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 12/04/2015 - 13:23 नवीन
तोटा कुठल्या अर्थाने ? जरा स्पष्ट केलेत,तर चर्चा अधिक अर्थपूर्ण होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 13:25 नवीन
नोंद: पाकिस्तान हवाईदलात महिला लढाऊ विमाने उडवतात, पण भारतीय हवाईदलात नाही). काय म्हणता? पण ते तर इस्लामिक राष्ट्र आहे ना.. जिथे स्त्रियांवर अत्याचार, अपमान, शरिया लॉ वैगेरे....?
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 12/04/2015 - 13:34 नवीन
बातमी वाचलेली. पाकिस्तानी हवाई रणरागिण्या आहेत. स्त्रियांवरचे अत्याचार निराळे. त्यांची सेनादलातली भरती निराळी. सगळे मापदंड निरनिराळे बरं का!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 13:40 नवीन
ते माहिती आहे हो. :-) पाकिस्तानबद्दल प्रेमाने बोलणारे आपल्याकडचे काही लोक आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
ध
धनावडे Fri, 12/04/2015 - 21:51 नवीन
काही दिवसापुर्वी पाकिस्तान हवाई दलाच्या विमान अपघातात पाकिस्तान हवाई दलाची पहिली महिला पायलट चा मृत्यु झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
ह
होबासराव Fri, 12/04/2015 - 15:38 नवीन
ज्जे ब्बात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उगा काहितरीच Fri, 12/04/2015 - 13:30 नवीन
ज्यांनी प्रत्यक्ष सैन्यात काम केलं आहे अशा मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचन्यास उत्सुक !
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Fri, 12/04/2015 - 13:33 नवीन
बाकी काहीही असो, हि येणाऱ्या युद्धाची चाहूल आहे कि काय असे वाटते कधी कधी.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 12/04/2015 - 13:37 नवीन
मनातलं बोललात मंबाजी! आपणच नाही, सगळ्यांनाच ती खुमखुमी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
म
मम्बाजी सर्वज्ञ Fri, 12/04/2015 - 14:31 नवीन
गेल्या काही दिवसातल्या घटना जर क्रमाने एका खाली एक लिहिल्या तर अस वाटतं कि जगातले बरेच देश अस्थिर झाले आहेत. राजकीय आणि आर्थिक - दोन्ही आघाड्यांवर. आता मला नवीन 'कोन्स्पिरसी थिअरि' तयार करायची नाही कारण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे - १. जगभरातली आर्थिक मंदी. २. आयसीस सारखी संघटना तयार होणे (अतिरेक्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने राज्य चालवणे हि गोष्ट या पूर्वी कधी ऐकली नवती) ३. अनेक राष्ट्रांनी सेना भरती करणे. यात स्त्रियांना सामील करणे आणि बजेट मध्ये नसतानाही सौरक्षणाचा खर्च वाढवणे, पाण बुड्यानची मरम्मत करण्यासाठी खर्च करणे इत्यादी 'किरकोळ' गोष्टी आल्याच. ४. दक्षिण चीन समुद्राचा विषय, युरोपात स्थलांतराचा विषय (त्यात भारतात 'असहिष्णुता' वाढणे घुसडून द्यायला हरकत नसावी) ५. अनेक देशांमध्ये सत्तांतरे आणि राजकीय पातळीवर आमूलाग्र बदल घडणे. भारत हे एक उत्तम उदाहरण होऊ शकते. एकूणच काय, आमिर म्हणतो तो खरे असावे, जगभर 'असहिष्णुता' वाढते आहे. किरण ने पुढचे अमेरिकन इलेक्शन लढवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
ज
जेपी Fri, 12/04/2015 - 15:36 नवीन
काय मंबाजी,,अमेरिकेत फार तर सोशल सिक्युरीटी नंबर मिळेल..जिवाची गॅंरटी आहे का ?? कालच एका माथेफेरु जोडप्याने 14 जणांचे प्राण घेतल्याची बातमी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
म
मम्बाजी सर्वज्ञ Fri, 12/04/2015 - 17:33 नवीन
जेपी 'असहिष्णुता' प्रकार उपहास म्हणून लिहिला होता. आमिर ची 'असहिष्णुता' वेगळी आणि जगभर चाललेले प्रकार वेगळे आहेत या बद्दल मला काही संशय नाही. मला माहिती नाही बाकी किती लोकांनी या गोष्टीची नोंद घेतली कि आमिर चे वक्तव्य 'इंडिअन एक्स्प्रेस' च्या 'फोरम' वरून प्रसारित झाले होते. त्या पेपरचा इतिहास बघता त्यांचे मोदींवर किती प्रेम असावे याचा अंदाज येतो. बाकी काही नाही पण जेवा कुणी तरी 'गेल्या ६ महिन्यात असहिष्णुता वाढली आहे' असे छाती ठोकून सांगतो तेवा समजून जावे कि प्रश्न आणि उत्तरे घरून पाठ करून आले आहेत विद्यार्थी. असो. अमेरिकेबद्दल काय बोलणार? तो गोळीबाराचा प्रकार काही पहिला नाही. त्यामुळे तिथल्या लोकांना फार काही फरक पडेल असे वाटत नाही. पण देशाचा आकार आणि लोकसंख्या लक्षात घेत १४ जण हि 'संख्या' मोठी वाटत नाही, त्या घटनेचे परिणाम निश्चित वाईट आणि मोठे आहेत. थोडे दिवस 'टोपी' वाल्यान्विरुद्ध द्वेष ताजा राहील आणि युद्धासाठी त्याचा उपयोग सरकार करून घेईल कदाचित. पण हे सगळे अंदाज. पण काय हो, भारतात जिवंत राहणे हे सोपे आहे असं तरी कुठाय? भारतात मोकाट शस्त्र मिळत नाहीत हातात तरी रोज पेपर मध्ये २० रुपयांपासून रजा न मिळाल्याच्या कारणास्तव डोक्यात दगड घालणे आणि तत्सम प्रकार घडतातच कि.आणि आपल्याला कळणाऱ्या घटना किती आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या किती त्याचा ताळमेळ लावणे तर कधी शक्य होईल असे वाटत नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
च
चलत मुसाफिर Sun, 12/06/2015 - 06:10 नवीन
भारतानेही सैन्यदलात महिलांची भरती सुरू करावी का, असा विषय आहे. जागतिक राजकारणापेक्षा 'स्त्री विरुद्ध पुरुष' या सनातन रस्सीखेचीशी त्याचा जास्त संबंध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
व
विकास Fri, 12/04/2015 - 18:02 नवीन
विकीवरील माहीतीनुसारः However since 2012 the PAF has stopped inducting women as fighter pilots because of a growing rate of unfitness and lack of flying aptitude in the women already inducted. मला ते पान वाचल्यावर, पाकीस्तानात सैन्यात (पुरूष) मनुष्यबळ कमी पडत असल्याने महीलांना घेणे भाग पडले असे वाटले. तरी देखील हे काही कमी नाही. भारतात नाहीत आणि ज्या आहेत त्यांना निवृत्तीवेतन दिले जात नाही हे वाचून मात्र धक्का बसला! अमेरीकेत जी काही घोषणा केली आहे त्यात जे काही महीलांना काम करायची संधी मिळणार आहे त्या ते काम आत्ता देखील करतच आहेत. फक्त आता त्यांना योग्य मोबदला (पैसे, निवृत्ती वेतन, हुद्दा वगैरे संदर्भात) मिळू शकेल जे आधी नव्हते. त्याच बरोबर हे काही राखीव जागांसारखे नाही. त्या त्या कामाला गुणवत्तेनुसार योग्य व्यक्तीच घेतली जाईल. फक्त आता त्यात स्त्रीयांची गुणवत्ता देखील लक्षात घेतली जाईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा