Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

य
योगेश आलेकरी
Sat, 12/05/2015 - 14:47
💬 28
कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन. कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच . १.सूर्यास्त sunset Rayari kinara कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते. मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून म्हसला मार्गे जाते येते. दुसरा मार्ग रोह्यातून केळघर घाटमार्गे राजपुरी आगरदांडा जेट्टी वरूनगाडी बोटीत टाकून दिघी बंदर असा प्रवास करत सायंकाळी सार्वा गावात पोहोचलो. गाडीची हि समुद्रउल्लंघनाची पहिलीच वेळ असल्याने याच मार्गाची उत्सुकता होतीच. २.बोटीत आमची गाडी चढवताना gadi साबिरकाका वाट पाहत होतेच, एक डोंगररांग उतरून गावात प्रवेश केला,ते थेट काकांच्या घरीच गेलो. त्याचं घर हेच आमच मुक्कामाच ठिकाण आहे समजल्यावर तर आमच्या हरिणाचा उत्साह संचारला, कारणही तसच; अगदीच किनार्याला खेटून असं त्याचं घर इतकं कि, लाटांचे शिंतोडे अंगावर घेत ओसरीवर बसून चहा पिता यावा ! समोर अथांग समुद्र, अस्ताला जाणारा सुर्य, निळ्याशार सागरावर आकाशात भगवी छटा पसरवून सुर्यनारायण आकाशातच बुडाले होते . पाठीमागे नारळी फोफळी चे उंचच उंच वृक्ष , दूरवर काही सागरालाच समांतर होऊन आकाशात झेपावलेले. असा तो सुन्दर देखावा पाहत पाऊले कधी किनाऱ्यावरील वाळूत भटकायला गेली कळलच नाही. सूर्यास्त कॅमेराबद्ध करत असतानाच काका चहा घेऊन आले , तो वाफाळलेला चहा पीत आयुष्यातील एक सुरेख संध्याकाळ अनुभवत होतो. बराच वेळ किनार्यावर च होतो , मी, प्रशांत अन सोबतीला साबीर काका.काका त्या परिसराबद्दल भरभरून बोलत होते, तेथील जन्जीवानाबद्दल बोलत होते. त्यांनी तेथे फ्री फिशिंग (हाताने मासे पकडणे) हि दाखवले. तोपर्यंत रात्रीच जेवण तयार झाले होते, काकुनी मस्त अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण बनवलेले त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. ३.संध्याकाळीचे काही क्षण sunset ४.फेरफटका . ओहोटीला गेलेल्या समुद्रावरून sunset ५.साबीर काका तेथील परिसराची माहिती देत होते as जेवण आटोपून बाहेर पडलो, मस्त चंदेरी लाटांचा आस्वाद घेण्यासाठी चंद्राच्या उजेडात किनाऱ्यावरील वाळूत अनवाणी पायाने चालत फेऱ्या मारत असतानाच चांदणे ओंजळीत घेण्याचा प्रयत्न करावा आणि क्षणार्धात फेसाळती लाट पायावरून जात बाजूला च दगडावर अडलावी न आपण भानावर यावे, असाच काहीसं होत होत. बराच वेळ बोचरी थंडी अंगावर घेत दूरवर समुद्रात होणार्या हालचाली न्याहाळत बसलो. एखादे शहर भासावे तसे त्य जहाजावरिल दिव्यांनी समुद्र चमचमत होता. दिघी बंदरात येण्यासाठी नांगरलेली ती जहाजे होती. १० च्या दरम्यान घरी आलो काकांनी झोपायची उत्तम सोय केलेलीच होतीच. खिडकीतून दिसणारा अथांग सागर व लाटांची लयबद्ध गुंज कानावर घेत कधीतरी निद्राधीन झालो. काकांच्या घरातील आमची झोपेची व्यवस्था काकांच्या घरातील आमची झोपेची व्यवस्था ६.मी व प्रशांत सूर्यास्त सकाळी उठलो ते थेट किनाऱ्यावरच धावलो प्रशांतने कॅमेरा घेतलेलाच सोबत, चमचमणारे सूर्यबिंब ओहोटीमधील डबक्यामधून डोकावत होते, पाठीमागील डोंगरांतून सूर्योदय होत होता, माडाच्या झापामधून सुर्कीर्नाच्या होणारा शिडकाव भलताच गोड भासत होता. आन्हिक आवरून पुन्हा वाळूत येउन बसून नारळीच्या झापामधून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत हातात चहा बिस्कीट व सोबतीला समुद्रच सागर संगीत .…!!!!! ७.सक्काळी सक्काळी sunset आता वेळ होती site seeing ची सार्वा गावाच्या मागच्या बाजूला जी डोंगररंग आहे त्यामध्ये एक धबधबा आहे, साधारण ५०/६० फुटाचा तो धबधबा साधारण जानेवारी पर्यंत वाहता असतो, अर्ध्या तासाच्या जंगल ट्रेक करून आपण थेट धाब्धब्यापाशी पोहचू शकतो. पूर्ण पणे सुरक्षित असा तो धबधबा family trip साठी छान पर्याय आहे . ८.धबधब्यावर sunset इथून आजूबाजूला घनदाट जंगल तर समोर नारळीच्या बागेवरून थेट समुद्राचे दर्शन. मनसोक्त photography करून न्याहारीसाठी घरी येत असता वाटेत एक माडाचे बन लागले नारळाच्या उंचच उंच झाडावर लगडलेले शहाळे पाहून तोंडाला पाणी सुटले ना !! मग काय free climbing चा अनुभव कमी आला ना. सरसर झाडावर चढून तीन मोठे शहाळे काढले. न्घारी जाऊन मग मस्त प्रोग्राम ;) कोकणात जाऊन शहाळे पिणे तेही स्वत झाडावर चढून काढलेले वाहः मजा काही निराळीच !! ९.झाडावरून शहाळे काढताना sunset १०.चढायची कसरत sunset ११.आणि काढलेल्या शहाळे हातात घेऊन स्वतः ब्लोग लेखक gadiआणि काढलेल्या शहाळे हातात घेऊन स्वतः ब्लोग लेखक आता वेळ होती मणेरी येथील प्रसिद्ध light house दिप गृह पहायची. रस्ता किनाऱ्यावरूनच चालला होता बाजूलाच एक तले शाबीर काकांनी दाखवले तेथे मस्तपोहण्याची सोय होऊ शकते. नानावली गावात गाडी पार्क करून मणेरीकडे चालतच जाव लागते. डोंगराची एक निमुळती सोंड सरळ समुद्रात घुसलेली आहे त्यावर अगदी टोकाला तटरक्षक व बंदर (port) यांचे एक ठाणे आहे त्यावरच दीप गृह आहे ते ,अर्ध्या तासात च आपण तिथे पोहचतो. हे light house जहाजांना दिशादर्शकाचे महत्वाचे काम या ठिकाणावरून पार पडले जाते. संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने छायाचित्रणावर मर्यादा देऊन ते दीपगृह आतून पाहण्याची संधी मिळाली. १२.मणेरीचा दीप गृह दुरूनच मणेरीचा दीप गृह दुरूनच दीपगृह watch tower म्हणून हि काम पाहतो यावरून दूर दूर वर पसरलेला समुद्र दिसत होता, दिघी बंदरात येणारी व नागरलेली जहाजे दिसत होति. उजवीकडे कासा बेटावर शिवरायांनी वसवलेलं पद्मदुर्ग दिसत होता, जंजिरा जरासा डोंगरा आड असल्याने नजरेच्या टप्प्याबाहेर होता. तिथल्या अधिकाऱ्याचे आभार मानून परत नानवली गावात आलो जे आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. तिथून समुद्र दर्शन घेत दुपारच्या जेवणासाठी घरी अलो. १२.दुपारचे जेवण दुपारचे जेवण काकुनी मस्त जेवण बनवलेलेच होते येथेच्छ तव मारून काकांचा निरोप घेऊन आडगाव चौपाटी व वेलास चौपाटी कड रवाना झालो ४ किमी असणारी हि चौपटी खर्च या परिसराच्या सौदर्याला ४ चंद लावते. हि चौपाटी म्हणजे एक स्वप्नवत वाटणारासुंदर नजाराच अर्धचंद्राकृती आकाराचा किनारा, स्वच्छ पाणी ,गर्दी नाही, किंबहुना कोणीच नाही आपल्याशिवाय, निरव शांतता, किनाऱ्यावरील माडाची झाडे समुद्राला समांतर होऊन अचानक आकाशाला झेपावलेले, त्यावर चाललेली समुद्री पक्षांची किलबिल, लाटांचा लयबद्ध आवाज, आणि आम्ही दोघेच फोटो काढत उभे, एवढी निर्मनुष्यता खचितच मिळते !! सार्वा ट्रीप मध्ये हा बीच चुकूउच नये असा. "कोकण ,म्हणजे परमेश्वराला पाहते पडलेले सुंदर स्वप्नच" असौगिच नाही कोणी म्हणून ठेवले. आदगाव चौपाटी आदगाव चौपाटी एकांतात चौपाटीवर वावर एकांतात चौपाटीवर वावर इथून पुढे वेळास १० किमी व दिवेआगार चौपाटी १८ किमी वे फक्त. व त्त्याना जोडणारा रस्ता म्हणजे निव्वळ स्वर्गच !!! उजवीकडे अथांग सागराचा लयबद्ध खेळ, तर डावीकडे झाडझूडपाणी वेढलेले बुटके डोंगर, अगदी दोइवरिल टोपी उडाली तरी समुद्रात जाऊन पडावी एवढा जवळून रस्ता . इथून मात्र वेळे अभावी वेळास व दिवेआगर येथील सुवर्णगणेश बघून म्हासला-माणगाव मार्गे मुंबईकडे रवाना झालो. काही निवांत क्षण काही निवांत क्षण काही निवांत क्षण मळलेल्या पायवाटेव्यतिरिक्त आडवाटेवर रमणाऱ्यासाठी सार्वा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो . इथे आपल्यला काय मिळेल पाहायला ? -तर दिघी बंदर., जंजिरा तर अवघ्या १२ किमी वर जवळच पद्मदुर्ग, मणेरी दीपगृह, सार्वा धबधबा हा तर कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण, बाजूलाच सार्वा बीच, अद्गाव बीच, तसेच ग्रामीण जीवन जवळून बघण्यची संधी, किंभ्ना अनुभवण्याची संधी, see foods, साबीर काकांकडे तर माशांचे सर्व प्रकार उत्तमरित्या व चविष्ट केले जातात त्यामुळे आपले foodtravel पण होऊन जातेच समुद्रकिनारी टेंट लाऊन साग्रसंगीत ऐकत रात्र घालविण्याची मजाही घेत येऊ शकते. या स्थळास भेट द्यायची असल्यास साबीरकाका 7588650329 यांना संपर्क करू शकता . -विशेष आभार- मुग्धा येळकर -

प्रतिक्रिया द्या
10362 वाचन

💬 प्रतिसाद (28)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/05/2015 - 15:50 नवीन
मस्त सफर. एका अनवट जागेची माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Sat, 12/05/2015 - 16:36 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
योगेश आलेकरी Sat, 12/05/2015 - 16:36 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कंजूस Sat, 12/05/2015 - 15:57 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:31 नवीन
थँक्स....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अभिजीत अवलिया Sat, 12/05/2015 - 16:03 नवीन
अप्रतिम ....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 12/05/2015 - 16:46 नवीन
भटकंती आवडली.. वाखुसा
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/05/2015 - 16:56 नवीन
वाह, मस्तं भटकंती. खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:40 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
सत्याचे प्रयोग Sat, 12/05/2015 - 17:03 नवीन
फोटो आणि वर्णन छान आहे.
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:41 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
म
मित्रहो Sat, 12/05/2015 - 17:07 नवीन
मस्त फोटो
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:38 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
अ
अजया Sat, 12/05/2015 - 17:08 नवीन
मस्तच नवी माहिती.फोन नं दिलात ते बरं झालं.
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:38 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 12/07/2015 - 08:54 नवीन
मस्तच. आडवाटेवरच्या एका ठीकाणाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आणी हो. फोन नं. दिलात ते उत्तमच झाले.
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:36 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
क
कौन्तेय Mon, 12/07/2015 - 08:57 नवीन
योगेश, नेहमीप्रमाणेच सुंदर! संगमेश्वरजवळचे मार्लेश्वर देवस्थान व बारमाही धबधबा ही ठिकाणेही अद्याप प्रसिद्धीस पावली नाहीत. जसे जमेल तसे त्यांबाबत लिही ...
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:34 नवीन
हो मार्लेश्वर ला पण जायचं आहे.. आंबा घाटातुन एकदा.. तेव्हा असाच प्रयत्न असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय
ज
जय२७८१ Mon, 12/07/2015 - 11:50 नवीन
योगेश, मस्तच.....फोन नं दिलाय त्या मुळे कधी हि जाता येइल
  • Log in or register to post comments
य
योगेश आलेकरी Mon, 12/07/2015 - 19:35 नवीन
आवश्य :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय२७८१
ब
बापू नारू Mon, 12/28/2015 - 13:34 नवीन
मी with family(Couple) मागच्या हफ्त्यात जावून आलो, एकदम शांत आणि निवांत अशी जागा आहे. फक्त १७ km आहे दिवे आगार पासून. ७५०/- प्रतिव्यक्ती . राहण + २ वेळच खान(veg/non-veg) आणि नाश्ता. राहायला स्वतंत्र घर दिल होत, (तिथून जवळच असलेल्या वेळास या गावी स्वतंत्र रूम चे ३५००/- सांगितले होते + खायचे वेगळे). ज्यांना एकांत हवा आहे त्यांनी एकदा जावेच , Private Beach आहे कोणाचा त्रास नाही ,फक्त छोटा आहे. दिवे-आगार to श्रीवर्धन Via शेखाडी या रूटपेक्षा हि खूप छान रूट आहे, वेळास-अडगाव-सर्वे . समुद्राला लागून रोड आहे. मी राहिलो होतो ते घर सुद्धा छान होत कोकणी पद्धतीच .३-४ गुंठे जागेत घर आणि नारळाची बाग. जेवण ही छान होत. (दिवे आगार पासून 17km आहे त्यामुळे तिकडच्या Beach वर समुद्रात अंघोळ करून इकडे येणाऱ्यांना त्रासदायक वाटेल ,पण साबीर काकांना सांगितलत तर ते तिकडे गोड्या पाण्याने अंघोळीची सोय करून देतील. ) साबीर काका- एक खूपच छान व्यक्तिमत्व ,साधा-सरळ कोकणी माणूस. सर्वे गावाच्या Tourist committee चे अध्यक्ष. या माणसाबर पण थोडा वेळ घालावा ,दुनियादारी चा खूप अनुभव असलेली व्यक्ती आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/28/2015 - 15:17 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/29/2015 - 13:53 नवीन
नवीनच जागेची माहिती कळली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 12/29/2015 - 17:23 नवीन
जायलाच पाहिजे!धन्यवाद योगेश! (मासे आणि कोलंबीखाऊ) बोकेश!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/30/2015 - 16:04 नवीन
छायाचित्र, वर्णन, मस्तच आणि नव्या ठिकाणाची माहिती आवडली. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/30/2015 - 17:50 नवीन
छान माहिती व फोटू.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/31/2015 - 03:38 नवीन
वाखूसा...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा