Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साकल्यसूक्त

म — मितान, Sat, 12/05/2015 - 17:44
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

प्रतिक्रिया द्या
39642 वाचन

💬 प्रतिसाद (136)
म
मितान Mon, 12/07/2015 - 01:55 नवीन
आपला वरदहस्त डोक्यावर असताना अाम्हास काहीही लिहिणे अशक्य नाही! तुम्ही फक्त पेर्णा द्या आजोबा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नगरीनिरंजन Mon, 12/07/2015 - 00:42 नवीन
शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी फार आवडली!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/07/2015 - 05:39 नवीन
कखगघङ चछजझ टठडढण तथदधन पफबभम यरलवश षसहळ क्षज्ञ
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 05:45 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद. आवडला. कवयित्रीच्या भावना अचूक पकडल्यात... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
P
pacificready Mon, 12/07/2015 - 06:28 नवीन
स्वर वर्ज्य असणं साहजिकच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिशी अबोली Mon, 12/07/2015 - 06:29 नवीन
कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारा रसाळ प्रतिसाद.. 'ञ' मुळे उगाच होऊ शकणारा फापटपसारा वगळून जी चतुराई केलेली आहे, तिला तोडच नाही. धन्यवाद पैसाताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 12/07/2015 - 11:17 नवीन
सगळी अक्षरे शोधली पण बेटा 'ञ' मिळाला नाही मग मरो मेला म्हटले! नाहीतरी 'त्र' सोबत भांडतो तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
स
सस्नेह Mon, 05/28/2018 - 19:06 नवीन
=)) =)) =)) ही वाखू साठवल्याचे सार्थक झाले. आज लै बोर झाल्तं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मृत्युन्जय Mon, 12/07/2015 - 08:14 नवीन
कवितेचे या धाग्यावरील सर्वोत्तम रसग्रहण. अगदी मितानतैंनी स्वतः केलेल्या रसग्रहणापेक्षासुद्धा चांगले. पण कवितेत दडलेल्या अव्यक्त भावना वरच्या रसग्रहणातुन पुरेपुर उतरत नाहित असे नमूद करु इच्छितो. या निमित्ताने या काव्याची तुलना गुंडा या चित्रपटाशी करु इच्छितो. कितीही सविस्तर परीक्षणे केली तरी गुंडा दशांगुळे उरतोच तसेच या काव्याचे झाले आहे. त्यासाठी दमामितैंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मितान Mon, 12/07/2015 - 11:01 नवीन
तुम्हाला कविता वाचून जो धक्का बसलाय याची जाणीव आहे मृत्युंजयदादा !! पण असे गोंधळू नका. हे बघा - कविता कोणी केली ? मितान ने ! रसग्रहण कोणी ? दमामि ने गुंडांगुळे काय उरलं ? कविता अभिनंदन कोणाचं ? मितानचं !!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 12/07/2015 - 17:04 नवीन
काय की दमामि मधला मि मितान चा आहे असे कोणीतरी म्हणताना ऐकले त्यामुळे गोंधळ उडाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
P
pacificready Mon, 12/07/2015 - 17:11 नवीन
मि=मितान तर द=? मा=?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
स्मिता श्रीपाद Mon, 12/07/2015 - 06:39 नवीन
साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त असं वाचलं ..... मग पहिली ओळ वाचल्यावर अजुनच कन्फ्युजन झालं...मग पुढचं काई वाचलच नाई... ( आधीच सोमवार सकाळ त्यात आणि ..... ) ;-)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 08:48 नवीन
कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी सगळे डोक्यावरून गेले. (शष्पप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 12/07/2015 - 09:58 नवीन
बाकी सगळे डोक्यावरून गेले म्हणताना ते सगळे म्हणजे 'शष्प' असे तुम्हाला म्हणावयाचे नसावे असे समजतो. अन्यथा अनर्थशास्त्रास फारच प्रत्ययवाही न्याय दिल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 10:01 नवीन
ही ही ही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ग
गवि Mon, 12/07/2015 - 08:56 नवीन
वा वा. सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून. आता "इन ट्यून विथ द ट्यून" वाचायला घेतोच..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/07/2015 - 09:30 नवीन
ही कविता समजून घ्यायला, "इन ट्युन विथ द टून" वाचायची गरज लागेल ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 09:33 नवीन
सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून.
म्हणजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो.... (बॅटकिणी ब्रूसाळराव.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 09:35 नवीन
आक्क्क्क्क्................छी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 10:01 नवीन
अभ्या भिंगार्डे ;) की ते "हीक् छ्याक्" होतं? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गवि Mon, 12/07/2015 - 10:11 नवीन
ठ्याँ छिक असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 11:24 नवीन
नशीब आवाजाकडे लक्ष गेले. सतरंजीचे सूत अन धोतराचा सोगा अन गौरांगाकडे असलेले लक्ष नाही दिसले. ;) " भिंगार्ड्या कंडम माणूस एकदम"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 11:28 नवीन
चवळीच्या शेंगेशेजारचा सुरणाचा गड्डा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पालीचा खंडोबा १ Mon, 12/07/2015 - 09:25 नवीन
क्या बात है . मस्तच
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 12/07/2015 - 09:51 नवीन
ह्म्म्म!!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 12/07/2015 - 15:27 नवीन
साकल्यसूक्त अब समझा.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Mon, 12/07/2015 - 15:50 नवीन
एपिक लोल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बोका-ए-आझम Mon, 12/07/2015 - 18:37 नवीन
छान हो मस्तच हो कसं जमतं हो? डोळे पाणावले हो! शरुमौशींचा वारसा जिवंत ठेवल्याबद्दल अश्रुभरे मेघविव्हळ धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 05/31/2017 - 20:00 नवीन
साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद डोक्यात.. च् च्.. आपलं ते डोक्यावरून गेले.. पैसातैंचा प्रतिसाद तेवढा आवडला, कविता उलगडत गेली.. =))
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 05/31/2017 - 20:51 नवीन
ही कविता अशी उलगडायची नाहीये. त्यात साकल्याने गुरफटून घ्यायचं आहे. उलगडताना ती शिवायला घेतलेली गोधडी असते, आणि गुरफटताना शिवून पूर्ण झालेली. हा बेसिक गोंधळ जोपर्यंत मनातून निघत नाही, तोपर्यंत कविता समजण्याइतकी आध्यात्मिक उन्नती होणार नाही तुमची. रोज बे ते एकोणतीस पाढे म्हणत जा. तिशीपर्यंत साकल्य करायचं नाही, हे साधनेने समजेल. साधना कट करू नये. तूर्तास इतकेच. तूरडाळीचे घोटलेले वरण सप्लिमेंट म्हणून खावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी
ए
एस Wed, 05/31/2017 - 21:10 नवीन
संधिवाताला तूरडाळ वर्ज्य असतें. तेंव्हा मूगडाळीचें वरण बरें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
प्रीत-मोहर गुरुवार, 06/01/2017 - 10:20 नवीन
मूगडाळीने साकल्य साधता येते का॑ पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Fri, 06/02/2017 - 19:29 नवीन
साकल्याच्या शोधात 'वाकल्य' आलें नाही म्हणजें मिळविलीं. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
म
माहितगार गुरुवार, 06/01/2017 - 09:28 नवीन
कविते वरचे प्रतिसाद वाचून खासकरून पैतैंचे अ ते ज्ञ रसग्रहण वाचून ज्ञ ते अ च्या मार्गे वाचन करुन रसग्रहणाचा मोह होतो आहे. त्या आधी साकल्य, गायी आणि पार्थ बाणांच्या रुपकांना पुन्हा अभ्यासेन आणि नंतर रसग्रहणासाठी नक्कीच येईन.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 06/02/2017 - 10:07 नवीन
डोईवरी भुई आदळतां मारिली बेंबीदेठीची बोंब एक पेग अधिक ढोसतां फुटे नवप्रतिभेस कोंब -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा