दुष्काळ - जिंकायाची आहे लढाई
दुष्काळाचा पडला वेढा
रूष्ट जाहले पाऊसपाणी
मात्र भूमीच्या राजपुत्रा तू
नकोस राहु खचल्यावाणी
दुर्दैवाने आजघडीला
आभाळाचा रोष इथे
जिथे डोलली हिरवी राने
उजाड आता शेत तिथे
जिंकायाची आहे लढाई
आपणास ही आज पुन्हा
दुर्भाग्याचे जरी उन्हाळे
तरी न भितो आम्ही उन्हा
जरी कोपली अवघी सृष्टि
समस्त बांधव तुझ्यासवे
लाख हातांनी लढत राहु
घडवाया सुखस्वप्न नवे
संपुन जातील दिवस हेही
इथे बरसतील पाऊसधारा
पुनश्च येईल जुनी सुबत्ता
दुःखाला ना उरेल थारा
नकोच ओझे उपकारांचे
हिमतीने अन् जाऊ पुढे
अशी घेऊया गगनभरारी
गरुडाचीही फिकी पडे
विसरुन जाऊ निराशवाटा
प्रगतीच्या त्या घडवु पथा
आता दाखवु अवघ्या विश्वा
ही बळीराजाची जिद्दकथा
- शार्दुल हातोळकर
💬 प्रतिसाद
(7)
च
चांदणे संदीप
Sun, 12/06/2015 - 09:00
नवीन
मस्त कविता!
कवितेचे स्फूर्तीगीत व्हावे हीच सदिच्छा!
Sandy
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 12/06/2015 - 11:40
नवीन
सुंदर!
सहमत.
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Sun, 12/06/2015 - 18:54
नवीन
धन्यवाद मंडळी !!
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sun, 12/06/2015 - 19:12
नवीन
दमदार
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 12/07/2015 - 11:35
नवीन
सुरेख हो शार्दूलराव.
छान लिहिलीय.
(अॅक्चुअली ह्या सगळ्या ओळी इरिगेशन प्रॉडक्टला (स्प्रिंकलर, ड्रीप) जिंगल किंवा टॅगलाईन म्हणून वापरता येतील इतक्या मस्त जमल्यात)
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Mon, 12/07/2015 - 18:37
नवीन
दुष्काळाने महाराष्ट्रात सध्या फारच विदारक रुप धारण केले आहे. आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना भौतिक मदतीच्या बरोबरीने जगण्याची नवी उमेद देणे फार गरजेचे आहे आणि आपणा सर्वांवर ही फार मोठी जबाबदारी देखील आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Mon, 12/07/2015 - 12:29
नवीन
प्रभावी आणि प्रेरणादायी.
- Log in or register to post comments