Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

म — माहितगार, Sun, 12/06/2015 - 08:58
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी * कुणास गदिमा लिखीत काव्य माहित असल्यास तुप/ तुपरोटी च्या जागी दुध / दुध-शेवई ठेऊन विडंबन पुन्हा वाचण्यास हरकत नसावी.

प्रतिक्रिया द्या
9082 वाचन

💬 प्रतिसाद (33)
अ
अजया Sun, 12/06/2015 - 09:53 नवीन
माहितगार यु टु! वा‌ङमय शेती काहीच्या काही जमून आलीये ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/08/2015 - 03:38 नवीन
प्रतिसादासाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दमामि Sun, 12/06/2015 - 10:08 नवीन
निंबोणीमागे लपलेल्या चांदोबा वरून पालीमागं लपलेल्या ठाकरांची आठवण आली.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sun, 12/06/2015 - 11:34 नवीन
विडम्बन जमलय
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 12/06/2015 - 14:42 नवीन
मुळ गाणं असं आहे ना ( यात माशी कुठे पडलीय?) चांदोबा चांदोबा भागलास का ? निंबोणीच्या झाडामागे लपलास का ? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी ! आई-बाबांवर रुसलास का ? असाच एकटा बसलास का ? आता तरी परतुनी जाशील का ? दूध न् शेवया खाशील का ? आई बिचारी रडत बसेल बाबांचा पारा चढत असेल ! असाच बसून राहशील का ? बाबांची बोलणी खाशील का ? चांदोबा, चांदोबा कुठे रे गेलास ? दिसता दिसता गडप झालास ! हाकेला 'ओ' माझ्या देशील का ? पुन्हा कधी आम्हांला दिसशील का ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/06/2015 - 14:56 नवीन
चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी चे कवि कोण आणि/ किंवा रचना केव्हा झाली आहे हे मला माहित नाही. मी लहानपणापासून ऐकलेले बडबडगीत वरील प्रमाणेच. आपण दिलेले अंगाई गीताचे कवि बहुधा गदीमा असावेत संदर्भ gadima.com यातील कोणती व्हर्शन अधीक जुनी नक्की माहित नाही पण 'तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी' हि त्रोटक आणि खास फिनीश नसलेली लोकगीत व्हर्शन असण्याची शक्यता वाटते पण हा केवळ तर्क आहे पूर्णतः चुकीचाही असु शकतो. 'तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी' व्हर्शन केव्हा पासून ऐकली आहे हे जुन्या जाणत्या लोकांनी सांगीतल्यास कोणती आधीची हे निश्चीत करणे सोपे जावे. गदीमांचा जन्म त्यांच्या संस्थळावर १ ऑक्टोबर १९१९ चा दिला आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
म
माहितगार Sun, 12/06/2015 - 15:01 नवीन
'तूपरोटी' हा शब्दोपयोग बहुधा 'चलरे भोपळ्या टुणूक टुणूक' या लोक कथेत 'लेकी घरी जाईन तूपरोटी खाईन' असा ऐकलेला आहे. त्या मुळे कदाचीत तो त्या नंतर रचलेल्या बडबडगीतात आला असू शकेल ? हा माझा व्यक्तीगत केवळ अंदाज जाणकारांनी अधिक माहितीद्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
म
माहितगार Sun, 12/06/2015 - 15:16 नवीन
Sañcaya Bhavanishanker Shridhar Pandit Vidarbha Marāṭhavāḍā Buka Kaṃpanī, 1966 - 292 pages यात तुपरोटी व्हर्शन दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
त
तिमा Sun, 12/06/2015 - 15:01 नवीन
तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी' आम्हीही लहानपणापासून हेच ऐकलंय! (१९५२)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 12/06/2015 - 17:25 नवीन
एकदा माझ्या ९० च्या पेग मध्ये पडलेली :( पण मी चांदोबा सारखा माजोरी नसल्याने माशी फेकली आणि गळा ओला केला.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 12/06/2015 - 17:47 नवीन
माशीला कसली चढली असेल ना.. बापरे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sun, 12/06/2015 - 17:55 नवीन
अहो बार मधली माशी ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
न
नाव आडनाव Sun, 12/06/2015 - 17:55 नवीन
दिल मधला अनुपम खेर आठवला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/06/2015 - 18:29 नवीन
मला पण इडंबण सुचल! Image removed. पां डुब्बा पां डुब्बा जागलास का? डोंबोलिच्या ट्रेनमागे लागलास का? डोंबोलीची ट्रेन बारा डब्बी.... त्यात भेट्ली पांडु ला... पां डुब्बी! Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/06/2015 - 18:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Mon, 12/07/2015 - 08:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 12/07/2015 - 15:07 नवीन
(हताश) पांडुब्बा उवाच - मला लागली कुणाची उचकी (कोरसमध्ये मिपाकर -कुणाची रं कुणाची ? ह्याची का त्याची ? लाजू नको, लाजू नको सांग की) बुवाची रं बुवाची रं बुवाची..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 12/07/2015 - 15:23 नवीन
तरणीताठा, बाप्या शेलाटा, चढलो मी बांधावर अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, सदरा वार्‍यावर आला आला ठोंब्या, बघा वाजला त्याचा तांब्या माझ्या उरात भरली धडकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Mon, 12/07/2015 - 18:02 नवीन
काहीतरीच अगलतगल हां सूड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 12/07/2015 - 18:38 नवीन
अगलतगल कुठे, हे त्यामानाने फारच तगलतगल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 12/07/2015 - 18:51 नवीन
असे तुला वाटले. मला हे अगलतगल वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 12/07/2015 - 19:21 नवीन
चालू द्या तुमचे निरर्थक आत्ममंथन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 19:38 नवीन
अश्लील =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Mon, 12/07/2015 - 18:12 नवीन
बुस्पांचा धागा हैज्याक कर्ण्याचा प्रेत्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रचेतस Mon, 12/07/2015 - 19:08 नवीन
खी खी खी =)) लैच अगलतगल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी Mon, 12/07/2015 - 03:59 नवीन
याच सरकारी व्हर्जन हाय एक..थोड आठवतय.. चांदोबा चांदोबा श्रमलास का ?,निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?, बगा सापडतय का??
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 12/07/2015 - 05:04 नवीन
'चंद्रम्या चंद्रम्या श्रमलास का ?' http://www.maayboli.com/node/37820 हे पु. ल कृत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
माहितगार Mon, 12/07/2015 - 05:13 नवीन
पण त्यात 'निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?' दिसत नाहीए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 12/07/2015 - 05:54 नवीन
पण त्यात 'निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?' दिसत नाहीए असेल फारसे आठवत नाही..
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/07/2015 - 17:57 नवीन
विडंबन आवडले! तुपात पडली माशी हे मूळ बडबडगीत आहे. दुसरे "चांदोबा चांदोबा भागलास का" हे आशा भोसले यांच्या आवाजात कोणत्यातरी सिनेमासाठी लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/07/2015 - 19:14 नवीन
काय नाय हो ! ही अत्रंग नवी पिढी रात्री बागेत, समुद्राकाठी बसून कायबाय चाळे करत असते. त्यामुळे चांदोबा शरमेने निंबोणीमागे लपला आसणार बघा !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/08/2015 - 03:30 नवीन
...कायबाय चाळे......चांदोबा शरमेने...
एनी कॉमेंट्स ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाव आडनाव Tue, 12/08/2015 - 05:36 नवीन
रात्री बागेत, समुद्राकाठी बसून कायबाय चाळे करत असते. त्यामुळे चांदोबा शरमेने निंबोणीमागे लपला चूक. ह्या सिचुएशन मधे चंद्र काय करत आहे ह्याचं एक्स्प्लनेशन "राधा ही बावरी" ह्या गाण्यात आहे - हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा