क्रिडा जगत
प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना
Primary tabs
प्रियेच्या निळ्याशार डोळ्यांत डुंबताना
विसरतो मी तुझ्या पाठीवरच्या वळकट्या पुष्ट
तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात
पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज
सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात
जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या सासूलाही छळू शकतेस
तिथे सवतीची काय बिशाद
तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी
आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु
तरीही जा तुला माफ केले
कारण शेवटी गिळायला घरीच यायचे आहे..
खत्त्त्त्तरन्नाक...!!!
लय भारी कुस्ती खेळलाय तुम्ही..!!
वढ पाचची !!
ins>तरीही तुझ्या नि तिच्या सह-वासाची वेडी आशा केलीच होती मी
अगागा , इतक सगळ होतय तरी स्वत:ला एव्हढ पायदळी का तुड्वुन घेताय = )))) हौस हौस ....
जव्हेरभौ इठूरायाच्या पंढरीच्या जवळपास कुठतर. सांगायची गरजच नाही लका.
लोल!
चमकदार पट काढलायसा की...! व्वा रे पठ्ठे!
प्रेरणा द्यायची राहून गेल्याबद्दल मी आपला क्षमस्व आहे.
आँ... आता प्रेरणा धाग्यात आपॉप उगवली... हा काय चिमित्कार??
शेवटची ओळ वाचून डोळ्यात टच्कन पाणीच आले ! एका पुरुषाच्या सखोल वेदना मनाच्या अंत:पटलावर हिंदकळून सांडल्या !!!
=))
आईआईगं छळ नुसता :(
डोळ्यातले पाणी थांबेना छळ वाचून.लढ बाप्पू
:):):)
बाबौ, पाठीवरच्या वळकट्या? आणि त्या देखील पुष्ट?
सायकलस्वार काका एक तर तुमचा अनुभव कमी पडतो आहे किंवा तुमच्या कवितेमधल्या नायकावर तुम्ही जाणून बुजून भयंकर मोठा अन्याय केला आहे.
अनुभव कमी पडत असेल तर अभ्यास वाढवा.
तसे नसेल तर .......... जाउदे.....त्याची इथे चर्चा नको. उगाच जगाच भलं करायच्या नादात संमं कडून आम्हाला चपला भेट मिळायच्या.
पैजारबुवा,
अवो पैजारबुवा आपले रसघ्राणेंद्रिय हायपर-सेन्सिटिव्ह झाले आहे! साध्यासुध्या प्रतिमांमध्ये काहीतरी भलताच गूढरम्य अर्थ शोधत आहात. ग्रेसच्या कवितांचा नको तितका अभ्यास केला की हे असं होतं!
कवितेच्या शेवटी 'बाजीराव' सही करायची राहिली काय?
खि खि खि...भारीये
'शेवटी गिळायला घरीच यायचे आहे'
- अंतिम सत्य !
किती सहन करता हो तुम्ही. तुम्ही म्हणून टिकलात हो! नाहीतर काय...
=))
स्वार सायकलीचा लेखणीने झेपावला !!
वेग बाईकचा आपसूक मंदावला !!
चवथी क
"यमक-धमक" जुळारी शाळा
जिलबीपुरी,चारोळीगल्ली..
गुर्जी शाळेत न्हाईत चौकशी करू नै..
लौल
सर्व प्रतिसादकांचे आभार. विशेषतः गाभारा-गँगने दाखवलेल्या आपुलकीबद्दल विशेष आभारी आहे ;)