Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बंडुमामाची बंडुमामी

प — पालीचा खंडोबा १, Mon, 12/07/2015 - 09:24
बंडुमामाची बंडुमामी जगावेगळ बोलायची भविष्यातल्या सोनेरी स्वप्नांची दारे अलगद खोलायाची लाळ गाळत हसताना नको तिथे दाबायची ! सावलीसारखा इल्या तसचं वागायचा भिरभिरणा-या भोव-यासारखा मागे मागे लागायचा पंखवाला स्वप्नातला घोडा हळूच जमीनीवर आणून सोडायचा ! बंडुमामाची सवयच निराळी चिलमीचा बार भारताच रंगायची स्वारी, घरामागच्या छपरात बंडुमामी कबुतरं उडवायची अन् बंडुमामाची गाडी रुळावरनं घसरायची ! कुणी अक्करमाश्या म्हटलं कि इल्या फिदीफिदी हसायचा तेवढ्यापुरता बंडुमामाचा चेहरा धुरात बुडायचा अन् बंडुमामी परसात जाताच जादूचा दरवाजा बंद व्हायचा ! चिलमीच्या धुरात बंडुमामा जळून गेला इल्या आता ओसरीवर एकटाच राहिला, तोपर्यंत स्वप्नातल्या कळ्यांची फुली झाली अन् बंडुमामीची रयाच गेली ! अक्करमाश्या इल्या आता चिलमीच्या धुरात बुडतो कोवळ्या वयात करपलेल्या नजरेला घेवून मी इल्याकडे बघत असतो ! विजयकुमार......... ०९.०९.२००९

प्रतिक्रिया द्या
2365 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 09:27 नवीन
गविराजांचा 'टोलनाक्यावरचा बामन' आठवला.
  • Log in or register to post comments
द
दमामि Mon, 12/07/2015 - 09:34 नवीन
जब्बरदस्त!
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 12/07/2015 - 09:41 नवीन
सिम्पली सुपर्ब !
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Mon, 12/07/2015 - 18:02 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 12/07/2015 - 18:09 नवीन
वंटास!!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/08/2015 - 04:16 नवीन
असलं आणि अस्सल वाचलंकी ८-१० पकावू धागे वाचण्याचा राग्/क्षोभ शांत होतो म्हणून !!! खंडुराया कृपा असू दे म्हाराजा.... येळ्येळ्कोट जय मल्हार !!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/08/2015 - 04:44 नवीन
+१ अशेच म्हनीतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बोका-ए-आझम Tue, 12/08/2015 - 04:42 नवीन
मस्तच! गारंबीचा बापू मधले प्रसंग आठवले!
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 08:06 नवीन
तुम्ही पण चं लिव्ह्ता कि राव १ द्या टोले अश्या प्रकारातले. विनोदी चांगले लिहू शकाल तुम्ही प्रयत्न करा. बहुतेक तुम्ही पण लिहित असाल पण आमि काय ते वाचला नाय बगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नगरीनिरंजन Tue, 12/08/2015 - 05:37 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 08:04 नवीन
धन्यवाद मित्रानो ! नाही तर काही लोक म्हणायचे हि पण कुठलीतरी कॉपी आहे. हा! हा! हा !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा