Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावली

स — संतोष तादंळे, Tue, 12/08/2015 - 06:43
पोटा पेक्षा मोठा कसलाच नाही गुन्हा चिपाटा सारखी छाति त्यात कसला पान्हा। भेगाळलेल्या भुईच्या खुणा अंगभर् वाहते अल्बम मधली हसरी ,लाजरी माय कुठ राहते? लव्हाळा सारखा तरणा बाप पराठी सारखा खंजर होतो निधड्या छातीत आग घेऊन डोळ्यांत डोह दाटूंन राहतो। नदी काठचे अटले झरे शिवार मरणासन्न झाले पाहणी साठी राजे आले हिरवे कुरन चरुंण गेले तुमच्या खोलीत गारवा आहे बाग ही तुमचा हिरवा आहे आमचिच कशी धूळ पेर झाली? इथ्,कुणाची माय व्याली? भरल्या दिशी चिंध्या खोसुन शेतात जातात या पोरी आदानीच्या लेकानो पिकुन बघा मन भर ज्वारी कणसा सारखी मान मोडून धरणीला पाय रोऊन बसतो पॅकेजच्या घोषणा होतात आमच्या छातीत काटा धसतो। वामनाची पिलावळ ही हिरव्या हिरव्या करतात बाता गढ़ी खोदा मढे उकेरा शोधा कुठ गांव होता? कशी झाली ,ही माय नागडी? कुणी ओढला तिचा पधर? शेतकरी माय बाप उगाच कशाला दावता आदर? बेडका सारखे डराव डराव माध्यमांचा पुर लोटतो उभ्या दारी आब्रु काढता मरण दारी येऊन भेटतो? आवळलेल्या श्वासाना दोरिचा ही आधार वाटला माझा राजा मुक्त झाला म्हणून तिचा कंठ दाटला भुकेल्या गिधड़ाना नदि काठ सोपा होता लटकलेल्या सावली भोवती गाड्यांचा ताफा होता। दरिद्री हे जीन माय नाही कधी तुला विकल बांधावरच एक झाड़ पात्या सह कस झुकल?? संतोष तांदळे

प्रतिक्रिया द्या
4490 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 08:16 नवीन
पोटा पेक्षा मोठा कसलाच नाही गुन्हा चिपाटा सारखी छाति त्यात कसला पान्हा। प्रचंड ताकद आहे ह्या कवितेत शहारा येतो अंगावर सुरुवात तर लोण्याला कापणा-या सुरीसारखी अलगद मनात घुसते
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Wed, 12/09/2015 - 05:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 08:18 नवीन
माफ करा तुम्हाला चिपाड म्हणायचे आहे का ? करण चिपाट कशाला म्हणतात ते कळले नाही. सुकलेल्या कडब्याच्या कांडिला चिपाड म्हणतात ना
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Tue, 12/08/2015 - 12:25 नवीन
ऊसाचे चिपाट असते ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 12:37 नवीन
बरोबर आहे उसाचे चिपाड तुम्ही चुकून चिपाट लिहिले आहे ज्यांना माहिती नसेल त्यना त्याचा अर्थ्कळ्नर नाही म्हणून सुधारणे साठी विचार आभार आहे पुन्हा एकदा कविता खूपच प्रभावी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संतोष तादंळे
स
संतोष तादंळे Wed, 12/09/2015 - 05:22 नवीन
उसाचे चिपाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
न
नगरीनिरंजन Tue, 12/08/2015 - 08:24 नवीन
अर्थवाही, प्रवाही आणि भेदक!
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 12/08/2015 - 08:39 नवीन
वा!!!
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 12/08/2015 - 08:57 नवीन
sahamat!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/08/2015 - 09:28 नवीन
संतोष सर कविता जबरा आहे,आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Wed, 12/09/2015 - 05:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जातवेद Tue, 12/08/2015 - 09:44 नवीन
एक एक कडवं भिडलं आहे!
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 12/08/2015 - 10:09 नवीन
कवितेतील भावना वेदना थेट पोहोचल्या ! खूप छान !
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 12/08/2015 - 10:28 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Tue, 12/08/2015 - 11:13 नवीन
नमस्कार अभारी आहे सर्वांचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
आ
आदूबाळ Tue, 12/08/2015 - 10:40 नवीन
भारी लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Tue, 12/08/2015 - 11:11 नवीन
सर चिपाट हे रस काढले ल्या ऊसाचे असते
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/08/2015 - 11:29 नवीन
तरी परखड सत्य.... थेट टोकदार अग्दी खोल जकहम करणारी...
  • Log in or register to post comments
स
संतोष तादंळे Wed, 12/09/2015 - 05:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पद्मावति Tue, 12/08/2015 - 11:32 नवीन
सणसणीत! शहारा आला वाचतांना.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/08/2015 - 13:19 नवीन
परिणामकारक काव्य!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/08/2015 - 15:10 नवीन
"वामनाची पिलावळ" शब्दाने मात्र जरा रसभंग झाला. खरे तर कवीला दिसते त्याहून वेगळेच काही सांगायचे आहे असे वाटले. तुम्ही अजून १९२५ च्या प्रतिमांमध्ये अडकला आहात का?
  • Log in or register to post comments
P
pacificready Tue, 12/08/2015 - 17:42 नवीन
+१११ वामनाची पिलावळ ही जातीयवादी नसावी हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया Tue, 12/08/2015 - 16:03 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 12/08/2015 - 16:48 नवीन
सर, कविता आवडली. जगण्याची धडपड अतिशय परखड शब्दात मांडलीये तुम्ही. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 12/08/2015 - 20:52 नवीन
:(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा