Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वंशशोध

प — पालीचा खंडोबा १, Tue, 12/08/2015 - 08:12
त्या करुण हाकासुध्दा त्याला रोखु शकल्या नाहीत तो खोल, खोल अगदी खोल गर्तेत शिरत होता, प्राक्तनाच्या फुटक्या काचभांड्याचे चरे पायात शिरत असताना देखील ! माणसाच्या मुळाच्या उगमापर्यंत जाउन आलेला तो सनातन सत्य वाहत दुर्बोधाच्या जाणिवा नाकारत अज्ञात काळगुहेत शिरत प्रलयंकारी भविष्यकाळास आव्हान देत होता ! परंपरांच्या ओझ्यांचे जोखड मानेवर काही वळ ठेवून होते जे नाकारतोय त्याची जाणीव धिक्कारलेल्या नजरांचे आसुड सार्यारचे मिश्रण ओराखड्यांचे अनाकलनीय चित्र रेखाटत होते ! वंश बुडाल्याचे दुख कधीच नव्हते जिथे शेपुट गळाली अन् माणुस दिसला त्या जागेच्या शोधात कधीतरी परागंदा व्हावेच लागणार होते ! कालवृक्षाच्या पारंब्या आदिम पृथ्वीस छेदुन पाताळात मूळ गाडत असताना भविष्याच्या पर्वतावर हिमभरल्या जगात कोरडी जागा शोधण्याचा प्रकार कुणी तरी करायलाच हवा हा करतोय ! करू देत ! वंश शोधल्याचे पातक कधीतरी घडणारच होते वंशविच्छेदापेक्षा भयंकर अशी कळ, मग माकड की माणुस ? पशु की पशुपरान्त ? काळीज हेलावणारे प्रश्न वंश शोधल्याचे प्रकांड सुख की काळीज गोठविणारे दुख ह्या सीमारेषेत अडकलेला तो ! विजयकुमार...................... 21 / 01 / 2009

प्रतिक्रिया द्या
1891 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
निनाव Tue, 12/08/2015 - 08:22 नवीन
Sakhol kaavya!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 12/08/2015 - 11:14 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 12/08/2015 - 11:42 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/08/2015 - 17:37 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 12/08/2015 - 20:44 नवीन
Haa normal ha ha disat naahiye ;-) Tumhich sodwa kode...:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/08/2015 - 20:08 नवीन
एकाच प्यॅटर्न मध्ये किती दिवस लिहिणार खंडोबा ? काहीतरी नवीन येवु दे की
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 12/08/2015 - 20:15 नवीन
खंडोबा... विचार करून लिहा. (कौतुकाची साखर हवी पण टिकेचा कडू घोट नको असेल तर 'आप हमें इग्नोर मारो हम आपको')
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 12/08/2015 - 20:16 नवीन
ही अकरावी पेंटींग आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा