Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाच्याले नोट : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Wed, 12/09/2015 - 10:15
नाच्याले नोट : नागपुरी तडका

चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय

फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय

मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?

वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्‍याचे, पाठीले पोट हाय

जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय

सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय
कापसाले भाव म्हणान तं फ़ेंडीवर सोट हाय

मुद्रास्फितीच्या व्यवस्थेत सृजनाचे हाल हाय
तोंडपुज्याले 'अभय' अन् नाच्याले नोट हाय

                                  - गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


प्रतिक्रिया द्या
3856 वाचन

💬 प्रतिसाद (10)
न
निनाव Wed, 12/09/2015 - 10:22 नवीन
Sir, Tumchya Kavita nehmich jabbardast Vishay gheun yetaat ANik hey kavya apawad naahi. Masta lihile aahe.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 12/09/2015 - 11:09 नवीन
सहीये !!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/09/2015 - 14:57 नवीन
परिस्थितीवर भाष्य करणारी एकदम मार्मिक कविता.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Wed, 12/09/2015 - 16:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सत्याचे प्रयोग Wed, 12/09/2015 - 15:03 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 12/09/2015 - 19:02 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज गुरुवार, 12/10/2015 - 04:37 नवीन
आवड्यास.
  • Log in or register to post comments
भ
भानिम गुरुवार, 12/10/2015 - 08:44 नवीन
तोंडपुज्याले 'अभय' अन् नाच्याले नोट हाय
आवडली....
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 12/10/2015 - 16:30 नवीन
"मुद्रास्फिती" हा शब्द कधी कवितेत वापरला जाऊ शकतो असं वाटलंच नव्हतं!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 12/25/2015 - 15:53 नवीन
प्रतिसादाबद्द्ल सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा