Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे

म
महासंग्राम
गुरुवार, 12/10/2015 - 07:24
🗣 176 प्रतिसाद
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
वर्गीकरण
चर्चा विदर्भ अधिवेशन लोकसत्ता अग्रलेख

प्रतिक्रिया द्या
35320 वाचन

💬 प्रतिसाद (176)
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 07:30 नवीन
तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत का? असल्यास बोलून उपयोग नसेल, अन्यथा बोलण्यालायक अन चर्चा करण्यालायक खुप मुद्दे आहेत. कळावे (वैदर्भी) बाप्या
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 12/10/2015 - 07:49 नवीन
बाप्पू तसं नाही पूर्वग्रह नक्कीच नाही, पश्चिम महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो तर आपला का नाही त्याला स्वतंत्र कशाला पाहिजे एवढंच बोलन हा मायावाला …. चुभूदेघे मनाने विदार्भीय असलेला मंदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 12/10/2015 - 07:33 नवीन
हम्म. टंकनसुख घेणारे येतीलच इतक्यात. किती करायचेत बोला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/10/2015 - 07:41 नवीन
सत्तेतील सरकार शेवटच्या वर्षात स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेऊ शकतो किंवा तशी काडी पुढील मतदान घेण्यासाठी टाकू शकतात. लहान राज्ये असली पाहिजेत विकसाची जास्त संधी असते फक्त आर्थिक सोर्स तितके मजबूत असले पाहिजेत. स्वतंत्र विदर्भ झाला की स्वतंत्र मराठवाडा राज्य झालंच पाहिजे आणि त्या आंदोलनात आम्ही असूच....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 12/10/2015 - 07:51 नवीन
डॉक एकत्र राहून जर यांना विकास साधता येत नसेल तर आपले नेतृत्व कूचकामी आहे असेच म्हणावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उ
उगा काहितरीच गुरुवार, 12/10/2015 - 07:58 नवीन
मग काय औ'बाद राजधानी परभणी, हिंगोली , नांदेड , लातुर झाले एक राज्य ! जमल्यास बीड , उस्मानाबाद वगैरे जोडायच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/10/2015 - 08:01 नवीन
स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर काहीजणांची "भाकरी नसेल तर पुरणपोळी खा" ही भूमिका डोक्यात जाते. विदर्भात नेत्यांमधे आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि मुदलात अशा नेत्यांची कमतरता आहे. बच्चू कडू सारख्यांनी हे आंदोलन हातात घेतले तर विदर्भ होणे आणि त्याचा विकास होणे अवघड नाही. बाकी. बोलण्यासारखे बरेच आहे. चर्चा पुढे गेल्यास उडी टाकूच.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 12/10/2015 - 08:08 नवीन
बावाजी पन सारेच कुटी कडू हायीत तीतच आपलं खेटर अडकते ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 08:08 नवीन
मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन बरे वाटले काही मुद्दे मांडतो ह्यांचा सविस्तर उहापोह झाल्यास काहीतरी उत्तम चर्चा होऊ शकते पण त्या आधी काही एक डिस्क्लेमर :- मी हलके प्रतिवाद करणार नाही वैयक्तिक होणार नाही अन वैयक्तिक झालेल्यांकडे लक्ष ही देणार नाही मुद्दे खालील प्रमाणे १ अनुशेषभरती संबंधी आपली वाक्ये पाहता हे सांगावे वाटते की अनुशेष होता हेच आधी सरकार मानत नसे त्यांनी ते नंतर मानले , बरं मानले अन काही केले अश्यातला भाग नाही, तस्मात् राज्यपाल महोदयांना स्पेशल इंस्ट्रक्शन राज्यसरकार ला द्याव्या लागल्या तरीही त्यावर काही कारवाई होऊन पुढे किती अनुशेषभरती झाली हे कळाल्यास उत्तम होईल २ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 12/10/2015 - 08:16 नवीन
माझेही अगदी हेच म्हणणे आहे, वैयक्तिक/प्रांतिक आकस न ठेवता उत्तम चर्चा व्हावी हीच अपेक्षा आहे. पहिल्या मुद्द्याबद्दल माझ्याकडे योग्य आकडेवारी नाही त्यामुळे इथे गप्प
२ एसआरसी (स्टेट रीआर्गेनाईजेशन कमिटी) ह्याचे अध्यक्ष बहुदा फजल अली असल्याकारणे हिला फज़ल अली कमीशन सुद्धा म्हणतात बहुदा,त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीचे रिकमेन्डेशन दिले होते
फली आयोगाने रिकमेन्डेशन दिले होते पण स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन सुरु झाल्याने विदर्भाची मागणी मागे पडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 08:17 नवीन
सोन्या बापु - विदर्भा वर वेगळा प्रतिसाद लिहीतोच. पण ह्या अनुशेष प्रकाराबद्दल लिहावे वाटले. ज्यांच्या बाबतील अनुशेष आहे ( इथे विदर्भ ) त्यांना त्याच्या बाबतीत अजिबात दोषी न पकडता, ज्यांनी जमेत तितका विकास करुन घेतला आहे त्यांन दोषी ठरवणे गमतीशीर आहे. राजकीय रीत्या तर विदर्भाला आणि मराठवाड्याला मोठा काळ मुख्यमंत्री पद मिळाले आहे. हे म्हमुल, एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार. विदर्भ नैसर्गीक स्त्रोतामधे बाकी महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त नशिबवान आहे. तरी पण हे कायम मागासलेलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 08:36 नवीन
एक मिनिट! अनुशेष आहे तो सरकार ने कबुल केलाय, "अनुशेष" म्हणजे इंग्लिश मधे "बॅकलॉग" विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर , तुम्ही वंचित आहात हा तुमचा दोष आहे ह्या प्रकारचे विधान हास्यास्पद वाटते दादा, उलट ज्यांनी विकासचक्र विषम ठेवले त्यांना दोष दिला तर तो अतार्किक कसा?? मराठवाड्यावर मी कॉमेंट करणार नाही कारण अभ्यास नाही विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच , मग जर कमी मार्क मिळणाऱ्या पोराने काही बोलले की त्यालाच बोल लावायचे ही कुठली रीत म्हणे दादा?? बरं विदर्भात जनतेची इच्छा नाही विकासाची असेही काही आढळले नाही मला तुमचे तसे काही निरिक्षण असल्यास नमूद करा त्यावर विचार करता येईल ही , फ़क्त ज्याच्या तोंडचा घास पळवलाय अन दुसऱ्याला चारला आहे त्याला तो चारलाय असे न म्हणता "मलाच का घास मिळत नाही" म्हणून स्वताड़न करणे आपल्याला अपेक्षित असल्यास मी त्याच्याशी तीव्र असहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 08:56 नवीन
विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,
राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 10:02 नवीन
राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार खासदार निवडून येत नाहीत का? वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. गल्लत होते आहे, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे पेन पेंसिल गाइड असे माझे म्हणणे नाही तर ते वापरायच्या परवानग्या म्हणजे पेन पेंसिल आहेत, चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात? भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा. मुळात हे अतिशय अनइंफॉर्मड विधान आहे, १९५३ च्या नागपुर कराराच्यावेळी अनुशेषभरती हा मुद्दा होताच उगाच का घटनेने कलम ३७१(१) ची खास तरतूद केली असेल का? बरं १९५३ च्या आधी म्हणजे १९४७ मधे जर खुप जास्त सुबत्ता होती हे तुम्ही कबुल करता आहात तर त्याचा अर्थ हा बट्याबोळ महाराष्ट्रात येऊन झालाय हे एकार्थी मान्य करणे समजावे का? ३७१(१) नुसार अनुशेष अभ्यास १९८३ पर्यंत केला गेला नाही ह्यावरुन काय ते समजा, १९८३ मधे दांडेकर समिति स्थापन झाली जिचा रिपोर्ट १९८४ मधे सबमिट झाला तो तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांनी दाखलच करुन घेतला नाही! त्यानंतर थेट १९९१ ते ९३ सुधाकरराव नाईक, ह्यांना काम करायला किंवा अनुशेष भरती वर बघायला वेळ होता का? आठवा मुंबई दंगली, मग १९९५ मधे राज्यपालांनी विशेष आदेश देऊन नवी समिती बनवे पर्यंत सगळे ढिम्म, बरं ह्या आधी वैदर्भीय आमदार शांत बसले होते का हा उपप्रश्न तर अजिबात नाही १९८३ च्याच अधिवेशनात का त्याच्या २ वर्षे अगोदर (साल आठवेना नीट) सर्वपक्षीय वैदर्भी आमदारांनी सदनात हा अभ्यास व्हावा म्हणून ठराव दाखल केला होताच समजा काय ते! बरं ह्याआधी झालेले वैदर्भी सीएम होते त्यांनी काय केले? किंवा केले नाही हा प्रश्न विचारला जातो तर १९६० ची स्थापना नंतर एखाद वर्षे यशवंतराव मग त्यांचे केंद्रात प्रयाण (कृष्ण मेनन च्या जागी) त्यानंतर उणी पूरी दीड वर्षे कन्नमवार ते ऑन पोस्ट वारले त्यांच्यानंतर आले ते वसंतराव नाईक, बरं हे ह्या प्रश्नातले आवडते पात्र त्यांनी अकरा वर्षात काय केले? तर राज्य नुकते जन्माला आलेले,पहिल्या मुख्यमंत्र्याला केंद्रात तातडी ने जावे लागले, दुसरा एखाद वर्षात मरून गेला, परत निवडणूक प्रचार ह्यातुंन सुद्धा त्यांच्या औद्योगिक पॉलिसी साधक असल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचा पाया रचला गेला, बरं वरच्या प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे मुख्यमंत्री हा काटेरी मुकुट होय, लोकांना घी देखा पर बड़गा न देखा असे हे पद, बहुमत सांभाळा गवर्नेंस पहा विकास करा काँग्रेस पार्टी म्हणली का हायकमांड सुद्धा सांभाळा, ह्या सगळ्या नादात कोणाशी किती भांडणार अन विदर्भात काय ओढून आणणार? हे एक झाले शिवाय तुमच्या प्रश्नान्तर्गतच अजुन एक मुद्दा मांडतो, मुख्यमंत्र्याने राज्याचा समग्र विकास पहावा का फ़क्त आपल्या क्षेत्राचा? मला वाटते राज्याचा मुंबई ते विदर्भ अंतर पाहता मुख्यमंत्र्याने त्या काळात किती फिरावे? मग राज्याकडे लक्ष देणार की क्षेत्राकडे? मुळात मुख्यमंत्र्याने पुर्ण राज्याच्या विकासाकडे पहायला हवे की राव ते वसंतदादा ते शरदराव कोणी केले? मग आता सांगा पेन्सिली कोणाला मिळाल्या??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/10/2015 - 10:13 नवीन
खल्लास प्रतिसाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 10:29 नवीन
शेवटच्या वाक्यावरुन पुढे सांगतो, माझे आजोळ तासगाव जिल्हा सांगली मधे आहे मी दोन्ही कडल्या कंडीशन पाहून आहे, वसंतदादा किंवा शरद पवार ह्यांनी जे केले ते चुकच होते (क्षेत्रकेंद्रित विकास) पण आजही लोक त्याला घटनात्मक अन बरोबर एंड codified duty of a legislative representative siting on post of CM मानतात तेव्हा मात्र ते एथिकल , मॉरल अन एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स वर चुक असतेच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 11:02 नवीन
चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! कारण परवानगी नाही वापरायला वीज! आले का लक्षात?
सोन्याबापु - माझ्या प्रश्नाला तुम्ही टाळुन च मोठे उत्तर देत आहात. एकटा सीएम राज्यकर्ता नाही, ठीक आहे, मग ६० का ८० आमदार काय करतात? तुम्ही वर लिहीले आहे चंद्रपुर ची वीज पश्चिमेला जाते, मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का? अशी कशी परवानगी नटाव? आणि असले बिनकामाचे आमदार कसे निवडुन येतात वर्षानुवर्ष. तसेच तुम्ही माझ्या दुसर्‍या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले आहे. प. महाराष्ट्रात पण असमतोल आहे. सांगली / कोल्हापुर ला दांडगे राजकीय नेतृत्व मिळुन पण आणि पाणी वगैरे असुन पण काही करता आले नाही. पुण्याला राजकीय दृष्ट्या काडीची किम्मत नसताना, त्याच भागात कशी प्रगती ? अमेठीतुन इतकी दशके पंतप्रधान निवडुन येत असुन अमेठीची हालत काय आहे ते तुम्हाला माहीती आहेच. हा दोष निवडुन येणार्‍याचा आहे का निवडुन देणार्‍याचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 11:16 नवीन
मग हे ८० आमदार काय उपटत बसतात का?
एक विनंती थोड़े भाषेचे भान असू द्याच आपण ही चर्चा डोकी फोडायला नाही तर डोकी चालवायला त्यांना खाद्य पुरवायला करतोय असे मला अजुनही वाटते, ते असो! तुमच्या प्रश्नाचे उत्तर, मी वरतीच बोललोय "रस्ते विकासाच्या फण्ड ची मागणी करायला गेलेल्या नेत्यांस बसवणे दूर तर शिवीगाळ करून हकलुन दिले होते" मग आता सांगा ते लोकप्रतिनिधी करंटे म्हणावे का आपला न्याय वाटा मागायला आलेल्यांना अपमानित करून हकलणाऱ्या लोकांना करंटे म्हणावे? आपले मुख्यमंत्र्याला सगळीकडे लक्ष देता येणे संभव नाही ह्या मुद्द्यावर एकमत समजू का? बाकी तुम्ही म्हणता ते कसे मानु? कारण हे ८० आमदार सतत फंड किंवा न्याय पैसा आणायचा प्रयत्न करत असतात ते ही मी वर मांडले आहे, आपण ते मिस केलेत काय? मुळात अमरावती नागपुर चंद्रपुर अकोला आता बुलडाणा वाशीम सगळे लोक भांडण करून पैसा आणून विकास करीत आहेत , आक्षेप आहे तो "भांडण करावे लागण्याला" ज्याचा जो हक्क आहे त्याचा त्याला मिळायचा प्रश्न आहे न भाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 11:50 नवीन
सोन्याबापु, माझा मुद्दा राजकीय नेतृत्वा पेक्षा तिथल्या जनते बद्दल होता. मी आधी पासुन सांगतोय, पुण्याला राजकीय दृष्ट्या काही किंमत नाही. तरी मग इथेच का जो काही विकास होतो तो होतो? मागे राहीलेल्या प्रत्येकानीच स्वताकडे आत वळुन बघणे गरजेचे नाही का? दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार? त्यात इथे काही गुलामगीरी, मग दुसर्‍यां वर दोषारोप कीती वर्ष करणार? २-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते? मी नैसर्गीक स्त्रोत भरपुर आहेत असे लिहीले की तुम्ही म्हणणार वापरायला परवानगी नाही. खेचुन घ्यावी परवानगी. तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे. --------- पुन्हा विषयांतर तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 12:39 नवीन
दुसर्‍या कोणामुळे मागे राहिलो हा दावा किती वर्ष करणार? दावा नाही पुरावे सुद्धा दिलेत , वाटल्यास अजुन देऊ शकतो, असो. २-५ अगदी १० वर्ष असे शोषण करणे शक्य आहे पण ५० वर्ष शोषण कसे होऊ शकते? अब भाई जो है सो है ! खेचुन घ्यावी परवानगी. कशी घ्यावी म्हणे? लोकशाहीत?? तुमचा युक्तीवाद म्हणजे ब्रिटीशांनी भारताला लुटले तसे प.महाराष्ट्र विदर्भाला लुटतोय अश्या लायनीवर चालू आहे. अजिबात नाही, माझा रोख हा "विकासाचा क्षेत्रीय असमतोल" असे म्हणवतो, त्याची कारणे वगैरे मी देतोय, ह्यात तुम्हाला ब्रिटिश अन भारतीय वगैरे काय जाणवले तुमचे तुम्हाला माहिती देवा, आता विजेचे आहे असे त्याला तुम्ही मी काय करणार? तुम्ही एका आमदाराला शिव्या घालुन हाकलुन दिल्याचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिलेत. त्या आमदारानी नंतर काय केले ते ऐकायला आवडेल. पक्षाचा राजीनामा, अपमान सहन न होऊन आत्महत्या वगैरे. किंवा ज्यानी हाकलुन दिले त्या माणसा विरुद्ध काही आंदोलन वगैरे नंतर काय करणार आमदार? बरं तुमच्या कडल्या कर्तबगार आमदारांनी काय केले असते ते सांगा, जमल्यास आमच्याकडल्या लोकांस कळवतो,बरं तसंही नको, आमच्या मुळ जिल्ह्याचे राजे नशेत पक्षश्रेष्ठी वगैरे ना नको तिथे बांधत असतात आमदार खासदार कोणाचेही वाभाडे काढत असतात त्यांच्या विरोधात कुठल्या आमदाराने काय केले ते सांगा तसेच वागायला सांगतो भेट होईल तसे इकडील लोकांस!. असो. मला असे वाटते now lets agree to disagree brother :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 12/10/2015 - 12:17 नवीन
असला नाकर्ता भाग कशापायी ठीवाता मंग म्हाराष्ट्रामंदी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
महासंग्राम गुरुवार, 12/10/2015 - 12:26 नवीन
नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही, साधन संपत्तीच्या बाबतीत विदर्भ बर्यापैकी स्वयंपूर्ण आहे, आणि हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 12/10/2015 - 13:02 नवीन
म्हुनस म्हन्तोय मी - अनिरुद्ध (एक नागपूरकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 13:05 नवीन
नेते नाकर्ते आहेत हो जनता नाही
हा प्रतिवाद न कळण्यासारखा आहे. विदर्भातले नेते आकाशातुन पडतात का प. महाराष्ट्र पाठवतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Fri, 12/11/2015 - 05:07 नवीन
विदर्भातले नेते नाकर्ते आहे त म्हणून विदर्भाचा विकास रखडला आह इसा म्हणायचा आहे मला, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मधातच आणला, त्याबद्दल मी काही बोललोच नाही ओ ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 12/11/2015 - 05:44 नवीन
अहो असले नाकर्ते नेते जनता च निवडुन देते ना का ते आकाशातुन पडतात असे मी विचारले होते. बिहारींनी लालू ला निवडुन दिले आणि लालु नसता तर त्याच्या सारखाच कोणी गोलु, भोलु निवडुन दिला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सुबोध खरे गुरुवार, 12/10/2015 - 14:55 नवीन
महारष्ट्रात विजेचे वांदे होतील असहमत मुंबई मध्ये उद्योग ११ रुपये युनिटला या दराने वीज देतात. तेंव्हा विदर्भ वीज देऊन उपकार करतो आहे हि भाषा नको.गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे. आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. आकडे टाकणाऱ्या /फुकट्या लोकांसाठी नाही.सगळीकडे गरिबांसाठी फुकट गोष्टी देण्याच्या कोंग्रेसी संस्कृतीमुळे उर्जा क्षेत्र डबघाईला आलेले आहे. माझ्या दवाखान्याला वीज ११ रुपये ३२ पैसे अधिक इंधन अधिभार अशी आहे. तेंव्हा २४ तास वीज पुरवतात हे काही उपकार नाहीत. स्वतःचे जनित्र यापेक्षा स्वस्त पडते पण प्रदूषणाचा बागुलबुवा दाखवून उद्योगाकडून वीज घ्यायची आणि "गरिबांना"/ आकडे टाकणार्यांना फुकट वीज द्यायची यामुळे महावितरण डबघाईला आलेले आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Curious-case-of-surplus-power-but-lack-of-buyers/articleshow/47227137.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Fri, 12/11/2015 - 05:05 नवीन
गुजरात मध्ये अतिरिक्त वीज उपलब्ध आहे आणि ती मुंबईत वाहून आणण्यात येणारा खर्च विदर्भातून आणण्यापेक्षा कमी आहे.
इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिंतामणी Sat, 12/19/2015 - 08:40 नवीन
<<इतकी स्वस्त आहे वीज तर घेत का नाही गुजरात मधून तेवढच लोडशेडिंग कमी होईल >> महाराष्ट्र विज घेते. त्याचा करार आहे. प्रथम तत्कालीन राज्यकर्त्यानीं करार करायला टाळाटाळ केली होती. कारण उघड आहे. तीन पैकी दोन राज्यातील मुख्यमंत्री शत्रु पक्षाचे होते. असो. कालांतराने करार होउन या प्रकल्पातुन होणार्या विजनिर्मीती पैकी { 1,450 MW installed capacity (1 billion kWh every year) } २७ % विज महाराष्ट्राच्या वाट्याला येते. There are two power houses viz. River Bed Power House and Canal Head Power House with an installed capacity of 1200 MW and 250 MW respectively. The power would be shared by three states - Madhya Pradesh - 57%, Maharashtra - 27% and Gujarat 16%. This will provide a useful peaking power to western grid of the country which has very limited hydel power production at present.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/11/2015 - 06:21 नवीन
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. ह्या वाक्याचा अर्थ काय डॉक्टर साब? चंद्रपुरात कोणी पैसे द्यायला तयार नाही हे? की मुंबईकर ११₹ देतात त्याचा टेच? मुळात धंद्यात पैसे असले तर देणारे अन घेणारे कोणीच उपकार दर्शवु नयेत कारण त्याच्यामागे शुद्ध "डिमांड एंड सप्लाई" चा नियम असतो हे मी तुम्हाला सांगणे बरे दिसणार नाही बॉस, आम्ही देतोय कारण आमच्याकडे सप्लाई आहे अन तुम्ही घेताय कारण तुमच्याकडे डिमांड आहे, शिवाय गुजराती वीज स्वस्त पड़ते आहे तर घ्या की ती, ११ रु/यूनिट तुम्ही सांगता आहात त्यात फायदा विदर्भाचा तो काय आहे? मुंबई म्हणजे तुम्ही काही एमएसईडीसीएल कडून वीज घेता आहात का अंबानी अन टाटा कडून घेता आहात हा विचार ही करा, ट्रांसमिशन लॉस अन बाकी ग्रिड maintainance वगैरे पाहता आम्हाला थोड़ी स्वस्त का होईना पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ला वीज देने परवडल हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 12/11/2015 - 08:26 नवीन
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध आहे पण जे पैसे द्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी. बापूसाहेब उद्योगधंदे मग ते मुंबईत असोत कि विदर्भात त्यांना ११ रुपयांनी वीज घ्यावी लागते आहे. हा क्रॉस सबसिडीचा प्रकार आहे. वरील उत्तर आपल्याच मित्रांना आहे जे म्हणतात "मुंबईने आपली वीज वगैरे पाहून घ्यावी." विदर्भाने दिली नाही तर उद्योगांना ११ रुपयांनी वीज द्यायला कोणतेही राज्य किंवा प्रांत तयार होईल. की मुंबईकर ११ रुपये देतात त्याचा "टेच?" हि टेचाची भाषा आपणच लिहित आहात. मुंबई विदर्भावर अवलंबून आहे इ भाषा आपलेच मित्र वापरत आहेत. मुंबईला वीज पुरवण्यासाठी कोयना १९६० मेगा वॉट आणि एनरॉन २२२० मेगा वॉट हे दोन प्रकल्प पुरेसे आहेत.त्यात तारापूरचे १४०० मेगा वॉट घ्या उरण ६७२ मेगा वॉट, ट्रॉम्बे १८० शिवाय खोपोली भिवपुरी भिरा इ मुंबई च्या जवळचे प्रकल्प पाहिलेत तर विदर्भातील वीजच काय गुजरातची सुद्धा वीज घ्यायची मुंबईला मुळीच गरज नाही हे आपल्याला लक्षात येईल. हे सर्व उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्यांना मायबाप सरकार देत असलेल्या फुकट विजेची बिलं भरण्यासाठी महाविज इकडची सबसिडी तिकडे करते त्यासाठी आहे हे आपल्या लक्षात येईल. मुळात अजून विदर्भाची वीज मुंबईला येत नाही तर ती पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनलाच जाते आहे हे पण पाहून घ्या A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5] https://en.wikipedia.org/wiki/Koradi_Thermal_Power_Station एकदा हे पण बघून घ्या न http://www.business-standard.com/article/opinion/why-mumbai-gets-24x7-power-supply-and-other-cities-don-t-115090400308_1.html जाता जाता गुजरात मॉडेल पण वाचून घ्या त्यात http://www.business-standard.com/article/economy-policy/rajasthan-looks-to-adopt-gujarat-power-reforms-115090300028_1.html राहिली गोष्ट A proposed 440 kilovolt high power transmission line from Koradi to Bhusawal would join Nagpur with Mumbai.[5]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Fri, 12/11/2015 - 08:43 नवीन
जाता जाता (जर आणि जेंव्हा) जैतापूर अणुविद्युत प्रकल्प झाला तर तो ९९०० मेगा वॉट इतका प्रचंड असेल. https://en.wikipedia.org/wiki/Jaitapur_Nuclear_Power_Project
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Fri, 12/11/2015 - 17:01 नवीन
चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद होत आहेत. सुबोधजी, आपल्या ह्या मतावर समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे. आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील. मी ही टिप्पणी केली आहे. ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे. माझ्या टिप्पणीत विदर्भावर रोख नाही. तर मुंबईकरांच्या फुकाच्या टेचावर आहे. 'मुंबईचा पैसा' हे शब्द खटकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 05:09 नवीन
डांगे साहेब मुळात तो प्रतिसाद विनोदी होता. पण तरीही त्याच्या प्रतिसादात आपला मुंबईबद्दल आकस दिसून येतो. अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली चंद्रपुर ची पुर्ण वीज पश्चिमेला जाते अन तिथे मात्र १० तास लोड शेडिंग! हा भाग जो तुम्ही नाकर्ता म्हणताय तो वेगळा काढला तर महारष्ट्रात विजेचे वांदे होतील ठिक आहे. मुम्बइने देखिल आपल्या वीज पाण्याचं बघून घेतलं पाहिजे. तसं जर का झाल त्त मुंबईतले अर्धे उद्योग बंद पडतीन ना हि सर्व वाक्ये कुणी म्हटली आहेत? जसे काही मुंबई विदर्भाच्या मेहेरबानी वर जगते आहे? प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे जर तुम्ही मी दिलेल्या दुव्यांवर लक्ष दिलेत तर लक्षात येईल. शिवाय डॉ श्रीकान्त जिचकार काय म्हणतात तेही नीट वाचा. राहली गोष्ट मुंबईच्या पैशाची . आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात. ते वाक्य पूर्ण वाचा "समग्र आणि बृहन मुंबईचा ( ठाणे डोंबिवली कल्याण कसारा आणि कर्जत) सकट विकास झालाच पाहिजे नाहीतर बृहन्मुंबई हे वेगळे राज्य झालेच पाहिजे.आणि मुंबईचा पैसा पुण्यासह उर्वरित महाराष्ट्राला देण्यास आमचा सक्त विरोध राहील." हे पूर्ण वाक्य आहे. तुम्हाला मुंबईचा फक्त पैसा दिसतो. मुंबईचे अविरत कष्ट दिसत नाहीत. २६ जुलै च्या महा प्रलयानंतर मुंबई २७ जुलैला परत आपल्या पायावर उभी राहिली. कुणाच्या प्याकेजची वाट न पाहता. वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत. कष्टामुळे मुंबईत पैसा येतो.मुंबईत "भारतभरातून" कष्ट करण्याची तयारी असणारी माणसे येतात यात विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश बिहार सुद्धा येतात. ते कष्ट करतात आणी पैसा कमावतात. हि मुंबईची संस्कृती आहे. त्याचा दुश्वास का? In this context, Mumbai - and by implication the rest of the State - subsidises Vidarbha's sustenance. ``Mumbai is the door to the temple of development and we cannot allow a division of the Marathi-speaking State,'' says Dr. Jichkar. Dr. Jichkar concedes that people of the region had shown relatively less enterprise compared to the people, for instance, of Mumbai ``because toiling is not in our blood''. हे परत एकदा वाचून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
महासंग्राम Sat, 12/12/2015 - 08:22 नवीन
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत
वा वा चक्क पुलंची आठवण करून दिली ना बाप्पा तुमी तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 08:49 नवीन
ते पुलंचेच वाक्य आहे. ( आम्ही स्वयंभू नाही परप्रकाशित आहोत) पुलांच्याच शब्दात -- मुंबई नागपूर जाण्यायेण्याचा खर्च जमा धरता मुंबईत संत्री विकत घेऊन खाणे स्वस्त पडेल. तुम्हाला नागपूरकर व्हायचे आहे का ??? नको हो कशीही असली तरी आपली माय माउली मुंबईच बरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सुनील Sat, 12/12/2015 - 09:00 नवीन
वाळयाचे तट्टे लावून संत्री खात बसत नाहीत मुंबईत
संत्री हिवाळ्यात येतात (कालच ठाण्यात विकत घेतली - डायरेक्ट फ्रॉम वैदर्भिय शेतकरी!) आणि वाळ्याचे पडदे लागतात उन्हाळ्यात! मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Sat, 12/12/2015 - 09:16 नवीन
मग संत्री खाण्यासाठी नागपूरकर ऐन हिवाळ्यात पडदानशीं होतो की भर उन्हाळ्यात शिळी संत्री खातो?
पुलंनी इनोद केला होता व तो जरा हलक घ्या ना बाप्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिगो Mon, 12/14/2015 - 11:55 नवीन
थेच तं.. च्याबहीन, उन्हाळ्यात ना मिरीगाचा संत्रा येत ना आंबियाचा.. कोण खात बसन तवा? बाकी पुलं आमच्या आवडत्या लेखकांत असले, तरी पुलंवाक्यम प्रमाणम मानून आम्ही अश्या गैरसमजांना बळी पडणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ह
होबासराव Sat, 12/12/2015 - 09:01 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चिनार Fri, 12/11/2015 - 06:00 नवीन
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे.
या वाक्याचा काही विदा आहे का ? सोन्याबापू…तुम्ही या वाक्याशी सहमत आहात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/11/2015 - 06:26 नवीन
पार्शियली एग्रीड हाओ चिनार भाऊ, नैसर्गिक "स्त्रोत" म्हणले तर मी ते अमान्य करतो पण नैसर्गिक "संपत्ती" म्हणले तर काही अंशी मान्य उदाहरण कोळसा, वनसंपत्ती , खनिज वगैरे विदर्भात आहेत, पाऊस तितकासा नाही (पण ते नैसर्गिक कारण आहे), नद्या नाहीत मोठ्या (एक वर्धा नदीचा अपवाद सोडता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 08:56 नवीन
विकास कार्यात जर राज्यकर्त्यांनी एका विशेष भागाला वंचित ठेवले अन दुसऱ्या भागाला नाही तर ,
राज्यकर्ते म्हणजे कोण? विदर्भातुन आमदार निवडुन येत नाहीत का? खासदार निवडुन येत नाहीत का? जर ते बिनकामाचे असतील तर त्यांना बदलुन दुसरे का निवडले जात नाहीत? राज्यकर्ते म्हणजे कोण? मुख्यमंत्री म्हणजे राज्यकर्ता नाही का?
विदर्भाच्या बाबतीत बोलु शकतो म्हणजे तुमच्या उदाहरण बरहुकुम बोलायचे झाल्यास एक मुलगा आराम करतो कारण त्याला वही पेन पुस्तके उपलब्ध नाहीत, त्याच्या वाटची पेन काय पार्करची पेन दुसऱ्या मुलाला दिली गेली आहेत २१ अपेक्षित सुद्धा त्यालाच ,
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा तुटवडा नाही . खनिज संपत्ती आहे, पाऊस पण आहे. त्यामुळे तेच उदाहरण घेतले तर त्या आराम करणार्‍या मुलाकडे पेन पण आहे, पुस्तके पण आहेत. पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. त्याचे सर्व लक्ष दुसर्‍या मुलाकडे कीती पेनं आहेत ह्याकडेच जास्त आहे. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा, विदर्भातली शहरे आणि खास करुन नागपूर प. महाराष्ट्रा पेक्षा जास्त संमृद्ध होते. आता मागे का पडले ह्याचा विचार त्यांनी च करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 09:04 नवीन
सोन्या बापु - माझा युक्तीवाद फक्त विदर्भ आणि प. महाराष्ट्राच्या बाबतीत नाहीये. प. महाराष्ट्रात पण असमतोल विकास आहे. पुणे पुढे गेले, कोल्हापुर मागे राहीले आणि सातार्‍याला तर कोणी विचारतच नाही. खरे तर १९७०-८०-८५ मधे कोल्हापुर पुण्यापेक्षा फार च संमृद्ध होते. पैसा होता, शेती / पाणी होते, औद्योगिक वसाहती पण होत्या. मग गोळ कुठे झाला? का तिथे पण राज्यकर्त्यांनी कोल्हापूर चा वाटा पुण्याला दिला असे म्हणाल तुम्ही. खरेतर गेली चार दशके पुण्याला राज्याच्या राजकरणात किंमत नाही. १९५० साली चीन भारतापेक्षा वाईट स्थितीत होता आणि पाकीस्तान आर्थिक दृष्ट्या भारतापेक्षा बर्‍या स्थितीत. २०१५ साली काय परीस्थिती आहे? ह्यात दोष कोणाचा? चीन कडे भारतानी अनुशेष भरुन देण्याची मागणी करायची का? भारतात तर लोकशाही आहे, मग का नाही जनता चांगल्या काम करणार्‍या माणसांना निवडुन देत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/10/2015 - 08:16 नवीन
बच्चू कडु सेन्सेशनलिस्ट आहे! बेंजामिन फ्रैंकलिन ने जन्माला घातलेली ही राजकीय विरोधाची संकल्पना आहे डांगे साहेब, ह्या भाकरी नाही तर पुरणपोळी कॉमेंट वरुन एक अजुन सुचले आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा का काही नाही केले? वगैरे सवाल टिपिकल असतात तर त्या संबंधात मला वाटते एकटा सीएम वैदर्भी असुन काय उपयोग? तो त्याच्या हातात असलेल्या खात्यांच्या संबंधित कामे करेल सुद्धा, बाकी टीम कुठली काय कसे हे ही महत्वाचे!, मागच्या आघाडी सरकार चे एक उदाहरण घ्या बहुसंख्य कॅबिनेट मंत्री हे फ़क्त सांगली जिल्ह्यातले होते, इतके मातब्बर की स्वतः अशोक चव्हाण खुद्द नांदेड चे असताना सुद्धा गोदावरी पाणी वाटप अन बाभळी तिढा सोडवू शकले नाहीत (टीम ला घेणे देणे नसावे अन उदास हाईकमांड आहेच) तसाच अनुशेष प्रश्न , तुम्ही म्हणता आपल्या नेत्यांत आत्मविश्वास कमी आहे, मला तसे वाटत नाही उदाहरण आपल्याच महापालिकेचे घ्या एकात्मिक शहरी रस्ते विकास चा फ़क्त निधी मागायला गेलेल्या नेत्यांस बसणे दूर शिवीगाळ करून एका एर्रोगंट नेत्याने हकलुन दिले, नेत्यांचे नाव घेता आले असते पण विदर्भाची गरज हा मुळ मुद्दा असुन त्याचा राजकीय अखाडा होऊ नये ह्या इच्छेपाई आवरतो , बाकी तुम समझदार है गाववाले! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/10/2015 - 08:19 नवीन
स्वतंत्र विदर्भ तर कराच, पण ते नाही जमले तर मराठवाडा महाराष्ट्रापासुन वेगळा करा. त्याचा फार त्रास होतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 12/10/2015 - 08:23 नवीन
नागपुर ची मेट्रो घोषीत केल्या बरोबर पुण्याहुन आरडा ओरड सुरु झाली
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 12/10/2015 - 08:45 नवीन
मी काय म्हणतो, होऊ द्याच ना वेगळा विदर्भ.. अरे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे हा.. हिंदी बोलणारी इतकी सगळे राज्ये आहेत, आणि मराठी बोलणारं एकच? विदर्भ वेगळा करा आणि मराठीचं संख्याबळ वाढवा.. असो.. आता जरा सिरीयसली बोलतो.. १. अनुशेष आणि अनुदान नेमका किती देण्यात आला, ह्याची काही आकडेवारी? कशावरुन ह्या ना त्या कारणाने त्याला रोखून 'तुम्हाला पैशांचा उपयोगच करता येत नाही' ह्या नावाखाली मदत थांबवण्यात आली नाही? २. एका महीन्याचं अधिवेशन घेऊन खरंच काही फायदा आहे का? ३. जिल्ह्याचं मुख्यालय लोकांच्या जास्त जवळ जावं, म्हणून छोटे जिल्हे बनवल्या जाताहेत आता, मग राज्याचं मुख्यालय असं एक कोपर्‍यात का? मग विदर्भातल्या माणसांना मुंबईला जाण्याचा त्रास का? गोंदीया-मुंबई हे अंतर गोंदीया-दिल्ली इतकंच आहे जवळ जवळ.. ४.
'आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही.'
हे मत कशावरुन? ५. मुंबईमुळे महाराष्ट्राच्या खजिन्यात मोठी भर पडते, व त्यातून मिळालेल्या पैशांची विदर्भाच्या विकासासाठी मदत मिळते, हे मान्य.. पण विदर्भ स्वतःच्या 'रिसोर्सेस' वर तगू आणि वाढू शकत नाही , ह्याबद्दल काही स्टडी आहे का? असल्यास शेअर करावा, ही विनंती. ६.
एक मुलगा अभ्यास करुन जास्त मार्क मिळवतो, एक आराम करतो म्हणुन कमी मार्क मिळवतो. आता हा मार्कांचा अनुशेष अभ्यास करणार्‍या मुलाचे मार्क दुसर्‍याला देऊन पुरे करणे चुक आहे. त्याला फक्त मार्क मिळतील पण विद्या मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी असेच होणार.
पुन्हा तेच.. आराम केल्याने मार्क कमी पडताहेत कि गुर्जीलोकं पार्शालिटी करताहेत, हे कोण ठरवणार व कसं?
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 12/10/2015 - 08:51 नवीन
स्वतंत्र विदर्भ हे नक्की मराठीभाषिक असेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
श
श्रीरंग_जोशी Fri, 12/11/2015 - 16:49 नवीन
स्वतंत्र विदर्भ १००% मराठीभाषिक राज्य असेल याबाबत अजिबात शंका वाटत नाही. तसेच राज्याची अधिकृत भाषा हिंदी नसूनही बहुतांश जनता उत्तम हिंदी बोलणारे राज्य असेल. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी विदर्भ मध्य प्रांताचा हिस्सा होता ज्यात आजचे मध्य प्रदेश व छत्तिसगढ या राज्यांचेही भूभाग होते. तेव्हा मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती अन अधिकृत भाषा हिंदी व मराठी या होत्या. विदर्भात ज्या लोकांची मातृभाषा हिंदी आहे व जे रोजच्या व्यवहारात हिंदी अधिक वापरतात ते सहजपणे मराठी माध्यमांच्या शाळेत शिकतात व शासकीय कामांसाठी मराठीत पत्रव्यवहार करतात. बाकी वैदर्भिय बोलीभाषेत अनेक मराठी शब्दांचा वापर सहजपणे होतो ज्यांसाठी महाराष्ट्राच्या इतर भागांत हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा