Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक

स — सुमित_सौन्देकर, गुरुवार, 12/10/2015 - 11:35
असलो जरी मी नास्तिक तरी देवालाच दोष देत मी रडतो कुणासोबत मंदिरात जाता विश्वास नसून पाया पडतो.... नाही विश्वास भूता-खेतावर म्हणत मी टेम्भा मिरावतो ऐकट पडलो की मात्र अंधाराला खुप घाबरतो... खर खोट सिद्ध करायला मीही शप्पत घेतो नजर लावली कुणी म्हणून मीही दूषण देतो... स्वतावर आहे भरोसा तरी शिंक आली की थांबतो नस्तिक्तेच व्याख्यान मात्र अभिमानाने सांगतो... सण संपता निरोप घेता मीही होतो बर भाऊक आहेच खर का मी नास्तिक ते त्या इश्वरालाच ठाउक...

प्रतिक्रिया द्या
3173 वाचन

💬 प्रतिसाद (16)
न
निनाव गुरुवार, 12/10/2015 - 13:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/10/2015 - 13:50 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/10/2015 - 13:54 नवीन
छाण ! अवांतर : नास्तिक ह्या शब्दाचा खरा अर्थ काय हे एकदा जरा नीट तपासुन पहायला पाहिजे सर्व्वांनी असे वाटले :)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 12/10/2015 - 17:27 नवीन
धन्स प्रगो!!! स्वयंघोषित विज्ञानवादी विवेकवादी यांनी ही कविता लक्षात ठेवण्यासारखी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एस Fri, 12/11/2015 - 11:30 नवीन
'नास्तिक' या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणे आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/10/2015 - 16:26 नवीन
मस्त कविता आहे आवडली
  • Log in or register to post comments
ज
जातवेद गुरुवार, 12/10/2015 - 18:14 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 18:18 नवीन
सदर अवस्था म्हणजे नास्तिकतेची बालवाडी पास आणि पहिलीत प्रवेश अशी असते. पण तिथुन पुढेच जावे हे खरे.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Fri, 12/11/2015 - 08:08 नवीन
खूप छान . नास्तिकतेच ढोंग करणार्यांना मारलेली चपराक आवडली .
  • Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर Fri, 12/11/2015 - 11:16 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 12/11/2015 - 14:01 नवीन
मी नास्तिक आहे यांत अभिमानाने मिरवण्यासारखं काहीच नाही. आस्तिकांसाठीही तेच लागू पडते. पण इतरांना उपदेश न करता जर कोणी सत्याचा शोध घेऊ लागला तर, त्यावर एवढे टोमणे कशासाठी ? देव आहे वा देव नाही या दोन्ही गोष्टी पुराव्याने सिद्ध झालेल्या नाहीत, असे एखाद्याला वाटू शकते.
  • Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर Fri, 12/11/2015 - 16:23 नवीन
माझ मत इतकच आहे की... निदान घेतल्या भुमिकेशी प्रमाणिक नक्की रहायला हव:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
पैसा Fri, 12/11/2015 - 14:30 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 12/11/2015 - 15:30 नवीन
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 12/11/2015 - 15:31 नवीन
आस्तिक आहे मी तरीही देव पाप देतो यावर नाही विश्वास बिनदिक्कत बोलतो खोटे चिकित्सेचा मज नाही ध्यास
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/11/2015 - 15:47 नवीन
छान कविता ! नास्तिकता प्रामाणिकपणे निभावून न्यायला "वाघाचे काळीज" लागते... आणि त्यापेक्षा अधिक जास्त महत्वाचे म्हणजे नास्तिकतेच्या दंभात वाहून जाणे टाळण्यासाठी "शास्त्रिय प्रामाणिकपणा व सारासारविवेक बाळगणारा मेंदू" जरूर असतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा