माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
💬 प्रतिसाद
(124)
स
साधा मुलगा
गुरुवार, 12/10/2015 - 12:22
नवीन
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.>>>>>>>> म्हणजे कोणती शहरे? मुंबई,पुणे सारख्या शहरातील कॉलेजेस मध्ये तरी जागा रिकाम्या आहेत अशी स्थिती मी फार कमी वेळा पहिली आहे.
कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.>>>>>>>>> दरवर्षी रिकाम्या राहतात नवीन काही नाही.
बर्याच राजकारण्यांनी/ शिक्षण सम्राटांनी अशी कॉलेजेस काढलेली असतात ज्यांना कोणी विद्यार्थी मिळत नाही. यामुळे संपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची गरज कमी झाली आहे असे नाही. त्यामुळे उगाच एखाद्या बातमीचा बाऊ करू नका, मुलाला किती मार्क मिळतात ते आधी पहा. बाकी मिपावर भरपूर इन्जिनिअर्स आहेत, ते तुम्हाला भरपूर मदत करतील. शुभेच्छा!
टीप : माझी माहिती/ अथवा अनुभव हा किमान ७-८ वर्ष जुना आहे, तरी परिस्थितीत फारसा फरक पडला असेल असे वाटत नाही. तरी चार लोकांशी बोलून updated राहा.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 12:26
नवीन
मुंबई पुणे नाहीत त्यात. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद इ. असावीत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/10/2015 - 13:17
नवीन
मुंबई पण आहे असे दिसते--- http://indianexpress.com/article/cities/mumbai/as-admissions-begin-vacancy-fears-mount-in-engineering-courses/
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 12/10/2015 - 12:27
नवीन
@ स्नेहांकीता - घाबरुन जाऊ नका. चांगल्या कॉलेज मधे जागा मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे आणि पेमेंट सीट साठी डोनेशन पण भरपुर आहे.
ह्या सीटा ज्या रिकाम्या रहात आहेत ती कॉलेज खरे तर बंद करण्याच्याच लायकीची आहेत.
तसेच चांगल्या, अभ्यासु, कष्टाळु इंजिनियरांना नोकर्या पण मिळत आहेत. खरा प्रश्न चांगले इंजिनियर मिळत नाहीत कंपन्यांना हा आहे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 12:34
नवीन
जॉब मिळण्याच्या दृष्टीने कोणती अभियांत्रिकी शाखा घेतलेली चांगली हे सांगू शकाल का ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 12:41
नवीन
आवड नसेल तर मुलाला इंजीनीअरिंगला ढकलणे त्याला आणि तुम्हाला....दोघांनाही मनस्ताप ठरू शकतो
इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी...चिकाटी / कोडगेपणा / लॉजिकल डोके हव्वेच्च
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 12:48
नवीन
स्वानुभवाने सहमत !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 12:56
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट
गुरुवार, 12/10/2015 - 14:15
नवीन
तरीही इलेक्ट्रोनिक्स, मेडिकल इलेक्ट्रोनिक्स या शाखांमध्ये रस आहे का हे पडताळून घ्या. मागची २०-२५ वर्षे जशी आयटीची होती तशी पुढची इंटरनेट ऑफ थिंग्ज ची आहेत असे सध्या मानले जाते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/10/2015 - 13:12
नवीन
नक्की कुठल्या काळाविषयी हे लिहित आहात?
आमच्या छत्रपतींच्या विद्यापीठात एखाद्या विषयातील सर्वात महत्वाची संकल्पना ऑप्शनला टाकूनही पेपर सुटत असे. मग कसले लॉजिकल डोके हवे? चिकाटी भरपूर लागे पण ती अभ्यास करायला नव्हे तर सिनिअरची जर्नल स्पेलिंग मिस्टेकसकट कॉपी करायला :(
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 12/10/2015 - 14:03
नवीन
लॉजिकल डोके असेल तर इंजीनिअरिंग काही प्रमाणात सुसह्य होउ शकते :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 12/10/2015 - 12:55
नवीन
मला विचाराल तर, जॉब मिळण्यासाठी मेकॅनिकल बेस्ट
१. इंजिनीयरींग कंपनी मधे मिळु शकतात.
२. सॉफ्ट्वेयर कंपन्या पण घेतात खूप मेकॅनिकल इंजिनियर. इंजिनीयरीं करताना कोडींग, लँग्वेज वगैरे शिकुन घ्यावे.
पण आवड महत्वाची.
- Log in or register to post comments
P
pacificready
गुरुवार, 12/10/2015 - 13:11
नवीन
जॉब मिळण्याच्या दृष्टीने? आर यु सीरियस?
असा प्रश्न आपण विचाराल असं वाटलं नव्हतं ओ कधी.
जॉब मिळणं वगैरे कुठल्याही भारी शिक्षणानं शक्य झालं तरी तो टिकवणं किंवा त्यात आनंदानं आयुष्य व्यतीत करणं हे कधी शक्य व्हावं हे आपल्याला ठाऊक असेल.
वेगवेगळी अनेक उत्तरं मिळतीलच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/10/2015 - 13:20
नवीन
याच विचाराच्या दुष्टचक्रातून भारतीय विद्यार्थी आणि पालक बाहेर येतील तो दिवस भारताच्या इतिहासात प्लॅटिनमच्या अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा होईल :)
- Log in or register to post comments
व
विनटूविन
गुरुवार, 12/10/2015 - 13:19
नवीन
पीसीएम ला साठ टक्क्यांवर पडल्यास आयएमयू-सीईटी देऊन मरिन इंजिनिअरिंग एक चांगला पर्याय आहे.
शिवाय शिपबिल्डिंग अँड रिपेअर मध्ये पाण्यात न पाठवता देखील जॉब मिळू शकतो.
- Log in or register to post comments
स
सभ्य माणुस
Mon, 12/14/2015 - 04:35
नवीन
शिपिंग चे सध्या खुप वाइट दिवस चालले आहेत. मरिन इंजिनियर बणण्यासाठी कमीतकमी १८-२० लाख मोजावे लागताहेत सध्या. आणि परत कम्पिटंसी एक्झाम साठी १-१.५ लाख. फ्लडिंग जास्त असल्याने परत वेटिंग शिपवर चढण्यासाठी, स्पोंसरशिप असणार्या कोलेज मधील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत, स्पोंसर न करणार्या कोलेज चे विचारुच नका.
बाकी आपली मर्जी. मी लॅटेस्ट माहिती दिलीय. पुढे जाउन फ्लडिंग कमी झाले तर फरक पडू शकतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/10/2015 - 14:00
नवीन
अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी.
मुलाला अभियांत्रिकी सोडून दुसरे काही करायची तयारी आहे का ते पहा . तसे असेल तर ठीक अन्यथा मुलांच्या डोक्यावर बसून काहीतरी करायला लावायचे आणि त्यात मूल आनंदी होणार नसेल तर सगळे मुसळ केरात. (मुलाला अभियांत्रिकी"च" करायची असेल तर प्रश्न मिटला)
आमच्या मामेभावाच्या मुलीने ४ वर्षे अभियांत्रिकी केली आणि बँक ऑफ बरोडा मध्ये नोकरी करते. इंजिनियर का झालीस तर आई वडिलानी घातले म्हणून. मला मुळीच आवड नव्हती आणि नाही. मग आयुष्याची ४ सोनेरी वर्षे फुकट घालवून काय मिळवले? या प्रश्नाचे ना आमच्या भावाकडे उत्तर आहे ना पुतणीकडे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 14:11
नवीन
अभियांत्रिकी करायची इच्छा आहे, अट्टाहास नाही. इतर काही रेअर कोर्सेसही करायची तयारी आहे. म्युझिकमधे त्याला गती आहे.
पण मुलगा फारसा मेहनती चिकाटीवाला वगैरे नाही. जाता जाता अभ्यास करून ७०-७५ टक्केवाला आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 12/11/2015 - 07:33
नवीन
डॉक्टर साहेब - माझा ह्या कडे बघायचा हा दृष्टीकोन.
१. इंजिनीरींग करुन पण बँकेत नोकरी मिळाली आणि करता आली. त्या ऐवजी कॉमर्स करुन इंजिनीयरींग मधे नोकरी मिळाली असती का? आवड असो वा नसो, जर नोकरीच करायची आहे, तर ज्या शिक्षणामुळे जास्तीत जास्त दरवाजे उघडतात ते घ्यावे. इंजिनीयरींग केले तर बँकां मधे, इंजिनीयरींग मधे, सेल्स मार्केटींग मधे आणि शिकवायला / क्लास काढायला संधी मिळते . खरा उत्साही कोणी असेल तर सी.ए सुद्धा करता येते.
थोडक्यात इंजिनीयरींग केले तर सर्व दारे उघडी रहातात. तसेही बारावीत कीती कळत असते आपली आवड?
२.म्तुमच्या भाचीला आता वाटतय की इंजीनीयरींग उगाच केले, पण ५-१० वर्षानी जाणवेल की त्याचा अप्रत्यक्ष पणे बँकेच्या नोकरीत फायदा झाला.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/11/2015 - 08:56
नवीन
प्रसाद साहेब
ज्या मुलीला शास्त्र या विषयातच रस नाही तिला ५-१० च काय आयुष्यभरही असेच वाटेल कि उगाच इंजिनियरिंग केले.
जाता जाता -- ज्याला जीवशास्त्रात रस नाही ( असे भरपूर इंजिनियर सापडतील) त्यांना डोक्यावर बसून जर डॉक्टर व्हायला भाग पडले तर? त्याला पुढे असे वाटेल का कि एम बी बी एस च्या ज्ञानाचा फायदा झाला म्हणून?
ठाण्याला राहणाऱ्या माझ्या एका वर्गमित्राने आईबापांच्या दबावाखाली इंजिनियरिंग सोडून एम बी बी एस केले पण एम बी बी एस नंतर भूल्शास्त्राच्या पहिल्या वर्षात स्वतःला बेशुद्ध करणारे औषध शिरेतून घेऊन आत्महत्या केली. हि अत्यंत हृदयद्रावक कहाणी परत केंव्हा तरी.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 12/11/2015 - 09:55
नवीन
डॉक्टर साहेब - तुम्हाला माझ्या बाकीच्या प्रतिसादावरुन ( ह्या धाग्यावरच्या नाही, एकुणातच ) माझे मत लक्षात आलेच असेलच की डॉक्टरकी अजिबात सोप्पी नाही आणि त्याच्या नादी लुंग्या सुंग्यांनी लागुच नये. त्याला आवड पण पाहीजे , हुशारी तर पाहीजेच पाहीजे आणि अजुन पण काही.
माझी तुलना शास्त्र, इंजिनियरींग, कॉमर्स वगैरे ह्यांच्यातच.
डॉक्टरकी ला नुस्ती हुशारी आणि जीवशास्त्राची आवड नाही पुरेशी.
माझ्या सारखी माणसे जी दुसर्यांच्या शरीराला ( त्यासुद्धा रोगजर्जर ) हात पण नाही लाऊ शकणार ती दुसर्यांच्या जखमा वगैरेंना काय बरे करणार? त्यात डॉक्टर चा पेशा म्हणजे कायम रडकथा ऐकायच्या. कोणी आजारी, कोणी मरतय. कोणाकडे पैसे नाहीत तरी उपचार केले पाहीजेत. कठीण आहे.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Mon, 12/14/2015 - 14:06
नवीन
हे अभियांत्रिकी वाले बँकेत काय पोस्ट वर नोकरी करतात? आय मीन तीथे त्यांच्या शीक्षणाचा कसा उपयोग होतो? मागे एक जण ओळखीत हॉटेल मॅनेजमेंट करुन बँकेत जॉब करत होता.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 12/16/2015 - 07:33
नवीन
खूप उपयोग होतो दिपक. अभियांत्रिकी चे शिक्षण माणसाला कुठल्याही नोकरी साठी तयार करते.
१. अभियांत्रिकी वाल्यांना ७-८ तास कॉलेज असते, कॉमर्स वाल्यांना ३-४ तास कॉलेज. अभियांत्रिकी वाल्यांना नोकरीच्या ८ तासांची सवय लागते.
२. अभियांत्रिकी सबमिशन च्या नावाखाली शेकडो पानांचे रट्टे मारणे, मागच्या वर्षीच्या जर्नल ची कॉपी करणे. हे तर नोकरीत फारच उपयोगी येते.
३. सबमिशन ग्रुप मधे वाटुन घेणे, कोणा कडुन सब्मिशन साठी काय मदत होऊ शकेल ह्याचे भान ठेवून त्याच्यशी मैत्री ठेवणे.
४. मॅथ्स वगैरे ची किचकट गणीते , त्यांचे अॅप्लिकेशन नक्की काय आहे आणि ते कसे होते हे माहीती नसताना सोडवणे.
५. वायवा आणि सबमिशन च्या मार्कांसाठी प्रोफेसरांच्या गुडबुक मधे कसे रहावे. हे कळते. ह्याची तर नोकरीत फार गरज असते.
हे कॉमर्स मधे अभावानीच शिकायला मिळते त्यामुळे अभियांत्रिकी पास झालेला माणुस कुठल्याही नोकरी साठी सर्वात जास्त पात्र असतो,
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 12/10/2015 - 14:07
नवीन
तुमच्या पोस्टचा पूर्वार्ध जी स्थिती दाखवतो ती अपरिहार्य होती आणि दिसते त्याहूनही भयंकर आहे . यंदा साठ हजार जागा मोकळ्या राहिल्या. यावर मी इथे नुकतेच लिहीले होते. तेव्हा यावर चर्चाही झाली होती.
आता तुमच्या मुलासंबंधी:
मोठी काळजी करण्याची गरज नाही . अभियांत्रिकीला जाणे जोखमीचे नाही . तो/ ती अभियांत्रिकी कुठल्या कॉलेजात करतो त्यावर अवलंबून आहे . परिश्रमाची तयारी असेल तर अभियांत्रिकीत आजही चांगले करियर करता येते. बहुश्रुत आणि कष्टाळू मुलामुलींना जॉब मिळतोच. आधी छोटा मग हळूहळू मोठा. मग बेकारीचा विचारही येऊ देऊ नये.
त्याला आवड असेल त्याच शाखेत करू द्या. परंपरागत डिझाईन क्षेत्रात मर्यादित संधी असल्या तरी अन्य अभियांत्रिकी सेवा क्षेत्रात प्रत्येक शाखेला भरपूर संधी आहेत. आणि वाढताहेत. काही क्षेत्रे दुर्लक्षित आहेत जसे एनर्जी संबंधी काहीही किंवा मेडिया कम्युनिकेशन मध्ये तंत्रज्ञ किंवा सिव्हिल मध्ये व्ह्यल्युअर वगैरे ….
तसेच काही वर्षे अनुभव घेऊन स्वतःचा व्यवसाय करणे चांगले. स्वत:चे काही प्रॉडक्ट करणे चांगले. किंवा मग इतर व्यवसाय- जसे अभियांत्रिकी क्षेत्रात विक्री आणि पश्चात सेवा देणे. सध्या तुमच्या आसपास असे व्यावसायिक तुम्ही पहातच असाल.
अभियांत्रिकी करायचेच नसेल तर यूपीएस्सी वगैरे करून सरकारी नोकरीत जाता येते, किंवा एमेस्सी करून दहा एक वर्षांत जंगी क्लासेस होऊ शकतात!
माझ्या एका वर्गमित्राच्या मुलाने ठरवून आयसर ला प्रवेश घेतला. (त्याला आय आय टी मिळत असून )
बाकी अन्य प्रतिसादांच्या प्रतीक्षेत !
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 14:16
नवीन
अत्यंत उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद खेडूत भाऊ.
हो, मागे तुमचाच धागा वाचला होता. लिंकसाठी आभार्स !
माझेही स्वतंत्र व्यवसायाला प्राधान्य आहे. सिव्हिलशिवाय इतर कोणत्या अभियांत्रिकी शाखा व्यवसायासाठी उपयुक्त आहेत ?
- Log in or register to post comments
P
pacificready
गुरुवार, 12/10/2015 - 14:23
नवीन
सिव्हिल ला मुख्य कार्यालयात असलात तर एक जागा अन्यथा विंचवाचं बिरहाड पाठीवर.
बाकी सिव्हिल ही सगळ्यात अनसिव्हिलाइज्ड ब्रांच. दस्तूरखुद्द उदाहरण आहेतच. (कोण रे तो लगेच मान डोलावतोय?)
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 12/10/2015 - 15:13
नवीन
उपकरणीकरण (Instrumentation), मेक, विद्युत, रसायन अभियंत्रिकी (खरं तर कुठलीही शाखा, पण यांत सन्धी जास्त आहेत.)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 12/10/2015 - 14:40
नवीन
मुलाची आवड खूप महत्वाची. अमूक एका क्षेत्रात जॉब चटकन मिळतो म्हणून ते क्षेत्र निवडणे (म्हणजे खरे तर त्याला ते निवडायला लावणे ) योग्य नाही. जर तो त्या क्षेत्रात स्वत:च्या पुर्ण कुवतीनुसार मेहनत करु शकला नाही तर फार काही यश मिळणार नाहि.
त्याउलट जर क्षेत्र त्याच्या आवडीचे असेल तर त्याची कल्पनाशक्ती बहरेल, तो अधिक मेहनत घेईल आणि खूप मोठा होईल
पूढे जावून मी असे म्हणतो की तो फक्त जॉब करेल असा विचार का करता ? कदाचित तो स्वतःचा व्यवसाय करु शकतो आणि खूप पुढे जावू शकतो. फक्त त्याला तुम्ही पाठिंबा द्या, वेळ द्या.
एक प्रयोग
अजून बारावीचे वर्ष चालू आहे, फेब्रुवारी मध्ये संपेल ना ? त्यानंतर त्याच्याकडे वेळ असेल (JEE चा अभ्यास वगळता) या काळात त्याला दहा-वीस हजार (किंवा तुम्हाला योग्य वाटेल तितके) रुपये द्या आणि सांगा "एक-दोन महिने हवा तो व्यवसाय कर, कमावशील ते पैसे तुझे, गमावलेस तरी आम्हाला हरकत नाही. आम्ही गरज पडल्यास जमेल ते मार्गदर्शन करु बाकी मेहनत तूच करायचीस" याने त्याला पुस्तकाबाहेरचे जग कळेल, माणसे कळतील. तुम्ही फक्त तो काही गंभीर चूक (म्हणजे ज्याने त्याचे कोणतेही वैयक्तिक नुकसान होईल अशी ) करणार नाही याकडे फक्त लक्ष द्या.
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 12/10/2015 - 14:52
नवीन
प्रयोगाची कल्पना आणि एकूणच प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 12/10/2015 - 15:09
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जातवेद
गुरुवार, 12/10/2015 - 18:09
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 12/16/2015 - 08:04
नवीन
काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की आपले यश हे ८५% सॉफ्ट स्किल्सवर (संवादकौशल्य, नेतृत्वगुण , धडाडी , जोखीम पेलण्याचे कसब ई ) तर १५% हे विषयघन ज्ञानावर अवलंबून असते. यातील टक्केवारीचा आकडा जरी बाजूला ठेवला तरी
तेव्हा सॉफ्ट स्किल्सचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे.
झालेच तर उत्तम आकलनक्षमता असलेली व्यक्ती विविध कौशल्य वा ज्ञान गरजेप्रमाणे सहज आत्मसात करतो. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय करताना "मला इंजिनियरींगमध्ये अकाउंटिग नव्हते त्यामुळे मला नफा तोटा, बॅलन्स शीट कळत नाही" असे ईंजिनियर म्हणत नाहीत आणि कॉमर्स ग्रज्यएट असून इंजिनिअरिंग वर्कशॉप यशस्वीपणे चालवणारे सापडतीलच.
तात्पर्य : औपचारिक शिक्षण ही केवळ सुरुवात आहे पुढील प्रवास फक्त त्याआधारेच पार पडेल असे नाही.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 12/10/2015 - 15:33
नवीन
१२ वी सायन्स नंतर जर इंजिनियरिंगला जायचं नसेल आणि रस असेल तर मास मिडिया हे चांगलं क्षेत्र आहे. १२वी नंतर ३ वर्षे. शेवटच्या वर्षी Advertising आणि Journalism अशी दोन Specializations आहेत. पुढे MBA in Marketing किंवा या विषयांमधलं पदव्युत्तर शिक्षणही घेता येऊ शकतं. चांगली Colleges - केसी, जयहिंद, सेंट झेवियर्स, रुईया, नॅशनल, सोमैया. १२ वी पहिल्या प्रयत्नात आणि ४५% गुण ही किमान पात्रता आहे. या काॅलेजेसपैकी फक्त झेवियर्सला प्रवेशपरीक्षा आहे. बाकी सगळीकडे निव्वळ १२वी.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 15:44
नवीन
छानच ! मी तुमचा श्रीगणेश लेखमालेतील लेख वाचला आहे. हे क्षेत्र रेअर आहेच.
यासाठी स्पेशल स्किल्सची गरज आहे का ?
आणि महत्वाचे म्हणजे व्यवसायसंधी कोणत्या ठिकाणी मिळेल ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 12/10/2015 - 18:49
नवीन
कारण talent आणि यश यांचा संबंध असतोच असं नाही. तसं तो Engineering करूनही या क्षेत्रात जाऊ शकतो. १२ वी सायन्स ही Cinematography आणि Sound Recording साठी प्राथमिक अट आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 12/10/2015 - 18:59
नवीन
या क्षेत्राचा एक विशेष म्हणजे तुम्ही आधी काहीही केलेलं असेल तरी त्यात जाऊ शकता. तांत्रिक कौशल्याची गरज असतेच. मिपाकर प्रदीप तुम्हाला त्याबद्दल चांगली माहिती देऊ शकतील. Films, Advertising, Content Development, Public Relations, Digital Marketin,, Social Media Consulting ही क्षेत्रं सध्या जोरात आहेत आणि हळूहळू तिथे असलेला प्रशिक्षित मनुष्यबळाविरुद्धचा नकारात्मक विचारही कमी होऊ लागलेला आहे. तुमच्या मुलाला संगीताची आवड असेल तर Engineering नंतर तो Sound Recording, Editing या क्षेत्रांत जाऊ शकतो.
- Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा
Fri, 12/11/2015 - 07:18
नवीन
DAM - डिजिट्ल असेट मॅनेज्मेंट, येत्या काळात video कॉंटेंट प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, तेव्हा हे कॉंटेंट प्रोसेसिंग आणि आर्काइविंग करण फार आवश्यक आहे. या क्षेत्रात पुढे फार संधी येतील. मी सध्या शिकतोय. भारतात आहेत की नाही काही कल्पना नाही. आंतरजळवर आहेत काही चेक करा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 12/11/2015 - 07:24
नवीन
बोकाजी - हे क्षेत्र चांगलेच आहे. पण अश्या क्षेत्रात जाण्या साठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे तरच यशस्वी होता येइल. इंजीनीयरींग चे तसे नसते. आवड नसली तरी नोकरी मिळते आणि नुस्ती मिळत नाही तर ती व्यवस्थित करता येत.
Advertising आणि Journalism मधे जर आवड नसली तर झेपेल का?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/11/2015 - 07:33
नवीन
अशा क्षेत्रांमध्ये काम करायचे तर आवड तर हवीच आणि तेवढाच महत्वाचा म्हणजे त्या क्षेत्रातला कल हवा. Advertising ही एक कलाच झाली. कलेची आवड कितीही असली पण त्या क्षेत्रातला कल नसेल तर कसे काय झेपणार?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 11:32
नवीन
पण जाहिरातक्षेत्रातही काही specializations आहेत आणि त्यातल्या काही क्षेत्रात कलेपेक्षा शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन (जो engineering मुळे विकसित होऊ शकतो) महत्वाचा आहे. उदाहरणार्थ Media Planning - या क्षेत्रात Statistics, Mathematics या विषयांमधल्या तज्ञ लोकांना संधी आहे. सध्या नव्याने उदयाला येत असलेल्या Analytics आणि Big Data या
क्षेत्रातल्या कंपन्या तर इंजिनियर्सना, विशेषतः काँप्युटर इंजिनियर्सना उचलताहेत. म्यू सिग्मा, फ्रॅक्टल या कंपन्या तर आता निदान मुंबईतल्या इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना टीसीएस आणि इन्फोसिसच्या खालोखाल कँपसमध्ये उचलताहेत. MICA ने या वर्षी त्यांच्या Market Research या specialization मध्ये Analytics हा विषय समाविष्ट केलाय.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 12/10/2015 - 15:33
नवीन
१२ वी सायन्स नंतर जर इंजिनियरिंगला जायचं नसेल आणि रस असेल तर मास मिडिया हे चांगलं क्षेत्र आहे. १२वी नंतर ३ वर्षे. शेवटच्या वर्षी Advertising आणि Journalism अशी दोन Specializations आहेत. पुढे MBA in Marketing किंवा या विषयांमधलं पदव्युत्तर शिक्षणही घेता येऊ शकतं. चांगली Colleges - केसी, जयहिंद, सेंट झेवियर्स, रुईया, नॅशनल, सोमैया. १२ वी पहिल्या प्रयत्नात आणि ४५% गुण ही किमान पात्रता आहे. या काॅलेजेसपैकी फक्त झेवियर्सला प्रवेशपरीक्षा आहे. बाकी सगळीकडे निव्वळ १२वी.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 12/10/2015 - 15:50
नवीन
वाचतिये.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 12/10/2015 - 18:26
नवीन
मुलाला अभियांत्रिकीची आवड असेल आणि पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर बारावी विज्ञान नंतर अभियांत्रि़कीची पदवी हाच उत्तम पर्याय आहे. शिवाय अभियांत्रिकी शिक्षणानंतर व्यवसाय सुरु करण्याचा तसेच पदव्युत्तर शिक्षणाचाही पर्याय असतोच.
अभियांत्रिकीच्या रिकाम्या राहणार्या जागांचा मुळीच विचार करू नका. या त्याच जागा आहेत ज्या मुळात मंजूरच व्हायला नको होत्या. चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकेका गुणाची स्पर्धा असते.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 07:08
नवीन
त्याला फिजिक्सची आवड आहे. नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य.
अभियांत्रिकीनंतर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या यशस्वी उद्योजकाकडे अनुभवासाठी काम करावे असे माझे मत आहे.
तशी माहिती असल्यास कृपया व्यनी करावा. :)
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Fri, 12/11/2015 - 09:53
नवीन
तो अभियांत्रिकीला प्रवेश घेईल कि नाही हे अजून निश्चित नसताना आपण त्यापुढे काय हा विचार आत्ता पासूनच करत आहात!
एक पालक म्हणून मुलाच भविष्य सुरक्षित वगैरे ठेवण्याचा विचार करणे ठीक आहे पण त्याच्या आयुष्याचा सगळा रोड map आपणच ठरविण्यात काय अर्थ आहे!
बारावी म्हणजे फार कळण्यासारख वय नसत (असे मला तरी वाटत) त्यामुळे मी पुढे नोकरी करेन, व्यवसाय करेन हे आत्ता त्याने/तुम्ही ठरवले तरी पुढे ४ वर्षांनी त्याचे व्यक्तिमत्व विकसित होताना कदाचित तो संशोशानाकडे देखील आकर्षित होऊ शकतो किंवा कदाचित एखाद्या नवीन क्षेत्रातली अजून एक पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू शकतो!
त्यामुळे सध्या थोडी अनिश्चितता असू देत त्याच्या आयुष्यात म्हणजे सगळे दरवाजे त्याला खुले राहतील. हळूहळू त्याला स्वतःलाच जाणवेल कि काय करू शकतो ते...
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 10:03
नवीन
बारावी म्हणजे फार समजण्याइतके वय नसते >>>> सहमत !
जर अभियांत्रिकी केली तर चा विचार मी नकळत करत होते. फार पुढचा खरोखर ! लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद :)
- Log in or register to post comments
इ
इडली डोसा
गुरुवार, 12/10/2015 - 20:58
नवीन
१२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षणासाठी पाठवण्याचा विचार केला आहे का? भारतात ४ वर्ष अभियांत्रिकी करुन प्रत्यक्षात कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज/ हॅन्ड्स ऑन एक्पिरिअन्स फार कमी मिळतो. पण परदेशात बॅचलर्स केले तर जास्त अॅप्लिकेशन ओरिएंटेड शिक्षण मिळु शकेल असे वाटते. ज्याचा पुढे नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय करण्यात फायदा होईल.
किंवा भारतातच बॅचलर्स करतानाच पुढे उच्च शिक्षणाच्या संधी काय आहेत आणि त्याला कशात जास्त गोडी वाटतिये ते बघुन पुढचे निर्णय घेता येतील.
श्यक्यतो त्याचा त्यालाच निर्णय घेऊ द्या. त्यालाच वेगवेगळ्या लोकांशी बोलायला सांगा आणि मग त्याने जी काही शोधा शोध केली असेल त्यावर त्याच्याशी चर्चा करा. सगळ्या पर्यायांचा विचार करुन एक प्यु मेट्रिक्स पण करता येईल. ज्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 07:13
नवीन
परदेशात बॅचलर्स करण्यासाठी आवश्यक त्या परिक्षांची तयारी व तितका टॅलंट माझ्या मुलामधे नाही.
अर्थात पोस्टच्या वेळी कदाचित परिस्थिती वेगळी असेल.
वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याची कल्पना चांगली आहे. तथापि तितकी मॅच्युरिटी या वयात असणे आणि अशा व्यक्तींनी सहकार्य करणे, हे जरा अवघड आहे. तरीही प्रयत्न करेन.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 12/11/2015 - 07:29
नवीन
परदेशात, अॅक्रिडेटेड युनिव्हर्सिटीमध्ये, बॅचलर्स करायचा खर्च कितीसा आहे?
- Log in or register to post comments
इ
इडली डोसा
Fri, 12/11/2015 - 21:09
नवीन
परदेशात, अॅक्रिडेटेड युनिव्हर्सिटीमध्ये, बॅचलर्स करायचा खर्च जास्त आहे. पण स्कॉलरशिप्स आणि फायनान्शियल एड प्रोग्रॅम पण उपलब्ध आहेत. एज्युकेशन लोनचा ऑप्शनही आहेच.
शिवाय जॉब मिळाल्यावर खर्चावर योग्य नियंत्रण ठेवल्यास एज्युकेशन लोन लवकर फेडण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही पण परदेशात असता ना? याबाबत तुमचे विचार/ निरीक्षण काय आहेत?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »