आटपाट नगरात......
आटपाट नगरात
जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात
आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात
आटपाट नगरात
माणसे किड्यांसारखी मारतात
आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात
आटपाट नगरात
कष्टकरी अन्नाला महाग होतात
आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात
आटपाट नगरात
विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात
आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात
💬 प्रतिसाद
(2)
द
दमामि
Fri, 12/11/2015 - 05:02
नवीन
समयोचित कविता, आवडली.
- Log in or register to post comments
न
निनाव
Mon, 12/21/2015 - 16:35
नवीन
मान्यवरांच्या यादीतून ही कविता सुटलीच कशी ? खूप सटिक कविता.
- Log in or register to post comments