Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक स्कॉर्पियो आणि सहा जण...

स
संदीप डांगे
Fri, 12/11/2015 - 16:54
💬 64
कालच्या २४ तासातल्या ९०० किमीच्या गुजरात मोहिमेबद्दल थोडक्यात. १. काल सहा वाजता विचारणा झाली. कुठे जायचे सांगितले नाही. सांगितलेले ठिकाण अजिबात ओळखीचे, स्मरणातले नाही. २. दहा हजार भरले की कुणीतरी बँक अधिकारी मुद्रालोन अंतर्गत दहा लाखाचे कर्ज मंजूर करून देतो. अशा अधिकार्‍याला सुरतमध्ये भेटायला जायचे आहे. दहा हजार द्यायची तयारी असेल तर चला. ३. प्रवास सुरु केल्यावर कळले की कुठल्या तरी मंदिरात दर्शनाला जायचे आहे. ४. रात्रभर गुजरात मॉडेलच्या नावाने बोटे मोडत, पाय मोडत अ‍ॅक्स्लिटर-ब्रेक-क्लचवर डान्स केला. ५. महिंद्रा स्कॉर्पिओ ही अजिबात ऑफरोड वेहिकल नाही हे सिद्ध करण्यात गुजरात पीडब्लूडीने चंग बांधलेला. ६. नर्मदेच्या प्रचंड वाळवंटात मी आणी माझी स्कॉर्पियो, सहातासाचा खडतर प्रवास, चित्रविचित्र दृश्यांची मालिका. ७. गुजरातमध्ये एका हायवेवर ओळीने सुमारे शंभर दुकाने फक्त 'चहा' विकत होती. संशयखोर आत्म्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता कळले एक धक्कादायक सत्य. अंगावर येणारे. ८. महिंद्रा स्कॉर्पियो ही एक बंडल गाडी आहे हे माझे 'नवे' मत तयार झाले. ९. चोविसाव्या तासाच्या शेवटच्या मिनिटाला घरी असणे 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' ची आठवण देऊन गेले. १०. तो सरकारी अधिकारी, ते मंदिर आणि त्या दहा हजाराचे गौडबंगाल. २४ तासाच्या थराराचा खंग्री अणुभव. इच्छुकांनी आगावू नोंदणी करावी. प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५. (कृपया यातल्या काही गोष्टी माहित असतील तर प्रतिसाद देऊन नव्या वाचकांच्या उत्सुकतेस अगरबत्ती लावू नये अशी जाण'त्या वाचकांना पेष्यल इनंती..)

प्रतिक्रिया द्या
12825 वाचन

💬 प्रतिसाद (64)
स
संजय पाटिल Sat, 12/26/2015 - 12:41 नवीन
हेच म्हणायला आलो होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Tue, 12/22/2015 - 15:38 नवीन
क्षमा असावी. कार्यबाहुल्यामुळे प्रसिद्धीची तारिख पुढे ढकलली गेली आहे. लक्षात ठेवून प्रतिसाद देणार्‍या सदस्यांना अनेक धन्यवाद! ;-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/22/2015 - 16:30 नवीन
पुंगी वाजवून झाली टोपलीचे झाकण उघडा लवकर.अॅनकोन्डा /कोब्रा/काय ते कळू दे लवकर.
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 12/25/2015 - 13:47 नवीन
ह्या लेखकाची बोलबच्चन असते बर्याचदा असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/25/2015 - 19:40 नवीन
जसे की.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
शलभ Sat, 12/26/2015 - 06:58 नवीन
वरती एक उदाहरण दिलेच आहे मार्मिक गोडसे यांनी. अजून हाच धागा आहे. तुम्ही पाहीजे तेव्हा पूर्ण लेख टाकू शकला असता, पण ट्रेलर टाकून, रिलीज ची तारीख तारीख टांग मारता. अजून शोधावे लागतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 07:13 नवीन
ट्रेलर टाकायचे कारण आहे, पिच्चर रिलीज झाला की कळेल.. थांबाल ना? तुमची टिका सकारात्मक घेतली आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
शलभ Sat, 12/26/2015 - 13:44 नवीन
टिका सकारात्मक घेण्यासाठी धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
drsunilahirrao Fri, 12/25/2015 - 15:42 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/26/2015 - 01:23 नवीन
कधी येणार तारीख? लेख कशाबद्दल -महिन्द्रा /गुजरात रस्ते/ड्राइविंग/ललित लेखन?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 06:28 नवीन
काका, लेख भटकंतीवरच आहे. पण सध्या तुफान भटकंतीचाच कार्यक्रम सुरु असल्याने लेखन पूर्ण करायला वेळ मिळत नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
E
Ea imputo praemitto Sat, 12/26/2015 - 13:43 नवीन
'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' हहहह!
  • Log in or register to post comments
भ
भिकापाटील Sun, 12/27/2015 - 08:20 नवीन
लेख मुददेसूद लिहा. उगाच फापटपसारा नको.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 12/27/2015 - 11:32 नवीन
ट्रेकला यस्टीची ( = प्रियदर्शिनी ) वाट पहातो तसे लेखाची वाट पहात आहे.लवकर टायर बदली करा पण पोहोचवा.तसं आमच्याकडेही शहापुर यस्टी आगाराचे अनुभव गाठीशी आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा